फक्त व्यक्त व्हायला शिका...

शब्दरूपं आले....मुक्या भावनांना.

व्यक्तं होणं....मग ते शब्दांतून असो
स्पर्शातूनं असो
डोळ्यांतून असो
वा असो फक्त श्वासांतून...... वा सहवासातून.
व्यक्त होणं खूप गरजेचं असतं असं मला वाटतं...
शब्दातून व्यक्त होणं व्हा व्यक्त होण्याचा खरा "राजमार्ग" आहे...मात्र बऱ्याच वेळा शब्दं फुरंगटून बसतात....भावना रुसूनं बसतात...आणि मग होत राहते घुसमट....मनातल्या मनात थिजलेल्या या अबोल अशा क्षणांची...शब्दांची!
सुरू होते घालमेल...मनातल्या स्वप्नांची.
पण अचानक कधीतरी.... एका निवांत क्षणीं होतो साक्षांत्कार... नि शब्द घेवू लागतात मनासारखा आकार...आणि साकारू लागते भावभावनांची अनोखी अशी मूर्ती जी क्षणांत बोलू लागेल आणि मुक्या मुक्या झालेल्या भावनांही शब्दरूप घेवू लागतील...
               आपण मनुष्य प्राणी खूप भाग्यवानं आहोत की आपल्याला "भाषेचं" हे 'अमूल्य दान' ईश्वराने दिलेलं आहे.भाषा ही एखाद्या नदी सारखी प्रवाही असते..जी कायम खळाळतं राहते.नदीचं हे खळाळणं...आणि भाषेचं उच्चारणं हे कानाला नेहमीचं मधुर वाटत राहतं.याच भाषेच्या उच्चारातून घडत राहतो तो संवाद..इतर कोणतेही प्राणी आपल्या सारखे शब्दातून संवाद साधू शकत नाही.पण त्यांची स्वतःची संवादाची...व्यक्त होण्याची एक वेगळी शैली असते..सरावाने काही व्यक्ती प्राण्यांशी देखील त्यांच्या शैलीने संवाद साधू शकतात..मी अश्या लोकांसमोर मनापासून नतमस्तक होतो.🙏🏻
             मी दोघांचाही तितकाच भक्तं आहे... आता तुम्ही म्हणाल कोण दोघे?
 एक तर ते आहेत 'शब्द' आणि दुसरं म्हणजे 'मौन'.
शब्द जितके मला साथ देतात, माझं मन रिझवतात तितकेच मौन देखील मला सोबत करत असते...माझे मन शांत करत असते.नव्हे माझ्या मनाला नव्याने जणू रिचार्जच करत असते.
वरकरणी शब्द आणि मौन हे परस्परविरोधी वाटत असले तरी मला तर वाटतं हे दोन्ही एकमेकांचे परस्परपूरक असेच आहेत.शब्द आणि मौन हे दोन्ही आपल्या आयुष्याला पैलू पाडत असतात.
ज्याला कुठं शब्द वापरावीत आणि कुठे मौन ठेवावे हे समजते त्याला जीवनात कोणतीच अडचण येत नाही असे मला वाटते.
मौनाच्या बाबतीत ले एक मला आवडलेले सुंदर असे वाक्य...जे मला माझ्या हृदयाच्या खूप खूप जवळचे आहे ते असे..
"जो तुम्हारे मौन का अर्थ नहीं समज सकता....
  वो तुम्हारे शब्दों का अर्थ भी नहीं समज सकता!
 
  शब्दां नंतर साधते मौन...
  मौना नंतरच खुलतात शब्द!

________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट