भीम शिळा, केदारनाथ धाम, उत्तराखंड

भीम शिळा, केदारनाथ धाम, उत्तराखंड.

मला इथेच कोणीतरी या भीम शिळेचा फोटो असेल तर दाखवता का असं विचारलं होतं. त्यांनी केदारनाथला २०१३ च्या महाप्रलयापूर्वी भेट दिली होती, त्यामुळे त्या घटनेत ते मंदिर वाचवणाऱ्या शिळेत त्यांना विशेष रस होता. त्यामुळे म्हटलं, या शिळेवर एक लेख लिहुया... 

२०१३ च्या त्या भयंकर प्रलयाच्या वेळी या शिळेमुळे हे मंदिर सुरक्षित राहिलं आणि या घटनेने देव न मानणारेही बुचकळ्यात पडले. काही ना काहीतरी तिकडे नक्कीच घडून गेले आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. दैवी शक्तीचा चमत्कार, यावर या लोकांचा विश्वास नसतो पण जेव्हा मुद्दा या शिळेचा निघतो तेव्हा या लोकांकडे विरोधाला मुद्दा नसतो. 

१६ जून २०१३ ला काय घडलं हे मी वेगळं लिहिण्याची गरज नाही. केदारनाथ मंदिर सगळ्या प्रकारच्या अतिक्रमणाने, व्यावसायिकीकरणाने वेढलं गेलं होतं आणि आता बघा, मंदिर मोकळा श्वास घेत आहे. 

सगळं काही वाहून गेलं पण केदारनाथ मंदिर मात्र जसं होतं तसंच राहिलं. कारण, ही भीम शिळा. या मंदिराला वाचवणारी शिळा म्हणून आज भाविक तिची पूजा करतात. 

त्यावेळी नक्की काय घडलं, याबद्दल त्यावेळी तिथे उपस्थित असणार्‍या लोकांनी माहिती दिली आहे. या लोकांनी या शिळेला येताना पाहिलं होतं. मंदिराच्या मागच्या हिमालयाच्या शिखरावरून एक खूप मोठी शिळा प्रचंड वेगाने केदारनाथ मंदिराच्या दिशेने येताना त्यावेळी लोकांनी पाहिली. कुठे काही शिल्लक राहिलं नव्हतं, सगळं वाहून गेलं होतं आणि आता हे उरलं सुरलं मंदिरही या शिळेच्या आदळण्यामुळे उध्वस्त होणार असंच या लोकांना वाटलं. पण घडलं वेगळंच. मंदिर जसजसं जवळ येऊ लागलं, तसा या शिळेचा वेग एकदम कमी झाला आणि मंदिराच्या जवळ येताच ती शिळा अचानक जागच्या जागी थांबली. ज्या लोकांनी या शिळेला जबरदस्त वेगाने वरून येताना पाहिलं होतं, त्यांच्यासाठी या शिळेचा हा संपूर्ण प्रवास अचंबित करणारा होता. 

मंदिराच्या जवळ येताच ती शिळा जागच्या जागी स्थिर झाली आणि त्याच वेळी पायांचे मोठमोठे आवाज येऊ लागले. लोकांना त्या शिळेच्या इथे पायांचे स्पष्ट आवाज तर ऐकू येत होते पण दिसत कोणी नव्हतं. एखादी अदृश्य शक्ती तिथे आपलं काम करीत असावी असं प्रत्यक्ष बघणाऱ्या लोकांना वाटलं आणि जेव्हा पायांचे आवाज थांबले तेव्हा ती शिळा मंदिराच्या बरोबर मागे मधल्या जागी स्थापित झालेली होती. 

शिळा बरोबर जागी बसली आणि तिथला पाऊस अजून वाढला. मंदिराच्या मागून प्रचंड वेगाने पाणी खाली येऊ लागलं आणि ते त्या शिळेला येऊन जोरजोरात आदळू लागलं. यामुळे पाण्याचं विभाजन झालं आणि दोन्ही बाजूंनी हे पाणी वाहू लागलं. पाण्याचा प्रवाह मंदिराच्या दिशेला आलाच नाही आणि त्यामुळे हे मंदिर वाचलं, या शिळेने मंदिराला वाचवलं. 

मंदिर वाचलं, त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी ज्या लोकांनी या मंदिरात आश्रय घेतला होता, ते लोकही वाचले. काळ तर आला होता, पण या लोकांची वेळ आली नव्हती. 

ही शिळा बरोबर मंदिराच्या रुंदीएवढीच आहे, त्यामुळे संपूर्ण मंदिर सुरक्षित राहू शकलं. शास्त्रज्ञ आता याचा अभ्यास करीत आहेत की या शिळेच्या प्रकटीकरणामागे नक्की काय आहे ? त्यांना अजून तरी काहीच सापडलेले नाही. 

तर, हे आहे ईश्वराच्या अस्तित्वाचं प्रत्यक्ष प्रमाण म्हणजेच भीम शिळा 🙏🏻

मंजूषा थत्ते-जोगळेकर
सुनील इनामदार,संग्रहक

___________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

आपली सहल खूप छोटी आहे ... Short Tour

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट