पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

◾परिचय :- डॉ. जयंत नारळीकर...... अत्यंत साध्या जगण्याची गोष्ट

इमेज
डॉ. जयंत नारळीकर...... अत्यंत साध्या जगण्याची गोष्ट !    आकाशगंगा या आयुकाच्या (म्हणजे Inter University Centre for Astronomy and Astrophysics - IUCAA) हाउसिंग कॉलनीमध्ये राहायला गेले तेव्हा डॉ. जयंत नारळीकर व सौ. मंगला नारळीकर यांच्या समोरचेच घर माझ्या भाग्याने मला मिळाले. असा दुर्मिळ शेजार आम्हाला लाभला होता. डॉ.  नारळीकरांची एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी म्हणून सुमारे दहा वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांचे शेजारी म्हणून राहण्याचीही. सरांचे नाव आणि कीर्ती इतकी मोठी की नव्याने कामाला सुरुवात केली तेव्हा त्याचे दडपणच मनावर अधिक होते. पण सर वागायला इतके साधे की कित्येकदा त्यावर विश्वासच बसत नसे.    ऑफिसमध्ये ते वेळेआधी दहा मिनिटे पोहचलेले असत. घड्याळाच्या काट्याबरहुकूम मेल पहाणे, मेलला उत्तरे म्हणून डिक्टेशन, पत्रे टाइप झाली की सह्या, रोज कोणत्यावेळी कोण येणार यासंबंधीचा दिवसाचा आराखडा त्यांच्यासमोर दिला जाई. त्यानुसार ते त्या त्या संबंधीचे कागदपत्र मागवून स्वत:जवळ ठेवून घेत.      सरांच्या भेटीला येणार्‍या लोकांमध्ये देशोदेशीचे शास्त्रज्ञ, सरकारी अधिकारी, विद्यापीठातील मान्यवर, देशी-

◾जिवन मंञ :- सुख कशात आहे...

इमेज
“सुख कशात आहे” आज सकाळी वाचलं की, म्हणे पैशाने सुख मिळते. आता ही गोष्ट खरी असली की जर रडायचं असेल तर ते मर्सिडीजच्या स्टेअरिंग वर डॊकं ठेऊन रडावं, रस्त्यावर कुठेतरी कोपऱ्यात किंवा आपल्या घरातल्या फाटक्या उशीवर डोकं ठेऊन रडण्यात काय फायदा? तर म्हणून मला वाटतं सुखाची परिभाषा अशी असावी. सुख, समाधान, आणि आनंद या तीन गोष्टीं आणि दुःख ही चौथी गोष्ट! या गोष्टींच्या आसपास आपलं आयुष्य फिरत असतं. तसं म्हटलं तर सुख, आनंद आणि समाधान हे तिन्ही शब्द एकसारख्याच अर्थाचे वाटतात – पण तसे नाही. एखाद्या गोष्टी मध्ये सुख जरी असले तरीही त्यात समाधान असेलच असे नाही. किंवा एखादी आनंद देणारी गोष्ट सुख देईलच असे नाही. सुख आणि आनंद हा क्षणिक असतो, पण समाधान हे तसे नसते. एक गोष्ट बघा, समजा तुम्ही रेल्वे स्टेशन मध्ये प्लॅटफॉर्म वर उभे आहात. समोरून दोन गाड्या अगदी इतक्या गच्च भरलेल्या होत्या की तुम्हाला आत शिरायला मिळाले नाही. मग तुमच्या मनात विचार येतो, की जर आत शिरायला मिळालं, तरीही पुरेसे आहे. तुम्हाला तिसऱ्या रेल्वेत आत शिरायला मिळतं. तुम्ही दोन सिटच्या मधे जाउन उभे रहाता. पुढला मनातला विचार – जर जा

◾कविता :- तुजविण शून्य ...

