जगण्याची मंत्र : डॉ.बाबासाहेब आंबेडकर...
शिक्षण तज्ञ :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एक भारताचे फार मोठे तत्वज्ञ ,विद्वान, शिक्षण तज्ञ होतेच त्यांचे हे पैलू जगाला माहीत आहेत तसेच सर्वांना ज्ञात आहे .माञ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याचा एक वेगळा भाग त्यांच्या आयुष्यात होता तो जगासमोर क्वचितच आला असेल किंवा त्यांच्या जगण्यातून तो नेहमीच अधोरेखित व्हायचा मात्र त्याबद्दल फार थोडे लिहलं गेले आहे किंवा वाचण्यात आले आहे तो भाग म्हणजे बाबासाहेब हे शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम असे मानसशास्त्रज्ञ होते .होय त्यांनी मानसशास्त्रात पदवी घेतली किंवा नाही हे मला निश्चित माहित नाही मात्र मानसशास्त्रातील मोठं मोठे नियम ,सिद्धांत, त्यांनी न मांडता कृतीतून दाखवून दिले. बाबासाहेब यांचे आयुष्य हे एखाद्या मानसशास्रज्ञाला सुद्धा अभ्यासण्यासारखे आहे.सर्वप्रथम मी हे ठामपणे सांगू शकतो की जर प्रत्येक विद्यार्थ्यांने बाबासाहेब यांचे आयुष्य हे जर त्यांच्या आयुष्यात मानसशास्त्रिय दृष्टीकोनातून अभ्यासले तर आयुष्यात विद्यार्थी नापास किंवा अपयशी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच पालकांनी सुद्धा जर त्यांच आयुष्य मानसशास्त्रिय दृष्टिकोनातून