पोस्ट्स

बोधकथा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वादात पडू नका..| दृष्टांत | short Audio story ...

इमेज
दृष्टांत वादात पडू नका.. एका रेल्वे स्टेशनवर एक रेल्वे येऊन थांबते.. जवळूनच एक मुलगा पाणी विकत जात होता. तेवढ्यात एका शेठने त्याला आवाज दिला. 'ये मुला, कितीला पाणी ?' मुलगा म्हटला, '२५ पैसे..' तर शेठ म्हणाले, '१५ पैशात दे.' यावर मुलगा गालात हसला व त्याने ज्या ग्लासमध्ये पाणी काढले होते ते पाणी जाऊन पुन्हा आपल्या मटक्यात परत टाकले. हे सर्व त्या रेल्वेतील एका महाराजाने पाहिले. ते महाराज रेल्वेतून उतरले व त्या मुलाकडे गेले व विचारले, 'तु हसला का ?' मुलगा म्हणाला, 'शेठला तहान नव्हती लागली. फक्त किम्मत विचारायची होती.' त्यावर त्या महाराजाने विचारले, 'तुला कसं काय माहीत की शेठला तहान नव्हती लागली म्हणून ?' त्यावर त्या मुलाने खूप छान उत्तर दिले, 'जेंव्हा माणसाला खरंच तहान लागते तेंव्हा माणूस किंम्मत विचारत नाही बसत, आधी पाणी पितो मग विचारतो किती द्यायचे ?' यात खूप मोठी शिकवण आहे.. ज्यांना काही मिळवायचे असते ते वाद विवादात नाहीत पडत, तर ते आपापल्या कामात मन लावतात... टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवड

आयूष्याची दिशा ठरवण्याच एक वय असतं...

इमेज
आयूष्याची दिशा ठरवण्याच एक वय असतं. पोटपाण्यापुरती शेती असली तरी काहीतरी नोकरी असावी म्हणून सुरूवातीला शेती ऐवजी नोकरी हा पर्याय निवडला जातो.. नोकरीत प्रत्येक दिवस काहीतरी सुधारणा होईल, पगारवाढ होईल या आशेने बारा - पंधरा वर्ष निघून जातात..  नंतर केवळ नोकरीच्या भरोशावर कुटूंबाच भागत नाही याची जाणीव झाल्यावर उगाच नोकरी निवडली, शेती केली अस्ती तर बर झाल असा पश्चाताप मनात येऊ लागतो. पण...... नोकरीत पंधरा वीस वर्ष गेलेले असतात, आता पुन्हा नोकरी सोडून शेती करणे शक्य नसतं.. कारण शेतीच काम शिकण्याच्या काळात शेती हा पर्याय नाकारून नोकरीचे प्रयत्न करून नोकरी स्विकारलेली असते.. चाळीस - पंचेचाळीस वयात शुन्यातून शेती शिकणे शक्य नाही.. नोकरीत भागत नाही.. नोकरी सोडून आता शेतीकडे वळू शकत नाही.. ईकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती होते.. आणि हीच परिस्थिती सरकार माहीत असते आणि तुम्हाला गृहीत धरले जाते.. त्यांना माहित असतय तुम्ही हतबल आहात, कितीही कमी पगार द्या, कितीही राबवून घ्या.. आता तुम्ही काहीच करू शकत नाही.. पुन्हा पण.. आत्महत्या हा पर्याय नाहीच.. सरकार कधीच पर्याय शोधू शकत नाही.. तो आपल्याला

बोधकथा - जे होते ते भल्यासाठीच होते

इमेज
पूर्वीच्या काळातील घटना आहे. एक राजा होता त्याचा एक खास मंत्री होता. जो मंत्री  होता त्याचे वडील नेहमी त्याला सांगायचे." जे होत ते चांगल्या साठीच होतं."  त्यामुळे त्या मंत्र्याच्या तोंडात ते वाक्य नेहमी यायचं.  असंच एक दिवस मंत्री आणि राजा बसले असताना राजा  तलवारीला धार किती आहे हे बघत होता. हे बघत असताना तलवारीवरुन हात फिरवताना राजाच्या हाताच्या करंगळीचा थोडासा भाग कापला गेला . लगेच मंत्री सवयी प्रमाणे राजाला म्हणाला.  *"  जे होत ते चांगल्यासाठी होत ."* माझी करंगळी कापली हे चांगलं झाल का ? राजाला राग आला त्याने मंत्र्याला तुरूंगात   पाठवलं.  तरीही तो मंत्री म्हणाला  *" जे होत ते चांगल्यासाठी होतं ".* राजा म्हणाला आत हवा खात बस काय चांगलं होत ते बघ.                      दुसऱ्या दिवशी राजा शिकारीला निघाला त्याला जंगलात हरिण दिसले. हरणाचा पाठलाग करत राजा घोडयावरुन चालला होता . घोडा वेगाने पळत होता. राजाचे सर्व केस विस्कटलेले होते . कपडे खराब झाली . राजा पुर्ण थकला पण हरिण काही सापडले नाही. रस्ताही चुकला... शेवटी राजा कंटाळून एका झाडाखाली बसला.     तेवढयात ति

बोधकथा - कर्म

इमेज
‼️...  कर्म ...‼️ *एकदा* एक राजा हत्तीवर बसुन आपल्या राज्यात निरीक्षण करण्यास फिरत होता. फिरतफिरत तो एका गावातील दुकानासमोर थांबला. प्रधानाला बोलावून म्हणाला, "कां कोण जाणे मी या दुकानदाराला पूर्वी कधी पाहीले नाही, त्याला ओळखतपण नाही... पण मला या दुकानदाराला फाशी द्यावे वाटते आहे. *प्रधान* बुचकळ्यात पडला तो कांही बोलण्याच्या अगोदरच राजा तेथून पुढे निघाला. प्रधान विचारात पडला. त्यान तेे दुकान पाहून ठेवले व तो राजामागे निघाला. *दुस-या* दिवशी प्रधान गावातल्या त्या दुकानापाशी साध्या वेशात पोहोचला. दुकानात दुकानदारा शिवाय कोणीच नव्हते. आजूबाजूला चौकशी केली असता तो चंदनाचा व्यापारी असल्याचे समजले. *प्रधान* दुकानात गेला. त्याच्याकडे सुवर्णवर्णाचे सुगंधी चंदन होते. मात्र कोणी खरेदीदार नसल्याने मालक वैतागला होता. चौकशी करता कळले की... लोक नुसते येतात वास घेतात आणि साधा दरही न विचारता निघून जातात. रिकाम्या बसलेल्या दुकानदाराला ब-याचवेळा वाटे की किमान राजा तरी मरावा. तो मेला तर त्या आसमंतात दुसरा कोणी चंदनाचा व्यापारी नसल्याने राजाच्या अंत्य संस्काराला तरी मोठ्या प्रमाणात चंदन खरेदी होईल. मा

बोधकथा - तपश्चर्या कशासाठी ?

🌀🌀🌀🌀🌀🏵🌀🌀🌀🌀🌀              🔸तपश्चर्या कशासाठी ?🔸          शिकार तर मिळालीच नाही ! त्यात जंगलात कुठे पोचलो हेही कळेना. त्यातच तहान-भुकेने सारे हैराण झालेले. राजा आणि त्याच्या बरोबरचे १२/१५ जण पार वैतागून गेले होते. ‘अरे, किमान पाणी कुठे मिळेल का हे तरी बघा !’ राजाने चिडूनच आज्ञा केली. शोधाशोध केल्यावर एक कुटी दिसली. तिथे काही सोय होईल म्हणून सारे तिकडे गेले. हाय ! एकादशीच्या घरी महाशिवरात्र ! मातीची चार भांडीकुंडी, दगडाची चूल आणि लंगोटीवरचा एक कृश माणूस ! ही जागा शोधणाऱ्या सैनिकावर राजा भडकला. ‘हाच मरु लागला आहे, आपल्याला काय मिळणार ?’ राजाने दरडावून विचारले. राजाच्या बोलण्याने ती कृश व्यक्ती भानावर आली. डोळे उघडून ती म्हणाली, ‘ कोण आहात आपण ? काय पाहिजे आपल्याला ?’ एक सैनिक म्हणाला, ‘ हे राजे आहेत. आम्ही जंगलात भरकटलो. तहान-भुकेने हैराण झालो आहोत.’ ती व्यक्ती म्हणाली, ‘चिंता का करता ? समोर जी चार झाडे आहेत त्याखाली बसा. डोळे मिटून काय काय पाहिजे ते सांगा. सारे मिळेल’ राजाला अधिकच संताप आला. पण ‘मरता क्या न करता’ म्हणत तो आणि सारेच झाडाखाली बसले. डोळे मिटून हवे ते मागितले. आण

फक्त प्रेम करा !

*फक्त प्रेम करा !* सख्खा भाऊ , सख्खी बहीण , सख्खी मैत्रीण सख्खे काका , सख्खी काकू , सख्खी मावशी  नेमकं काय असतं हे " सख्ख प्रकरण ? "  सख्खा म्हणजे आपला  सख्खा म्हणजे सखा सखा म्हणजे जवळचा जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही , केंव्हाही , काहीही सांगू शकतो  त्याला आपलं म्हणावं , त्याला सख्ख म्हणावं ! ज्याच्या जवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो   मोठ्ठ्याने हसू शकतो किंवा  काळजातलं दुःख सांगून स्फुंदु स्फुंदु रडूही शकतो त्याला सख्ख म्हणावं , त्याला आपलं म्हणावं ! ज्याच्याकडे गेल्यानंतर  आपलं स्वागत होणारच असतं  आपल्याला पाहून त्याला हसू येणारच असतं अपमानाची तर गोष्टच नसते  फोन करून का आला नाहीस अशी तक्रारही नसते ! पंढरपूरला गेल्यावर  विठ्ठल म्हणतो का ..... या या फार बरं झालं ! माहूर वरून रेणुका मातेचा  किंवा कोल्हापूर वरून महालक्ष्मीचा किंवा तिरुपतीहून गिरी बालाजीचा आपल्याला काही Whatsapp call आलेला असतो का ? या म्हणून ! मग आपण का जातो ? कारण भक्ती असते , शक्ती मिळते आणि संकट मुक्तीची आशा वाटते ....म्हणून ! हा ही एक प्रकारचा *" आपलेपणाच !"* लौकिक अर्थाने , वस्तूच्या स्वरूपा

बोधकथा - जगातील तीन अनमोल गोष्टी

राजा सूर्यसेनचे राज्‍य प्रतापगड इथपर्यंतच मर्यादित होते. आणखी काही राज्‍ये त्‍याच्‍या अधीन होती. राजाला एक मुलगी होती. ती दिसायला फार सुंदर आणि बुद्धिमान होती. ती लग्‍नाच्‍या वयाची झाल्‍यावर राजाने तिच्‍यासाठी वर पाहाणे सुरु केले. त्‍याची इच्‍छा अशी होती की, आपल्‍या मुलीचा विवाह वीर आणि बुद्धिमान मुलाशी व्‍हायला पाहिजे. जो आपल्‍यानंतर या राज्‍याचा योग्‍यप्रकारे सांभाळ करू शकेल. राजकुमारी आणि राज्‍यावर अनेक राजकुमारांची नजर होती. मात्र राजा सूर्यसेनने एक कठीण अट ठेवली होती. जेव्‍हा जो कोणी विवाहाचा प्रस्‍ताव ठेवित असे तेव्‍हा राजा त्‍याला संसारातील सर्वात मौल्‍यवान वस्‍तू घेऊन ये असे सांगत असे व लोभी व्‍यक्तींना धडा बसविण्‍यासाठी त्‍याने पुढे अट ठेवली होती की ती वस्‍तू मला आवडली नाही तर मी त्‍याला कारागृहात टाकणार. अनेक राजकुमार वेगवेगळ्या वस्‍तू घेऊन आले परंतु राजाने त्‍या वस्‍तूंना असहमती दर्शवत त्‍यांना कारागृहात टाकले.  राजाला विश्वास होता की, एक ना एक दिवस कोणी ना कोणी बुद्धीमान वीर पुरुष आपल्‍या राजकन्‍येसाठी ही अट पूर्ण करेल. एके दिवशी त्‍याच्‍याच राज्‍यातील एका छोट्या खेडयातील ए

बोधकथा - सकारात्मक पाऊल

एक माणूस आपल्या घरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरील एका तीर्थक्षेत्राला भेट देण्याचे अनेक वर्षांपासून ठरवत असतो. अंतर खूप असल्याने साधारण रात्री 2 वाजेदरम्यान काळोखातच दर्शनासाठी चालत जावे लागत असे. काही झाले तरी त्या तीर्थक्षेत्राला भेट द्यायचीच, असा ठाम निश्चय मनाशी करत तो गावकर्‍यांना व त्या तीर्थक्षेत्राला भेट देणार्‍या भाविकांना मार्ग व सोबत लागणार्‍या सामानाविषयीची  माहिती विचारतो. *गावकरी* त्याला आवश्यक सामानाची यादी देतात. सोबत कंदील घेऊन जा, असा सल्लाही देतात. *मनाशी* निश्चय केल्याप्रमाणे तो रात्री 2 वाजता तीर्थक्षेत्राकडे निघतो. अंधार असतो. कंदिलाच्या प्रकाशात त्याला केवळ दहा पावलांच्या अंतरावरील रस्ताच दिसत असतो. तो मनाशी विचार करतो... 20 किलोमीटरचा रस्ता आणि अशा अंधारात कंदिलाच्या मंद प्रकाशात केवळ काही अंतरावरचेच दिसतेय. त्याची पावले जागीच थबकतात.  *त्याच्या* मागोमाग एक साधु महाराज त्याला येताना दिसतात. तो साधुला थांबवतो व म्हणतो, तुमच्याकडे तर माझ्या कंदिलापेक्षाही मंद प्रकाश देणारा कंदील आहे. रस्ता धोकादायक आहे. तुम्ही जाऊ नका ?  साधु हसतो. त्याला म्हणतो, ‘अरे एकदाच दह

थोडं प्रेम स्वतः वरही... | Marathi Audio story | Audiobook

इमेज
पहिला फ्री मराठी ऑडिओ ब्लॉग ऐका आणि इतरांना पण शेअर करा | First Free Marathi Audio Blog आयुष्यात आलेला 'एखादा काळ' हा वाईट नसतोच, वाईट असते ती त्या काळातली आपली परिस्थिती, काळाशी दोन हात करतांना आपली सतत कमी पडत राहाणारी उर्जा, आपल्यातली मानसिक आंदोलने आणि त्या काळातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी आपली होत असणारी तडफड. ही तडफड जितकी जास्त होते , जगण्याची...जगण्यावर प्रेम करण्याची उर्जा तितकी जास्त वाढत जाते. दुःख माणसाला जिवंत राहाण्याची, आयुष्यावर नव्याने प्रेम करण्याची उर्मी देतं. द्यायला हवं... पण... जर आपलं स्वतःवरही प्रेम असलं तरच हे होऊ शकतं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थीपणा कधीच नसतो. ती भेट असते ...आपण स्वतःला दिलेली.  कुणीतरी येईल , आपल्याला आनंद देईल ही वाट बघत बसण्यापेक्षा आपण स्वतःच स्वतःला आनंद देणारे होऊ शकतोच पण बर्‍याचदा माणसे स्वतःवर प्रेम करण्यासाठीही इतरांची वाट पाहाण्यात आयुष्य घालवतात... प्रेम म्हणजे स्वतःपर्यंत पोहोचण्याचा प्रवास असतो. जगण्याचा प्रवास असतो. आयुष्याची ओढ असते आणि जिवंतपणाशी जुळलेली नाळ असते... ओसाड जागी पावसात दा

◾बोधकथा :- स्वप्न आणि सत्य

इमेज
एकदा स्व‍प्न‍ आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. भांडणाचा विषय होता... ’भविष्य  घडविण्याात सर्वाधिक सहभाग कोणाचा असतो’ दोघेही खूप भांडले, भरपूर वाद घातला पण निर्णय काही होईना.  शेवटी दोघेही आपल्या पित्याकडे गेले. पित्याला वादाचा विषय सांगितला. पिता म्हणाला,’’ज्याचे कोणाचे हात आभाळाला टेकतील पण तरीही पाय जमिनीवर असतील त्याचा भविष्य घडविण्यात निर्णायक सहभाग असतो.’’  दोघेही परत आले. सर्वप्रथम स्वप्नाने एकाच उडीत हात आभाळाला टेकवले, मात्र पाय जमिनीपासून केव्हाच उचलले गेले होते.  मग सत्याने प्रयत्न केला मात्र त्यााचे पाय कायम जमिनीवर टेकलेले होते पण हात आभाळाला पोहोचू शकले नाहीत. दोघांनीही खूप प्रयत्न केले पण दोघेही अयशस्वी‍ राहिले. शेवटी थकून ते पुन्हा एकदा पित्याकडे गेले तेव्हा पिता म्हणाला,’’ भविष्य घडविण्यासाठी सत्य आणि स्वप्न या दोघांचाही समान सहभाग असतो.’’ तात्पर्य ~ ख-या अर्थाने भविष्य घडवायचे असेल तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे राहायला हवे. ______________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-  सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾बोधकथा :- झाकली मुठ सव्वा लाखाची