इमेज
➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖ ‼ ' मराठीचे शिलेदार कविता ' समूहात काल देण्यात आलेल्या विषयावर निवडक सदस्यांनी केलेले ' कविता लेखन'.‼ ➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖ मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम ➖➖➖➖🌸🌈🌸➖➖➖➖ ♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾      🙏विषय :-  तुजविण शून्य🙏        🎋 दिनांक:-२९ जानेवारी २०२१ 🎋 ♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾ "जगणे ते माझे जाहले आता तुजविण शून्य" "कशाचीही सर नाही येणार भेटले जरी अन्य" "सहवास लाभला तुझा झालो मी जीवनी धन्य" "आता उरल्यात आठवणी जग हे तुझ्याविना शून्य" "तुझ्या सहवासात होतो सुखी समाधानी आनंदी"  "होतीस तू फक्त निरागस  निर्मळ मनाची स्वच्छंदी" "या जन्मी तरी तुझ्यासारखी भेटणार नाही सखी सोबती" "नाही मिळणार तो सहवास जरी भेटले अवती भोवती" "लाभले ते क्षण सुखाचे केले तू कितीतरी पुण्य" "तुझ्याच आठवणीत राहीन बाकी फक्त तुजविण शून्य" ✍️ श्री हणमंत गोरे मुपो:घेरडी,ता:सांगोला,जि:सोलापूर (©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह) 🌀❄️🌀❄️🌀❄️🌀❄️🌀 ➖ तुजविण शून्य ➖               तुझ्या सोबतीनं सखे       सर्वांर्थी व

◾यशाचा मंञ :- एकटेपणा ....

इमेज
🙇  [एकटेपणा]  Copy paste from FB source 'थिं क पॉझिटिव्ह ' नावाचा एक दिवाळी अंक आज लायब्ररीत हाती आला.. आणि याची थीम आहे "ए कटेपणा ".  पूर्ण अंक याच विषयाला वाहिलेला आहे.  या दिवाळी अंकातील "एकटेपणातून बाहेर येण्याचा रियाज!"  हा श्री.ऐश्वर्य पाटेकर यांचा लेख वाचनात आला. सदर लेखक हे पहिल्या युवा साहित्य अकादमी पुरस्कार चे मानकरी आहेत, आणि त्यांची 'भुईशास्त्र' आणि 'जू' ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.  त्यांच्या या लेखातील एक सुंदर भाग खाली देत आहे.   ********* "मला आमच्या इथं गावातील बिया वाल्या बाईची गोष्ट आठवते. बिया वाली बाई. सतत बिया गोळा करत असायची. म्हणजे तेच तिचं आयुष्यभराचं काम होऊन गेलं होतं. जिथे बी खोचली तिथं झाड उभं राहायचं.  हा तिचा हात गुण होता की झाडा -कोडावरची माया? माहित नाही.  मी तिला माझ्या लहान वयापासून पहात आलो. ती सारखी बिया गोळा करायची. तिने पेरलेल्या  बियांमधून किती झाडे उगवून आली, याची मोजदाद कशी करणार? अगणित झाडं.  ज्या झाडाकडे बोट दाखवलं ते झाड बियावाल्या बाईनेच लावलेलं असायचं.  म्हणजे तसं पाहायला गेलं तर उगवून आलेल्

◾व्यवसाय मंञ :- मला अमेरिकेत शिक्षण घ्यायचे आहे म्हणून काम करतोय सर...

इमेज
शुद्ध बीजापोटी फळें रसाळ गोमटी गोव्याला जाताना वाटेत एक छोटं झोपडीवजा कॅन्टीन दिसलं, म्हणून चहा घेण्यासाठी थांबलो.  साधारणपणे विशीच्या वयाचा एक मुलगा ते कॅन्टीन सांभाळत होता. शेणानं सारवलेली जमीन, झोपडीच्या बाहेर ठिपक्यांची रांगोळी, झोपडीत ज्ञानेश्वर महाराजांचा चांगला फोटो होता. त्याला ताजा फुलांचा हार घातलेला होता.  बाहेरून दिसणारी झोपडी आतून मात्र चांगली स्वच्छ होती. कळकटपणा कुठेही दिसत नव्हता.  कामगारही नव्हते. खाण्याचे जिन्नस नव्हते, फक्त चहा आणि कॉफीच होती.  शुभ्र पांढरी बंडी आणि पायजमा अशा स्वच्छ पोशाखात तो मुलगा काम करत होता. सेल्फ सर्व्हिस होती. बिड्या-सिगारेट्स चा वास नव्हता, पान तंबाखूच्या पिचकाऱ्या नव्हत्या. चहाचे कप स्वच्छ होते आणि दर्जाही चांगला होता.  पिण्याच्या पाण्याची सोय वेगळी होती. साधेपणा आणि दारिद्र्य या दोन्ही गोष्टी पूर्ण वेगवेगळ्या आहेत. साधेपणाचाही एक वेगळा डौल असतो, रुबाब असतो. बाहेरून चांगली दिसणारी आणि आत गेल्यावर भ्रमाचा भोपळा फोडणारी अनेक हॉटेल्स असतातच. पण काही ठिकाणं आणि तिथली माणसं मनात घर करतात. मी चहा घेऊन निघालो आणि जाताना मात्र त्या मुलानं मला एक अन

