पोस्ट्स

आरोग्य लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Aura म्हणजे ?

इमेज
तेजोवलय (Aura)  ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,  मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.  यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आ

थोडं प्रेम स्वतः वरही... | Marathi Audio story | Audiobook

इमेज
पहिला फ्री मराठी ऑडिओ ब्लॉग ऐका आणि इतरांना पण शेअर करा | First Free Marathi Audio Blog आयुष्यात आलेला 'एखादा काळ' हा वाईट नसतोच, वाईट असते ती त्या काळातली आपली परिस्थिती, काळाशी दोन हात करतांना आपली सतत कमी पडत राहाणारी उर्जा, आपल्यातली मानसिक आंदोलने आणि त्या काळातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी आपली होत असणारी तडफड. ही तडफड जितकी जास्त होते , जगण्याची...जगण्यावर प्रेम करण्याची उर्जा तितकी जास्त वाढत जाते. दुःख माणसाला जिवंत राहाण्याची, आयुष्यावर नव्याने प्रेम करण्याची उर्मी देतं. द्यायला हवं... पण... जर आपलं स्वतःवरही प्रेम असलं तरच हे होऊ शकतं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थीपणा कधीच नसतो. ती भेट असते ...आपण स्वतःला दिलेली.  कुणीतरी येईल , आपल्याला आनंद देईल ही वाट बघत बसण्यापेक्षा आपण स्वतःच स्वतःला आनंद देणारे होऊ शकतोच पण बर्‍याचदा माणसे स्वतःवर प्रेम करण्यासाठीही इतरांची वाट पाहाण्यात आयुष्य घालवतात... प्रेम म्हणजे स्वतःपर्यंत पोहोचण्याचा प्रवास असतो. जगण्याचा प्रवास असतो. आयुष्याची ओढ असते आणि जिवंतपणाशी जुळलेली नाळ असते... ओसाड जागी पावसात दा

◾आरोग्य :- 7 प्रकारच्या विश्रांती..प्रकार

इमेज
7 प्रकारच्या विश्रांती.. दिवसभर खूप दगदगिचे काम करून थकून आपली सगळी एनर्जी संपलेली असते. थकवा घालवण्यासाठी आपण छान झोप घेतो. मस्त झोपून उठल्यानंतर जरा फ्रेश वाटतं , बरोबर ना ? झोप आणि आराम यात नेमका फरक काय असतो ? आपण मस्त झोप पूर्ण केल्यानंतर आपल्याला एकदम फ्रेश वाटायला लागतं, आपल्यामध्ये एनर्जी येते. झोप पूर्ण करणे म्हणजेच आपल्याला गरज असलेल्या विश्रांतीची पूर्तता करणे नक्कीच नाही. आपण जीवनात विश्रांतीचे महत्व जाणून घेत नाही त्यामुळे आपल्यामध्ये कायम विश्रांतीची कमतरता भासते. आपल्या जीवनात या विश्रांती सम प्रमाणात असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीराला आणि मनाला आवश्यक असे विश्रांतीचे 7 प्रकार असतात. ते आपण सविस्तरपणे पाहुयात.                     शारीरिक विश्रांती                       आपण झोपतो किंवा थोडा वेळ पडून एक डुलकी काढतो त्याला सक्रिय विश्रांती असे म्हणल जात. यासोबतच निष्क्रिय विश्रांती पण असते, जी आपल्या निरोगी आरोग्यासाठी मदत करत असते. योग , स्ट्रेचिंग , मसाज केल्याने निष्क्रिय विश्रांती मिळत असते.                   मानसिक विश्रांती                      दिवसभर दग दग कर

◾आरोग्य :- तुम्ही नैसर्गिकरित्या... तुमचा मूड बदलू शकता !