इमेज
एकदा एका राजाच्या घरी, धार्मिक कार्य करण्यासाठी एक भटजी जातात. धार्मिक कार्य पार पडल्यावर दक्षिणा म्हणून राजा त्यांना काही रुपये देऊ करतात. ती दक्षिणा, आपल्या मुठीत घेऊन तो ब्राम्हण राजदरबारातून बाहेर पडतो.  गावातील सर्व लोकांना माहित असतं, कि राजाच्या घरी आज काहीतरी पूजा अर्चना आहे. आणि, ते भटजी जसे मुख्य गावात येतात. तशी त्यांच्यापाशी लोकांची एकच झुंबड उडते. आणि एक कुतूहल म्हणून सगळी लोकं त्यांना विचारणा करतात. राजाने, दक्षिणा म्हणून तुम्हाला काय दिलं आहे..? भटजी महाचतुर असतात, ते म्हणतात.. मी तुम्हाला ते असं सांगणार नाही. तुम्हीच ते ओळखा. आणि या ओळखा ओळखीच्या खेळाचं कधी एकदा पैजेत रुपांतर होतं. हे कोणालाच समजत नाही.  एक व्यक्ती म्हणतो.. तुमच्या मुठीत झाकलेली जी काही वस्तू असेल. ती मी दहा हजार रुपयात विकत घ्यायला तयार आहे. तर दुसरा व्यक्ती, लगेच वीस हजाराची बोली लावतो. तिसरा, चौथा, पाचवा, सहावा..असं करता करता ती बोली वाढतच जाते.  आणि बघता बघता हि बोली अगदी एक लाखावर येऊन पोहोचते. आता बाकी सर्व लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. कि त्या झाकल्या मुठीत नेमकं काय असेल..? बाहेर चालू असलेला

◾बोधकथा :- राज-ज्योतीष भरती

इमेज
     ╔═════ ▓ ࿇ ▓ ═════╗     बोधकथा       ╚═════ ▓ ࿇ ▓ ═════╝ अवंतीनगरीचे राजे बाहुबली यांना राजज्‍योतिष्‍याची गरज होती. मंत्रिपरिषदेसमोर त्‍यांनी ही इच्‍छा व्‍यक्त केली. राजज्‍योतिषाबाबत घोषणा केली जावी आणि पात्र व्‍यक्तिला निरखुन पारखून नियुक्त केले जावे अशी सर्व मंत्रिगणांनी सर्वसहमतीने ठरवले. या पदासाठी पात्र उमेदवारांनी मुलाखती द्याव्‍यात अशी दवंडी दुस-या दिवशी राज्‍यात पिटवण्‍यात आली. सर्व उमेदवार ठरलेल्‍या वेळी दरबारात उपस्थित झाले. राजाने स्‍वत:च मुलाखती घेण्‍यास सुरुवात केली. अनेक ज्‍योतिष्‍यांनी आपल्‍या ज्ञानाचे सादरीकरण करण्‍यास सुरुवात केली परंतु राजाचे समाधान झाले नाही. अखेरीस तीन ज्‍योतिषी उरले त्‍यातील पहिल्‍या ज्‍योतिष्‍याला राजाने विचारले,”तुम्‍ही भविष्‍य कसे सांगता” ज्‍योतिषी म्‍हणाला,”नक्षत्र पाहून” राजाने दुस-या ज्‍योतिष्‍याला हाच प्रश्‍न विचारला तेव्‍हा दुसरा ज्‍योतिषी म्‍हणाला,”हस्‍तरेषा पाहून भविष्‍य सांगतो. ” तर तिसरा ज्योतिषी उत्तरला  "फासे टाकून खात्रीलायक भविष्य वर्तवितो." परंतु राजाला कुणाचीच उत्तरे आवडली नाहीत. अचानक राजाला तेव्‍हा आपल्‍या राज्‍या