◾कविता :- बाप्पा माझा लाडका

इमेज
'बाप्पा माझा लाडका' बाप्पा माझा लाडका, चिंतामणी तो, सर्वांची चिंता हारी, संकटी जगा तारी, बाप्पा माझा लाडका, विघ्नेश्वर तयाचे नाव, पुजिता जे भक्त, त्या भक्तांना, नसे विघ्न ठाव, बाप्पा माझा लाडका, वरद विनायक तयाचे नाव, भक्ती भावाने फुलला भक्तांचा गाव, बाप्पा माझा लाडका, असे गिरीजा सुत, म्हणून गिरीजात्मक तयाचे नाव, दिसे तयाच्या नजरेत मातृ भाव, बाप्पा माझा लाडका, आहे तो महागणपती, सर्व गुणांचा अधिपती, प्रत्येक कामाच्या शुभारंभाआधी, भकतगण त्याला पुजती,                     मंगेश शिवलाल बरई.                  हिरावाडी, पंचवटी, नाशिक-४२२००३. संकष्टी चतुर्थी च्या सर्वांना शुभेच्छा.        ➖➖➖➖➖➖🔴➖➖➖➖➖➖ दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील  Whatsapp  समुहा मध्ये  सहभागी व्हा -{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 📱 आवडल्यास नक्की शेअर करा 📱

◾कविता :- छोटसं एक गाव...

इमेज
"छोटसं एक गाव.....           तुझं गं आई" छोटसं एक गाव..... तुझं गं आई, नांदते तिथे, वात्सल्याची तुझ्या गं नवलाई, गंध तुझ्या प्रेमाचा.....  वाऱ्यासोबत गाई अंगाई, नाही तिथे..... दुरावा नात्यांचा, वाहे 'झरा' तिथे, फक्त माणुसकीचा, आहे तुच साऱ्यांची उत्तराई, छोटसं एक गाव...... तुझं गं आई, नाही तिथे..... विटा अन् मातीचे जंगलं, तुझ्या मायेने, सारं गावच आहे जागलं सारी तुझीच पुण्याई,        ➖➖➖➖➖➖🔴➖➖➖➖➖➖ दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील  Whatsapp  समुहा मध्ये  सहभागी व्हा -{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 📱 आवडल्यास नक्की शेअर करा 📱

◾कविता :- कल्पतरू

इमेज
'कल्पतरू'  आहे गं तुच गुरु, माझी कल्पतरु, छायेखाली तुझ्या लता ज्ञानाची माझ्या बहरली, तिमीरातुन अज्ञानाच्या, जिंग्दगि ही सावरली, मी तुला कसे विसरू ? आहे गं तुच माझी गुरु, माझी कल्पतरु, आलीस बनून... प्रत्येक वळणावर आयुष्याच्या तारणहार तु माझी, कशी गं ? भरु मी आता... रिती ओंजळ तुझी, लागलो मीच मला सावरु, आहे गं तुच गुरु, माझी कल्पतरु.   ➖➖➖➖➖➖🔴➖➖➖➖➖➖ दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील  Whatsapp  समुहा मध्ये  सहभागी व्हा -{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 📱 आवडल्यास नक्की शेअर करा 📱