इमेज
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *   तुम्ही नैसर्गिकरित्या...  तुमचा मूड बदलू शकता ! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ आपल्या धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करत असतो. सध्या धावपळ करत एकाच वेळी अनेक काम करण्याचे कसब देखील मिळवले आहे. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो. त्यानंतर तुम्हाला कोणीही काहीही मदत करू शकत नाही. आपण स्वतः कडून एका रोबोट प्रमाणे कामे करून घेतो. नंतर आनंद शोधण्यासाठी आपण भौतिक गोष्टीचा आधार घेतो. त्याऐवजी आपण आदर्श आणि प्रामाणिक नात्यांचा आधार घ्यायला हवा.     आपण एकदा डोळे बंद करून स्वतःला विचारायला हवे की, मला खरंच काय मिळवायचे आहे? काही लोकांना त्यांचा मूड किंवा मनस्थिती सुधारण्यासाठी औषधांची गरज असते. ज्याप्रमाणे चिंता, नैराश्य, तणाव, मनोविकार असलेले रुग्ण उपचार घेतात. जीवन शैलीतील एक बदल तुम्हाला उच्चतम आनंद मिळवून देऊ शकतो. तुम्हाला वाटेल खरंच हे शक्य आहे का? मी हे पाहिलंय माझ्या ग्राहकांवर हे आजमावले आहे. चला जाणून घेऊ काय आहे हे आनंदी जीवनाचं रहस्य? * उगवत्या सूर्याकडे बघा * : होय, उगवत्या सूर्याकडे बघितल्याने तुमचा मूड बद

◾आरोग्य :- स्वतःच बना स्वतःची आई...

इमेज
"स्वतःच बना स्वतःची आई " नमस्कार मी शुभदा गोडबोले. पेशाने मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे.  माझ्या 27   वर्षांच्या प्रॅक्टिस मधे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली,  ती म्हणजे प्रत्येक माणूस वयाच्या कुठल्याही टप्प्यावर का असेना तो प्रेमाला मिस करतो, आता प्रेम म्हंटल्या वर लगेच आपल्याला ते हिरो आणि हेरॉईनच सिनेमा मधलं प्रेम आठवत.  पण ते प्रेम नाही म्हणत मी,  तर ज्याला आपण माया, ममता,  वात्सल्य म्हणतो ते आईच प्रेम प्रत्येकाला आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्यावर हवं असतं. थोडे स्वतःच्या  आयुष्यात डोकावून बघाना...  मग तुमच्या लक्षात येईल की, मी काय म्हणते ते.  कारण प्रत्येक फॅमिली मधे कोणीतरी खूपच प्रेमळ असतं, जे दुसऱ्यांसाठी खूप झटतं, त्यांची जीवापाड सेवा करतं, कारण त्याचा तो स्वभाव असतो. त्याला ते जमतं. ती व्यक्ती स्वतःचे छंद, आवडी निवडी बाजूला ठेऊन दुसऱ्यांसाठी झटते (आणि जास्त करून घरातली स्त्रीच हे करत असते) पण पुरुष ही थोड्या फार प्रमाणात असे आपण पहातो. तर सांगायचा मुद्दा हा की, त्या व्यक्तीला दुसऱ्यांकडून तितकसं अटेंशन मिळत नाही. तिला नेहमी गृहीत धरलं जातं. ती व्यक्ती त्याची फिकीर ही कर

◾आरोग्य :- एक्टिव्ह मेंदू ...

इमेज
* ऍक्टिव्ह मेंदू * जगाच्या पाठीवर बरेच जीव आपले जीवन व्यतीत करत आहेत कोणी पाण्यात तर कोणी जमिनीवर जीवन जगतायेत. निसर्गाने प्रत्येकाला स्वतःचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी काही तरी विशेष गोष्ट दिलेली आहे. ज्याच्या आधारावर प्रत्येक जीव आपापले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे प्रयत्न करत आहेत. पृथ्वीवर लाखो प्रजाती जिवंत आहेत. पण त्यांच्यापैकी मनुष्याला एक वेगळी ओळख आहे. आज संपूर्ण पृथ्वीवर मानवाचे वर्चस्व आहे. पृथ्वीच्या पाठीवर माणूस हा असा एकमेव प्राणी आहे ज्याने अवकाशात सुद्धा भरारी घेतली आहे, हे सर्व कश्याच्या भरवश्यावर केले असं वाटते? तर उत्तर आहे, ते म्हणजे दीड किलो वजनाच्या मेंदूवर! ज्याने सर्व प्रजातींमध्ये आपल्यालाच वर्चस्व मिळवून दिले आहे. त्या मेंदूला आपण आणखी अँक्टीव कश्याप्रकारे ठेवू शकता. * मेंदूला ऍक्टिव्ह ठेवण्याकरिता ह्या आहेत काही गोष्टी * * ध्यान * आपण ऐकले असेल कि पूर्वीच्या काळी ऋषी मुनी शेकडो वर्ष जगत असत. मग ते असे काय करत होते, कि त्यांचे आयुष्य एवढे अधिक होते. तर बऱ्याच अश्या गोष्टी आहेत, कि ज्यामुळे त्यांचे आयुष्य आपल्या पेक्षा अधिक होते, त्यामध्ये सर्वात पहिली ग