◾बोधकथा :- हार जीत

इमेज
एका महाविद्यालयात संजय नावाचा एक विद्यार्थी शिक्षण घेत होता. अभ्यासाबरोबरच तो खेळातही प्रवीण होता. तो एक उत्कृष्ट नेमबाज होता. चांगले गुण व विनम्रता यामुळे तो शिक्षकांमधेही प्रिय होता. एकदा महाविद्यालयात वार्षिक महोत्सव होता. यात नेमबाजीचीहि स्पर्धा ठेवण्यात आली होती. इतर ठिकाणाहूनही अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. प्राचार्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याशी परिचय करून घेताना दुसऱ्या महाविद्यालयातील गणेश नावाचा एक विद्यार्थी प्राचार्यांना मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला,"सर! मी संजयपेक्षाही जास्त अचूकतेने नेम साधू शकतो. संजयला पराजित करणे हे माझे उद्दिष्ट आहे." प्राचार्य मंदसे हसले आणि पुढे गेले, कारण त्यांना माहित होते कि संजयला हरवणे इतके सोपे काम नाही. स्पर्धा सुरु झाली. स्पर्धेचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. एका धाग्याला एक लाकडी फळ बांधले होते, त्याचा वेध नेमबाजांनी घ्यायचा होता. सर्व नेमबाजांनी प्रयत्न करून पाहिले पण त्यांना यश मिळाले नाही. फक्त गणेश आणि संजय हे दोघेच मुख्य प्रतिस्पर्धी उरले. गणेशने यावेळी पुढाकार घेतला. त्याने पहिला नेम साधला तो अचूकपणे,

◾बोधकथा :- कर्म हीच पूजा | रामकृष्ण परमहंस

इमेज
एकदा एक बाई रामकृष्ण परमहंसाकडे आल्या आणि म्हणाल्या , " मला या संसाराचा विट आला आहे . मुलं मोठी झाली. आता... प्रपंच सुटेल असे वाटले. पण... नातवंडांच्या प्रेमात पडले . रोज त्याला सांभाळावे लागते . परंतु आता घर सोडायचा विचार आहे . "  रामकृष्णांनी विचारले ,  " घर सोडून तुम्ही काय  करणार ? " त्या बाई म्हणाल्या ,  " गंगेच्या तीरावर एक झोपडी बांधणार . त्यात श्रीकृष्णाची मूर्ती बसविणार . रोज त्या मूर्तीची पूजा करणार . कृष्णाला नेवैद्याने जेवू घालणार . कृष्णाला झोपेतून उठविणार, आंघोळ घालणार." परमहंसांनी विचारले, " श्रीकृष्णाची मूर्ती दगडाची असणार ना ? " तेव्हा त्या बाई ' हो ' म्हणाल्या . रामकृष्णांनी विचारले ,  " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार ? "  त्या बाई ' हो ' म्हणाल्या .  त्यावर रामकृष्ण म्हणाले .  "आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार , मग नातवंडामध्ये श्रीकृष्ण का पाहत नाहीत ? श्रीकृष्ण समजून नातवंडाला जेवू घाला. श्रीकृष्ण म्हणून आंघोळ घाला. श्रीकृष्ण म्हणून त्याला झोपवा. "   तुम्ही तुमच्या नातवंडानाच तु

◾बोधकथा :- खरे ऐश्वर्य

इमेज
आध्यात्मिक साधनेत रममाण असणारी एक महिला डोंगराळ प्रदेशातून प्रवास करत होती.चालता चालता ती एका ओढ्याकाठी पोहोचली, उन्हात चालून ती दमली होती, तिला तहानही लागली होती, ती ओढ्यापाशी थांबली, गार पाण्याने तोंड धुतले, पाणी प्यायली, आपल्या पिशवीतून खाण्याचे पदार्थ काढले आणि झाल्यावर पुढे निघाली. तेवढ्यात तिला पाण्यात काही मौल्यवान रत्ने दिसली, तिने ती रत्ने उचलून आपल्या पिशवीत ठेवली. दुसऱ्या दिवशी तिला एक प्रवासी भेटला, त्याला भूक लागली होती, तिने आपली पिशवी उघडून त्याला खायला दिले. उघड्या पिशवीत ठेवलेले रत्न प्रवाशाला दिसले त्याने त्या महिलेला मागितले, तिने क्षणाचा विचार ना करता आणि कुठलेही विचार मनात न आणता ते रत्न त्या प्रवाशाला देवून टाकले. प्रवासी आनंदून निघून गेला. त्याला माहित होते कि ते रत्न विकून त्याला इतका पैसा मिळेल कि त्यात त्याचे आयुष्य सुखात तो सुखात जगू शकेल. पण काही दिवसानंतर तो त्या महिलेला परत भेटला आणि तो तिला शोधात आला होता. त्याने त्या महिलेला ते रत्न परत केले आणि म्हणाला," तुमच्याकडून रत्न घेतल्यावर अगदी नि:स्पृहपणे ते रत्न देतानाचा तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर सारख

◾बोधकथा :- मदत...

