सारे जहासे अच्छा हिंन्दोस्थ हमारा | संजय धनगव्हाळ | yashacha mantra
👆👆👆👆👆👆 'सारे जहासे अच्छा हिंन्दोस्थ हमारा' ( हे माझे विचार आहेत सर्वांनाच पटतील असे नाही.मला वाटले म्हणून लिहले ,गैरसमज नसावा ) *संजय धनगव्हाळ* ******************* वरील पोस्ट वाचली आणि माझ्या मनात अनेक विचारांची गर्दी झाली.खरतर जातपात धर्म हे जर सोडले तर हा भारत देश सर्वांचा आहे.जेव्हा जेव्हा या देशावर काही आपत्ती आली किंवा येते तेव्हा सर्वकाही विसरून सर्वधर्मीय मदतीला एकत्र येतात त्यावेळी कोणी कोणाला जात विचरत नाही.संकट आले आहे त्यातून कसे सहिसलामत निघता येईल फक्त हाच विचार त्यावेळी प्रत्येकाच्या डोक्यात असतो मग तो कुठल्याही जातीचा असो त्यावेळी त्याच्यासाठी माणुसकी हाच मोठा धर्म असतो आणि सर्वकाही विसरून प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संकट निवारण करत असतो.आपल्याला कळत नाही पण या देशात आज असे बरीच माणस,कुटुंब आहेत की ते जात विसरून गुण्यागोविंदाने राहतात एकमेकांच्या सुख दुःखात,शुभ कार्यात सण उत्सवात त्यांचा सहभाग असतो.एकमेकांचा घनिष्ठ घरोबा असतो.मग तो मुस्लिम असो,हिंन्दी असो,नाहितर आणखी ईतर कोणत्याही जातीधर्माचा असो.कोणाशी कसे ऱ्हायचे,वागायचे हे अपण ठरवायचं असतं आ