◾आरोग्य :- दीर्घायुष्य आणि तुमची झोप !

इमेज
● दीर्घायुष्य आणि तुमची झोप !  झोप!... शास्त्रज्ञांनी अशी एक उपाययोजना शोधली आहे की जी तुम्हाला दीर्घायुषी बनवते, तुमची स्मृती, सर्जनशीलता वाढवते, तुम्ही बारीक राहता, जास्त लक्षवेधक दिसू |लागता. ही उपाययोजना तुम्हाला सर्दी, फ्लूपासूनच नाही तर कर्करोग आणि स्मृतीभ्रंशापासून देखील वाचवू शकते. हृदयविकार, पक्षाघात, मधुमेह होण्याचा धोका कमी करते आणि तुम्हाला जास्त आनंदी आणि तणावमुक्त ठेवते.. काहींना हे वर्णन अतिरंजित वाटेल, पण यातला प्रत्येक शब्द शास्त्रीय चाचणीवर खरा उतरलेला आहे. ही बातमी ना रंजक द्रव्याची आहे ना कुठल्या जादूई औषधाची! ही आहे आठ तासांच्या शांत झोपेमुळे मिळणाऱ्या फायद्याची! आपण मात्र आज या आठ तास झोपेला फारसे महत्त्व देत नाही, ती नियमित घेत नाही आणि खरं सांगायचं तर कित्येकांना ‘ती’ येतही नाही. ती म्हणजे, झोप! झोप म्हणजे फक्त जागेपणाचा अभाव असा अर्थ होत नाही. ती एक खूप गुंतागुंतीची, चयापचय असलेली प्रक्रिया आहे. झोप सर्वानाच अवश्यक आहे. आपल्या मेंदूत एक घड्याळ असतं, जे अंधार, प्रकाश किंवा तापमानातील बदल यावर चालतं. ‘सरकाडियन ऱ्हिदम’ (circadian rhythm) म्हणतात याला. हे घड्या

◾आरोग्य :- पाण्या विषयी अत्यंत महत्वाची माहिती ...

इमेज
©️ डॉ. गौरी कैवल्य गायकवाड. बार्शी. पाण्या विषयी अत्यंत महत्वाची माहिती: रात्री झोपताना स्वयंपाक घरातील देवघरा मध्ये संध्याकाळी लावलेला  दिवा जर विझला असेल, तर तो तर लावतेच, पण त्या सोबत, पिण्याच्या पाण्याच्या भांड्यांजवळ देखील एक दिवा लावते, आणि ज्या दिवशी शक्य असेल, त्या दिवशी एक फुल देखील तेथे वाहते, आणि मनोभावे पाण्याच्या सर्व भांड्यांना हात जोडून कृतज्ञता व्यक्त करते. वाचताना काही जणींना हे विचित्र वाटू शकेल, कोणाला हास्यास्पद वाटेल. पण मी स्वतः एक डॉक्टर आहे. विज्ञानाच्या परीक्षेतून तावून सुलाखून बघितल्या शिवाय सहसा कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. पण सहा महिन्यांपूर्वी "पाणी" या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण असे संशोधन माझ्या हाती लागले, आणि त्या नंतर चक्क काही धार्मिक पुस्तकां मध्ये त्याचे जसेच्या तसे संदर्भ देखील मिळाले. ते सोप्यात सोप्पे करून खाली देत आहे.. नक्की वाचा. १) पाणी... म्हणजे जीवन. पाण्याला स्वतःची विशिष्ट अशी एक स्मरणशक्ती असते.  २) पाणी पिताना ज्या प्रकारचे आपले विचार असतात, किंवा ज्या मानसिक स्थिती मध्ये आपण पाणी पितो, त्याचा प्रचंड परिणाम पाण्यावर आणि