इमेज
वीरगडचा राजा सूर्यप्रताप दयाळू आणि परोपकारी होता. त्याच्या राज्यातील एका गावात एकेवर्षी पाऊस पडला नाही. दुष्काळाची स्थिती निर्माण झाली. त्या गावात रामचरण नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. दुष्काळामुळे त्याच्या घरात खाण्यासाठी काहीही शिल्लक नव्हते, राजाने मदत पाठविली पण गावातील मुखियाने आपल्याच लोंकाना त्या मदतीचा लाभ दिला. जेंव्हा रामचरण मदत मागण्यासाठी गेला तेंव्हा मुखिया त्याला रागावला, आणि त्याला हाकलून दिले. रामचरणची पत्नी आणि मुलाने भुकेने तडफडून जीव टाकला. तेंव्हा रामचरणने वैराग्य स्वीकारले आणि एका साधूच्या दलासोबत तो निघून गेला. साधू दिवसभर भिक्षा मागत असत आणि रात्री मादक पदार्थ खावूनपिवून चोऱ्या करीत असत. चुकीच्या संगतीमुळे रामचरणही नकली ज्योतिषी बनून पैसा जमा करीत असे. त्याने दिवसभर फिरून लोकांविषयी माहिती गोळा करत असे व त्या माहितीचा वापर करत रात्री ज्योतिषाचा वेष धारण करून लोंकाना मूर्ख बनवीत असे. जेंव्हा तो ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध झाला तेंव्हा राजा सूर्यप्रताप त्याला भेटण्यासाठी आला. परंतु त्याने येण्याआधी त्याची सत्यता पडताळून पाहिली, रामचरणचे खरे रूप राजाला समजले, सैनिकां

◾बोधकथा :- मासा आणि हंस

एका सरोवरात एक मासा राहत होता. तिथेच एक हंस येत असे. त्या दोघांची घनिष्ट मैत्री होती. दोघेही एकमेकांशी भरपूर गप्पा मारत असत. रात्र झाल्यावर मासा सरोवराच्या तळाला जात असे तर हंस जवळच्या झाडावर झोपत असे. सकाळ झाल्यावर हंस कुठेतरी जात असे आणि परत माशाला भेटावयास येत असे. एकेदिवशी माशाने हंसाला विचारले,"तू रोज सकाळी इथून उडून जातो हे मी पाहतो. पण तू कुठे जातो हे तू मला कधीच सांगितले नाहीस" हंस म्हणाला,"अरे मित्रा ! मी समुद्राकडे जात असतो. कारण समुद्रात भरपूर शिंपले असतात. त्या शिंपल्यातून निघणारे मोती मला हवे असतात. कारण माझे अन्नच मोती आहे. मी हंस आहे मी फक्त मोतीच खातो. त्यामुळे मला रोजच समुद्रावर जावे लागते." हे ऐकून मासा म्हणाला,"मित्रा ! मलाही एकदा समुद्र बघायचा आहे." मित्राची अशी इच्छा पाहून हंस म्हणाला,"येथून थोडे पुढे गेल्यावर एक नदी आहे, ती समुद्राला मिळते, तू त्या पोहोच." त्यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, सरोवराचे पाणी जावून नदीला मिळाले तसा मासाही नदीच्या पाण्यात पोहोचला. नदीचा प्रवाह फार जोरात असल्याने मासा अतिशय वेगाने समुद्राक

◾बोधकथा :- लालसा

इमेज
एका गावात चोर चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता. इकडे तिकडे फिरत असता गावकऱ्यांनी त्याला पकडला आणि झाडाला बांधून घातले. मग गावकरी विचार करू लागले याला काय शिक्षा द्यावी का गावातील मुख्य माणसाला विचारावे? या विचारातून असे ठरले कि मुख्य माणसाला बोलावून आणायचे आणि चोराला शिक्षा करायची. सगळे गावकरी त्या चोराला एकटे त्या झाडाला बांधून मुख्य माणसाला बोलावण्यास गेले. काही वेळ गेल्यावर त्या रस्त्याने एक मेंढपाळ जात होता, त्याने त्या चोराला झाडाला बांधलेले पाहिले, त्याला उत्सुकता वाटली त्याने त्या चोराला विचारले,"तू कोण आहेस? तुला असे कोणी बांधून ठेवले आहे? तू काय गुन्हा केला आहेस?" चोराने विचार केला हि सुटायची चांगली संधी चालून आली आहे. चोर म्हणाला, "अरे काय सांगू मित्रा ! मी आहे एक फकीर ! इथे काही चोर आले होते. लोकांची लुट करून ते धन मिळवतात आणि त्याचे पाप लागायला नको म्हणून त्यातील काही धन दान करतात.गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना कुणी फकीर दानासाठी गाठ पडला नव्हता. ते धन घ्या म्हणत होते पण कुणी त्यांचे धन घेतच नव्हते. अशातच त्यांनी त्यांनी मला दान घ्यावे म्हंटले पण मी नकार द

