आयूष्याची दिशा ठरवण्याच एक वय असतं. पोटपाण्यापुरती शेती असली तरी काहीतरी नोकरी असावी म्हणून सुरूवातीला शेती ऐवजी नोकरी हा पर्याय निवडला जातो.. नोकरीत प्रत्येक दिवस काहीतरी सुधारणा होईल, पगारवाढ होईल या आशेने बारा - पंधरा वर्ष निघून जातात.. नंतर केवळ नोकरीच्या भरोशावर कुटूंबाच भागत नाही याची जाणीव झाल्यावर उगाच नोकरी निवडली, शेती केली अस्ती तर बर झाल असा पश्चाताप मनात येऊ लागतो. पण...... नोकरीत पंधरा वीस वर्ष गेलेले असतात, आता पुन्हा नोकरी सोडून शेती करणे शक्य नसतं.. कारण शेतीच काम शिकण्याच्या काळात शेती हा पर्याय नाकारून नोकरीचे प्रयत्न करून नोकरी स्विकारलेली असते.. चाळीस - पंचेचाळीस वयात शुन्यातून शेती शिकणे शक्य नाही.. नोकरीत भागत नाही.. नोकरी सोडून आता शेतीकडे वळू शकत नाही.. ईकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती होते.. आणि हीच परिस्थिती सरकार माहीत असते आणि तुम्हाला गृहीत धरले जाते.. त्यांना माहित असतय तुम्ही हतबल आहात, कितीही कमी पगार द्या, कितीही राबवून घ्या.. आता तुम्ही काहीच करू शकत नाही.. पुन्हा पण.. आत्महत्या हा पर्याय नाहीच.. सरकार कधीच पर्याय शोधू शकत नाही.. तो आपल्याला