फक्त प्रेम करा !
*फक्त प्रेम करा !* सख्खा भाऊ , सख्खी बहीण , सख्खी मैत्रीण सख्खे काका , सख्खी काकू , सख्खी मावशी नेमकं काय असतं हे " सख्ख प्रकरण ? " सख्खा म्हणजे आपला सख्खा म्हणजे सखा सखा म्हणजे जवळचा जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही , केंव्हाही , काहीही सांगू शकतो त्याला आपलं म्हणावं , त्याला सख्ख म्हणावं ! ज्याच्या जवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो मोठ्ठ्याने हसू शकतो किंवा काळजातलं दुःख सांगून स्फुंदु स्फुंदु रडूही शकतो त्याला सख्ख म्हणावं , त्याला आपलं म्हणावं ! ज्याच्याकडे गेल्यानंतर आपलं स्वागत होणारच असतं आपल्याला पाहून त्याला हसू येणारच असतं अपमानाची तर गोष्टच नसते फोन करून का आला नाहीस अशी तक्रारही नसते ! पंढरपूरला गेल्यावर विठ्ठल म्हणतो का ..... या या फार बरं झालं ! माहूर वरून रेणुका मातेचा किंवा कोल्हापूर वरून महालक्ष्मीचा किंवा तिरुपतीहून गिरी बालाजीचा आपल्याला काही Whatsapp call आलेला असतो का ? या म्हणून ! मग आपण का जातो ? कारण भक्ती असते , शक्ती मिळते आणि संकट मुक्तीची आशा वाटते ....म्हणून ! हा ही एक प्रकारचा *" आपलेपणाच !"* लौकिक अर्थाने , वस्तूच्या स्वरूपा