◾बोधकथा :- किस्सा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा

इमेज
नेताजी सुभाषचंद्र बोस हे जन्‍मजात हुशार होते. त्‍यांच्‍या वडील वकिलांची इच्‍छा होती की, मुलाने आयसीएस अधिकारी बनावे. वडिलांची इच्‍छा पूर्ण करण्‍यासाठी सुभाषबाबू इंग्‍लंडला गेले आणि आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण केली.  परंतु त्‍यांचा इंग्रजांच्‍या गुलामीला विरोध होता. त्‍यांच्‍यात राष्‍ट्रसेवेची प्रबळ इच्‍छा होती. एकीकडे आयसीएसचे उच्‍च पद होते तर दुसरीकडे सेवेचा कठीण त्‍यागमय मार्ग होता. याचे त्‍यांच्‍या मनात अंतर्द्वंद्व चालू होते. शेवटी सेवेचा भाव जिंकला आणि नोकरी करायची नाही असा निर्णय त्‍यांनी घेतला. त्‍यांनी आपला राजीनामा मंत्री मॉंटेग्‍यू यांच्‍याकडे सोपविला. भारतीय कार्यालयात त्‍यांच्‍या वडिलांचे मित्र विल्‍यम ड्युक यांनी त्‍यांचा राजीनामा आपल्‍याजवळ ठेवून त्‍यांच्‍या वडिलांना सूचना पाठविली. वडिलांनी उत्तर पाठविले,’’ मी माझ्या मुलाच्‍या या कार्याकडे गौरव म्‍हणून पाहतोय. मी त्‍याची ही अट मान्‍य करण्‍यासाठी त्‍याला विलायतेला पाठविले होते.’’ विल्‍यम ड्युक या उत्तराने हैराण झाला. त्‍यांनी सुभाषचंद्र यांना विचारले,’’ तरूणा, तुझ्या उदरनिर्वाहाची तू काय सोय करणार आहेस ?’’ सुभाषबाबू पटकन उत्

◾बोधकथा :- सत्कारणी दान

एका गावात शिमक नावाचा एक धनवान माणूस राहत असे. फार विचारपूर्वक तो आपला पैसा खर्च करत असे. त्याने कधीही पैशाचा दुरूपयोग केला नाही. त्यामुळेच त्याला लोक 'कंजुष' म्हणत असत. लोक काय म्हणतील याचा त्याने कधीच विचार न करता आपला पैसा जोडून ठेवला होता.          एकदा त्याला खूप ताप आला. त्याच्या मुलांनी व नातवांनी त्याच्यावर उपचार करण्याचे सुचविले असता शिमक म्हणाला,'' औषधांनी केवळ तापाचा प्रभाव कमी होईल पण रोग समूळ नष्ट होणार नाही. निसर्गनियमानुसार ताप आपोआप कमी होऊन जाईल व मी बरा होईन''           शिमकच्या या गोष्टीचीही लोकांनी कंजुषपणातच गणना केली. शिमकने सर्वाचे म्हणणे ऐकले पण तो आपल्या मनाला येईल तेच योग्य याप्रमाणे वागत राहिला. त्याच्या नगरातील एक विद्वान आचार्य महिधरांनी वेदांवर काही ग्रंथ लिहीलेले शिमकच्या कानी आले. पण आचार्यांचयाकडे ते ग्रंथ प्रकाशन करण्यासाठी पुरेसे धन उपलब्ध नव्हते. शिमकला ही माहिती मिळताक्षणी तो आचार्यांकडे गेला व म्‍हणाला, ''आचार्य, ज्ञान हे प्रवाही असावे. ज्ञानाचा प्रभाव हा समाजकारणासाठी झाला पाहिजे. ज्ञान वाटूनच समाजातील अनेक दुष्प्रभ

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...