◾कविता :- व्यथा

इमेज
"व्यथा" पाहून तुझी कामाची लगबग, होते माझ्याच मनाची तगमग, करत असते तू सतत कुटुंबासाठी धावाधाव, मात्र कोणाच्याही नजरेत दिसले नाही कधी.... तुझ्याबद्दल जराही आपुलकी चे भाव, कसं ग ? तुझं फाटकं नशीब हे आई, आठवते मला अजूनही तुझी ती अंगाई, लळीवार शब्दातूनच तुझ्या, फुटायचा माझ्यासाठी तुझ्या मायेचा पाझर, किल्मिष आज मनात माझ्या एकच, होतोय का ? माझ्याकडूनच 'त्या' अंगाई चा आदर, सवालांच्या  ह्या वावटळात मी आज अडकलो आहे गं आई, शोधू कुठे मी आज ? तुझी ती वात्सल्याची अंगाई, पसरला आहे चोहिकडे आज..... माणसात हरवलेल्या माणूसकीचा अंधार, आई आहे फक्त ह्या काळोखात माझा तुला अन् तुझा मला अधार, ऋनाणुबंधात आपल्या, उरली आहे फक्त एवढीच रग, पाहून तुझी कामाची लगबग, होते माझ्याच मनाची तगमग. ➖➖➖➖➖➖🔴➖➖➖➖➖➖ दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील  Whatsapp  समुहा मध्ये  सहभागी व्हा -{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 📱 आवडल्यास नक्की शेअर करा 📱

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

इमेज
घेतला गं  आई जन्म मी तुझ्या उदरी, म्हणूनच आयुष्यातली स्वप्नं सारी करतोय आज साजरी, केलच असेल गं आई  तु माझं बारसं अगदीच थाटामाटात, जन्माचा माझ्या कौतुक सोहळाच केला असेल तेव्हा साजरा तु गं आई रूबाबात, चालायला बोलायला आई तुच गं मला शिकवलं, संस्काराचं तुझ्या बालकडू मला पाजलं, आई खरच आहेच गं तु निसर्गाने माझ्यासाठी घडवलेली एक महान मुर्ती, तुझ्यामुळेच पसरली आहे आज चार-चौघात माझ्या यशाची किर्ती, कसा गं विसरू मी आई आयुष्यलं माझ्या अस्तित्व तुझं, मोठा आज झालो तरीही मायेला तुझ्या पारखं आयुष्य माझं.                             मंगेश शिवलाल बरई.                      हिरावाडी, पंचवटी, नाशिक-४२२००३.   असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आमचे   YouTube   चैनल   सबस्क्राईब   करा दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील  Whatsapp  व  Teligram   समुहा मध्ये सहभागी व्हा  -{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 📱 आवडल्यास नक्की शेअर करा 📱 धन्यवाद ह्या पैकी काय वाचायचे आहे ❓   कविता   बोधकथा   ललित लेख   जिवन मंञ   यशाचा मंञ   व्यवसाय   आरोग्य   विज्ञान व्हिडिओ विशेष लेख व्यक्ति पर

◾कविता :- टर ची कमाल ...

इमेज
वाचून बघा , नक्की हसाल  सगळी टर टर रे भाऊ नुसती टरटर टरटर ¤ टर ची कमाल ¤ दारुड्याला ग टर डॉक्टरला सिस्टर हॉटेलात वेटर पाण्याला हिटर घराला मिटर बसायला मोटर दूधाला लिटर उमेदवाराला वोटर चालवायला स्कुटर संदेश ला ट्विटर प्रेयसीला लेटर पावाला बटर मारामारी ला फायटर सिगारेटला लायटर दारुला वाटर सिनेमाला थेटर रंगवायला पेंटर थंडीत स्वेटर विजेला टेस्टर फळ्याला डस्टर बायकोला मिस्टर गणिताला कॅल्क्युलेटर चालवायला कंप्युटर दुकानाला शटर... भाषांतर करणारा ट्रान्सलेटर... सगळ्यात शेवटी ऑफिसात सायबाची टरटर घरात बायकोची टरटर सगळीच टरटर  नुसती टरटर टरटर  पाठवा "लवकर".... 😝 कवीला  क्वार्टर😄 नसेल घेणारा तर.... चहा बरोबर खारी-बटर...😉 👍👍

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट