पोस्ट्स

माहिती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जगण्याची मंत्र : डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

इमेज
शिक्षण तज्ञ :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एक भारताचे फार मोठे तत्वज्ञ ,विद्वान, शिक्षण तज्ञ होतेच त्यांचे हे पैलू जगाला माहीत आहेत तसेच सर्वांना ज्ञात आहे .माञ बाबासाहेब  आंबेडकर यांच्या आयुष्याचा एक वेगळा भाग त्यांच्या आयुष्यात होता तो जगासमोर क्वचितच आला असेल किंवा त्यांच्या जगण्यातून तो नेहमीच अधोरेखित व्हायचा मात्र त्याबद्दल फार थोडे लिहलं गेले आहे किंवा वाचण्यात आले आहे तो भाग म्हणजे बाबासाहेब हे शैक्षणिक क्षेत्रातील  उत्तम असे मानसशास्त्रज्ञ होते .होय त्यांनी मानसशास्त्रात पदवी घेतली किंवा नाही हे मला निश्चित माहित नाही मात्र मानसशास्त्रातील मोठं मोठे नियम ,सिद्धांत, त्यांनी न मांडता कृतीतून दाखवून दिले. बाबासाहेब यांचे आयुष्य हे एखाद्या मानसशास्रज्ञाला सुद्धा अभ्यासण्यासारखे आहे.सर्वप्रथम मी हे ठामपणे सांगू शकतो की जर प्रत्येक विद्यार्थ्यांने बाबासाहेब यांचे आयुष्य हे जर त्यांच्या आयुष्यात मानसशास्त्रिय दृष्टीकोनातून अभ्यासले तर आयुष्यात विद्यार्थी नापास किंवा अपयशी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच पालकांनी सुद्धा जर त्यांच आयुष्य मानसशास्त्रिय दृष्टिकोनातून

Aura म्हणजे ?

इमेज
तेजोवलय (Aura)  ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,  मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.  यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आ

शिक्षण आणि बदलते जग

....मला समजलेल मानसशास्त्र 337....          .. सध्या शिक्षणातून अधोगती होते की.. प्रगती.. हा प्रश्न पडतो...अस म्हटलं जातं..की.. शिक्षणामुळे विचारांची व्याप्ती वाढते..आपण ..सारासार विचार करायला शिकतो.. दृष्टीकोन बदलतो.. नकारात्मक व सकारात्मकतेचा फरक कळतो.....आपण अधिक चांगल्या प्रकारे विचार करु शकतो व....आपले हित अहित ..आपल्याला कळते.पण खरच असं आहे ?                                ज्या शिक्षणामुळे ..अहंकार किंवा गर्वावर... आपणास विजय मिळवता येत नसेल..तर त्या शिक्षणाला.. किंवा स्वताला सुशिक्षित म्हणवून घ्यायला.. काय अर्थ आहे...मतभेद व मनभेद ...मिटविण्यासाठी एकदुसर्‍यास समजून घ्यावे लागते..पण तसे होतांना दिसत नाही.. उलटपक्षी ...स्वताचा अहंकार जपण्यासाठी.. जर स्वताची बुद्धी पणाला लावून...प्रतिपक्षाला नामोहरम केले जात असेल..तर खरच ..आपण सुशिक्षित होवून काय साधलं ...हा प्रश्न पडतो.       आज घडीला कौटुंबिक हिंसा..वाद..डायव्होर्सचे.. प्रमाण वाढले आहेत.. त्यामुळे कित्येक कुटुंब.. देशोधडीला लागली आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीला दोष देत ......स्वतंत्र म्हणजे विभक्त कुटुंब पद्धत .‌जन्मास आली....पण त्या

फक्त प्रेम करा !