◾आरोग्य :- फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी या 5 गोष्टी नियमित वापरा

इमेज
फुफ्फुस शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. फुफ्फुस निरोगी नसल्यावर अनेक आजार उद्भवतात. जसे की दमा,न्यूमोनिया,क्षयरोग,फुफ्फुसांचा कर्करोग इत्यादी, म्हणून फुफ्फुसांची काळजी घेणं महत्त्वाचे आहे. आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून आपण फुफ्फुसांना निरोगी ठेवू शकतो. चला तर मग जाणून घेऊ या.   1 व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहार- आंबट फळे जसे- संत्री,लिंबू, टोमॅटो,किवी,स्ट्रॉबेरी,द्राक्षे,अननस,आंबे या मध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहाराचा सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात. व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहारात अँटी ऑक्सीडेन्ट असतात, जे श्वास घेल्यावर ऑक्सिजन सर्व अवयवांमध्ये पोहोचतात.    2 लसणाचा सेवन - लसणाचे सेवन केल्याने कफ नाहीसा होतो. जेवल्यानंतर लसूण खालले तर हे छाती स्वच्छ ठेवतो. लसणात अँटीऑक्सीडेंट असतात जे संसर्गाविरुद्ध लढतात आणि शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात.     3 लायकोपिन समृद्ध आहाराचे सेवन-  अन्नात असे आहार घ्यावे जे लायकोपिनने  समृद्ध असावे जसे गाजर,टोमॅटो ,कलिंगड,पपई,बीटरूट आणि हिरव्यापालेभाज्या. अशा प्रकारच्या आहारात केरोटीन

◾आरोग्य :- देवपूजा एक मेडिटेशन....

इमेज
पूर्वी देवांची पूजा झाल्याशिवाय तोंडात पाणीही न घेणारी लोकं होती. त्याची आठवण झाली. मग विचार करता करता वाटलं किती सुंदर पद्धत आहे ना आपल्यात रोजच्या पूजेची. माझ्या डोळ्यांसमोर पूर्वीचं एक छान चित्र ऊभं राहिलं. भल्या पहाटेच ऊठून सर्व स्त्रिया घरातलं दळण, स्वैपाकघरातली कामं, पाणी भरणं, लहान मुलांकडे लक्ष देणं वगैरे कामात मग्न असताना पुरूष मंडळी बाहेरच्या अंगणाची सफाई, चूल पेटवणं, बागेला पाणी देणं, गोठा सफाई, धारा काढणं वगैरे कामात गर्क आहेत. सकाळची सर्व आन्हिकं ऊरकून शूचिर्भूत होऊन घरातले यजमान पूजेसाठी फुलं काढायला बागेत जातात. ऊगवतीची कोवळी किरणं अंगावर घेत, अनवाणी पायांनी, रंगीबेरंगी फुलांची शोभा निरखत पानाफुलांशी हितगूज करत निसर्गाचं अप्रूप मनात साठवत मनाला आल्हाददायक देणारा एक आनंददायी (आणि आरोग्यदायीही) सुंदर अनुभव. फुलं घेऊन देवघरात आल्यावर सर्व देव (स्वत:) स्वच्छ घासलेल्या ताम्हनात काढून देवघराची स्वच्छता, देवांची ऊन पाण्याने अंघोळ, त्यांना लहान बाळांच्याच ममतेने आणि कोमलतेने (भक्तीने) स्वच्छ करून परत जागच्याजागी स्थानापन्न करतात. एकतानतेने सहाणेवर चंदनाचं मऊ मुलायम सुगंधी गंध ऊग

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...