*फक्त प्रेम करा !* सख्खा भाऊ , सख्खी बहीण , सख्खी मैत्रीण सख्खे काका , सख्खी काकू , सख्खी मावशी  नेमकं काय असतं हे " सख्ख प्रकरण ? "  सख्खा म्हणजे आपला  सख्खा म्हणजे सखा सखा म्हणजे जवळचा जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही , केंव्हाही , काहीही सांगू शकतो  त्याला आपलं म्हणावं , त्याला सख्ख म्हणावं ! ज्याच्या जवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो   मोठ्ठ्याने हसू शकतो किंवा  काळजातलं दुःख सांगून स्फुंदु स्फुंदु रडूही शकतो त्याला सख्ख म्हणावं , त्याला आपलं म्हणावं ! ज्याच्याकडे गेल्यानंतर  आपलं स्वागत होणारच असतं  आपल्याला पाहून त्याला हसू येणारच असतं अपमानाची तर गोष्टच नसते  फोन करून का आला नाहीस अशी तक्रारही नसते ! पंढरपूरला गेल्यावर  विठ्ठल म्हणतो का ..... या या फार बरं झालं ! माहूर वरून रेणुका मातेचा  किंवा कोल्हापूर वरून महालक्ष्मीचा किंवा तिरुपतीहून गिरी बालाजीचा आपल्याला काही Whatsapp call आलेला असतो का ? या म्हणून ! मग आपण का जातो ? कारण भक्ती असते , शक्ती मिळते आणि संकट मुक्तीची आशा वाटते ....म्हणून ! हा ही एक प्रकारचा *" आपलेपणाच !"* लौकिक अर्थाने , वस्तूच्या स्वरूपा

◾विशेष लेख :- भारतीय गांवांचा वेगळेपणा ...

इमेज
भारतीय गांवांचा वेगळेपणा ...... १)• शनिशिंगणापूर (महाराष्ट्र)     संपूर्ण गांवात, एकाही घराला कडी-कोयंडा नाही.     गांवात पोलीस चौकी,पोलीस ठाणे नाही.     गांवात चो-या नाहीत. २)• शेटफळ (महाराष्ट्र)     प्रत्येक ग्रामस्थाच्या घरात, कुटुंबाचा सदस्य      असल्यासारखी सर्पराजाची उपस्थिती. ३)• हिवरे बाजार (महाराष्ट्र)     भारतातील सर्वात "श्रीमंत" खेडे.      ६० अब्जाधीश घरे. एकही "गरीब" नाही.     सर्वाधिक GDP असणारं खेडं. ४)• पनसरी (गुजरात)     भारतातील सर्वात "अत्याधुनिक" खेडेगांव.     गावातील सर्व घरात CCTV जोडण्या असून,     Wi-Fi सुविधाही आहेत.     गांवातील सर्व 'पथदीप' सौरउर्जेवर चालतात. ५)• जंबुर (गुजरात)     भारतीय वंशाचे असूनही, सर्व नागरिक     "आफ्रिकन" वाटतात.     [परिसरात आफ्रिकन गांव अशीच ओळख] ६)• कुलधारा (राजस्थान)     "अनिवासी" गांव. गांवात कोणीही रहात नाही.      घरे बेवारस सोडलेली आहेत. ७)• कोडिन्ही (केरळ)      जुळ्यांचे गांव. जवळपास प्रत्येक घरात जुळं. ८)• मत्तूर (कर्नाटक)     दैनंदिन व्यवहारासह सगळ्याच कामकाजासाठी     &

◾यशाचा मंत्र :- जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर या ६ गोष्टी करा | For successful life do this 6 things

इमेज
-------------------------------------------   जीवनात यशस्वी व्हायचं  असेल तर या ६ गोष्टी करा  --------------------------------------------  तुम्हाला जर तुमच्या जीवनात काही तरी मिळवायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या ६ गोष्टी केल्या पाहिजेत. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनात या ६ गोष्टी दिसतात. ज्यामुळे ते आज यशस्वी झाले आहेत.  जाणून घ्या त्या ६ गोष्टी कोणत्या आहेत. १). रिकाम्या वेळेचा सदुपयोग तुम्ही कामावरुन घरी गेल्यानंतर काय करता ? टीव्ही पाहता, सोशल मीडियावर मित्रांसोबत चॅट करता किंवा मग पार्टी करण्यासाठी जाता. पण तुम्हाला मिळालेल्या रिकाम्या वेळेचा वापर जर तुम्ही योग्य पद्धतीने केला तर  तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही.  स्टीव जॉब, इमा वॉट्सन, इलॉन मस्क आणि टीम कूक यांनी रिकाम्या वेळेचा सदुपयोग करुन यश गाठलं. २). पुरेशी झोप घ्या. अपुरी झोप फक्त तुम्हाला अस्वस्थच करत नाही तर तुमचा दुसरा दिवस देखील खराब करते. याचा परिणाम तुमच्या कामावर नक्कीच होतो. अॅपल कंपनीचे सीईओ रोज रात्री ९.३० ला झोपायचे आणि ७ तासांची झोप घ्यायचे

◾विशेष लेख :- शिवाजी राजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व!

इमेज
शिवाजी राजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व!      इतिहासात आपण पाहिलंच असेल की सर्व साधारणपणे बरेच राजे महाराजे हे वंश परंपरागत पद्धतीने किंवा कटकारस्थान करून राज गादीवर विराजमान झाले आहेत. आता त्यांचा हेतू हा खरंच लोककल्याणाचा होता की फक्त अधिसत्ता गाजवण्याचा होता हा एक चिंतनाचा विषय आहे. कारण असे किती राजे आले आणि गेले पण माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच आहेत असं मला वाटतं.त्या पैकीच एक नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! कारण त्यांनी लोकांच्या हृदयात त्यांचं अढळ असं स्थान निर्माण केलं आहे जे त्यांच्या अद्वितीय कर्तबगारीचं प्रतिक आहे. काय होती ही कर्तबगारी व कशाच्या आधारावर होती? याचं विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न केला आहे.     शिवाजी राजेंचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर या ठिकाणी शिवनेरी गडावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाऊ यांच्या पोटी झाला. त्या काळात मुघल साम्राज्याने बऱ्यापैकी आपलं अस्तित्व निर्माण केलं होतं. अशा परिस्थितीत स्वराज्याचं स्वप्न जिजाऊ यांनी पाहिलं आणि शिवबाला त्या परीने घडविले. स्वराज्याचं बाळकडू जिजाऊ यांनी शिवरायांना पाजलं आणि स्वराजाच

◾आरोग्य :- हास्य एक औषध...🥣

इमेज
📬••••••••• थोडं मनातलं  !! 😊 हास्य एक औषध...🥣 ---------------------------------------             सकारात्मकता हास्याला आमंत्रित करत असते आणि हास्य सकारात्मकतेला. तुमचं आनंदी असणं हे सभोवतालही आनंदी बनवतं. आनंदी राहणं हे आंतरिक समाधान तर देतंच, पण इतरांनाही समाधानी बनवतं. याउलट असमाधान तुमचा चिडचिडेपणा वाढवतं. तुमच्यात क्रोध निर्माण करतं. मग जो माणूस स्वतःच असमाधानी आहे, तो इतरांना काय समाधान देणार या जाणिवेने लोक त्याच्याकडे फिरकतही नाहीत.             आनंद कोठून आणावा लागत नाही. तो आपला आपल्याकडे असतोच. पण मासा जसा पाण्यातच तहानलेला, तशीच माणसाची अवस्था असते. आनंदी राहूनच आपण हवं ते मिळवू शकतो, हे माहिती असूनही माणसं गंभीर आणि पडेल चेहऱ्याने फिरत राहतात. नकारात्मकतेला जवळ करतात. मग अकाली थकतात. अपयशाचे धनी होतात.             खरं तर, कारणापेक्षा जास्त गंभीरपणा हा एक आजारच आहे. तर हसणं हे अनेक आजारावरचं रामबाण औषध आहे. हसणं मानसिक ताणतणाव दूर करतं.एकमेकातले संबंध आनंदी बनवून सामाजिक आयुष्य यशस्वी करतं. जेवण आरोग्यासाठी जितकं महत्त्वाचं, तितकंच हसणंही महत्त्वाचं आहे. हसण्यामुळे शरीरात

◾विशेष लेख :- स्वराज्य ते सुराज्य!.

इमेज
स्वराज्य ते सुराज्य!. केवळ इतिहासात रमणे हा मानवी घात आहे. इतिहासाचे जतन संवर्धन आणि संगोपन हे जागृत मानवी समाजाचे लक्षण आहे. तर इतिहासाचा अभ्यास करून, त्याची वर्तमानाशी सांगड घालत जिद्द, आणि कठोर परिश्रमाच्या बळावर उत्तम भविष्यकाळ घडवणे. हे नवंमेशी प्रतिभेचा " सुशिक्षित आणि सुसंस्कृत मानवी समाजाचे प्रेरणादायी लक्षण आहे. यापैकी व्यक्ती आणि समाज म्हणून आपण नेमके सध्या स्थितीत कोठे आहोत? हा प्रश्न आजच्या मंगल दिनी प्रत्येकानेच आपल्या अंतर्मनात विचारायला हवा. कारण आज जण कल्याणकारी राजा ' छत्रपती शिवाजी महाराजांची 391 वी जयंती|  आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा घेऊन महाराजांनी रयतेचया मन-मनात स्वातंत्र्याची पणती पेटवली. पुढे याच स्वातंत्र्य पणतीचे सोळाशे 74 साली  राज्याभिषेकाच्या रूपाने स्वातंत्र्याची प्रेरणादायी मशालीच्या रूपात परिवर्तन झाले. महाराजांनी निर्माण केलेली हीच स्वराज्य सिंहासनाच्या रूपाने रायगडावर स्थापन झालेली स्वातंत्र्याची प्रेरक मशाल अखंड भारत वर्षाची मुक्तता आणि सुराज्य असा ध्यास घेऊन पुढे शेकडो वर्ष कालक्रमणा करत राहिली. आणि याच प्रेरणेतून भारतीयांनी अथक संघर्

◾माहिती :- ​​पुस्तक वाचनाचे मानसशास्त्रीय फायदे....

इमेज
​​पुस्तक वाचनाचे मानसशास्त्रीय फायदे📚📖 - प्रा. सुनील शिंदे 1. काळ : एखादी व्यक्ती पुस्तक लिहीते तेव्हा काही महीने ते काही वर्ष ती त्या विषयावर संशोधन, माहीतीची जुळवाजुळव करीत असते, त्या लेखकाचं जगणं, त्याने घेतलेले अनुभव या सगळ्यांच प्रतिबिंब त्या पुस्तकात उमटलेल असतं. तुम्हीं ते पुस्तक ४ ते ५ दिवसात वाचून काढता तेव्हा खरतर तुम्ही केलेला तो एक काळ प्रवास असतो.. 2. संघर्ष : काही वेळेस माणसाला स्वत: समोरील समस्याच मोठ्या वाटत असतात. पण जेव्हा तुम्ही मोठ्या थोर व्यक्तींची आत्मचरीत्र वाचता, त्यांनी केलेला संघर्ष, शोधलेले मार्ग हे जाणून घेता तेव्हा त्यांच्या संघर्षा पुढे आपल्या समस्या खुप लहान आहेत याची जाणीव होते आणि त्यांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास येतो.. 3. नशीब : भविष्य जाणून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ते निर्माण करणं. एक चागलं पुस्तक सकारात्मक विचारांची श्रूखंला तयार करते, उद्या या विचारांचच क्रूती मध्ये रुपातर होइल. तुम्हीं आज जे काही आहात ते भूतकाळातील तुमच्या विचारांच फलित आहे आणि उद्या तुम्हीं जे असाल ते आज मेंदूत काय विचार आहेत याच फलित असेल. आज केलेल्या सकारात्मक विचा

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...