पोस्ट्स

कविता लेबलसह पोस्ट दाखवत आहे

माणुसकी ... Manuski | New Marathi Poem | संतराम नाना पाटिल

इमेज
कविता : माणूसकी बोल माणसा खडे बोल  मी बोलतोय मनी  एक काळ आसा होता  मला विचारत नव्हतं कुणी ...                                मोल होत वस्तुला                              देवान घेवानही वस्तुची                             जगण्यासाठी त्या काळी                                नव्हती गरज पैशाची .... सोनं  चांदी  विकायची आणा गीनी रूपायात  काठीला सोने बांधून  लोक फिरायचे गावात...                           गावालाही गावपण होते                             चावडीत लोक बसायचे                            सर्व मान्य तोडगा काढून                             न्याय निवाडा करायचे .... सारे गाव सरपंच पाटील  नाममात्र एकजण  अन्याय नसे कोणावरच  जोडले जायचे सगळेजन ....                                  निवडणूक नसली तरी                            गावगाडा एकाने हाकायचा                             क्षणिक सुखासाठी कोण                               गावच नाही विकायचा.... परस्परांच्या प्रेमावरती  ठरायची तेंव्हा माणुसकी  नाती गोती जपायची  म्हणजे वाढायची लायकी ....                             सोने चांदी पैसा नव्हता       

सावली माणसाची ... Savli Mansachi | मंगेश शिवलाल बरई | New Marathi Poem | आयुष्यावर कविता | Audio Poem

इमेज
Your browser does not support the audio element. सावली माणसाची ... सावली माणसाची... आयुष्यभर त्याच्यासोबत चालणारी, सुख-दुःखात साथ निभावणारी, जिवाभावाची सखीच... सावली माणसाची... स्वच्छ प्रकाशात स्पष्ट दिसणारी, अंधारात माञ... काही काळासाठी साथ सोडणारी, सावली माणसाची... त्याच्या वयाबरोबर वाढणारी, त्याचं आस्तित्व दाखवणारी , कधी कधीतर... त्याच्यात अस्तित्वात हरवणारी, सावली माणसाची... माणसातली माणुसकी जपणारी, त्याच्या नजरेत, त्यालाच असते सावरणारी, सावली माणसाची... असली काळाबरोबर दिशा बदलणारी, तरीही... आयुष्यभर त्याच्यासमोर चालणारी. मंगेश शिवलाल बरई. हिरावाडी,  पंचवटी, नाशिक-४२२००३. Audio poem, audio story, Marathi Audiobook टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

ई-बुक :- माझ्या कविता | Arjun apparao jadhav

इमेज
माझ्या सर्व कविता ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहेत... माझ्या सदर सर्व कविता वाचण्यासाठी खालील दिलेल्या  बाय बटन वर क्लिक करून  खरेदी करा ! _______________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅ Buy Now

कविता :- दीक्षाभूमी ... | मराठीचे शिलेदार समुह नागपूर

इमेज
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖    ‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित 'बुधवारीय काव्यरत्न' कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना‼ ➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖ मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम ➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖   🎗🎗🎗 सर्वोत्कृष्ट दहा 🎗🎗🎗          🔵विषय : दीक्षाभूमी🔵     🍂बुधवार : १३/ १० /२०२१🍂 ➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖ दीक्षाभूमी नागवंशाची नागपूर नगरी पवित्र तीर्थक्षेत्र  बौद्धांतरी वर्षानुवर्षे अनादी काळात नागवंशी  जगत  संघर्षात हक्कांसाठी  होते  झगडत भीमराव, तेच कूळ  सांगत दलितांचे जीवन हलाखीत पाहून,सोसून भीम क्रोधीत अपमान,अवहेलना करिती अस्पृश्यास उच्चभ्रू  छळती  तयारीच नव्हती सवर्णांची माणसात तयां  गणण्याची  कुशाग्र  बुद्धीचा हा बॅरिस्टर आढावा  देशाचा घेई चौफेर ज्या  धर्मात  नसे मी  मानव नाही ठेवली  तयाची कणव  स्विकारला बौद्ध धर्म  जावून हजारो    अनुयायांना   घेवून दिक्षाभूमी तीच ठरली  तीर्थ दलितांना उद्धारण्या प्रित्यर्थ शिका,संघटीतव्हा,संघर्ष करा जागविली चेतना  दलितांतरा आस लाखोंना तिथे जाण्याची दैवता    ह्दयात    स्मरण्याची! सौ.संगीता पांढरे इंदापूर, पुणे ©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह ♾️🔹♾️🔹🔵

आपलं यश डोळे भरून बघणारी माणसं हवीत...

इमेज
आपलं यश डोळे भरून... बघणारी माणसं हवीत...... दुसऱ्या साठी करताना सुद्धा ........  आपल्याला झेपेल इतकंच करावं.. अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना ..... अनेकांसाठी बरंच काही करतो..झटतो.........   प्रत्येक वेळी आपलीच जबाबदारी म्हणून......  कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो.... कोणताही स्वार्थ नसतांना..  मतप्रवाह तर दोन्ही बाजूंनी असतात.....  ज्याच्यासाठी करतो त्याला वाटतं ........  केलं आमच्यासाठी तर काय फरक पडतो.. त्यांचं कर्तव्यच आहे.. करणाऱ्याचा हेतू स्वच्छ असतो..  आपल्या प्रयत्नाने कुणाचं तरी भलं व्हावं.....   हा निर्मळ प्रयत्न असतो.........  गैरसमज हा फार मोठा शत्रू असतो.......  तो या निर्मळ भावनेलाच धोका निर्माण करतो... ज्याला समजून घ्यायचंय ......  तो समजूतदारपणे गोष्टी हाताळतो... ज्याला समजून घ्यायच॔च नाही ......  तो शब्दाचा किस पाडतो... शब्दांनी घायाळ करतो... नात्यांची खरी मेख तर इथेच आहे... माझं माझं करता करता ......  आपण आपल्यांना दुखावतो........  घालून पाडून बोलतो.......... . परिणाम फक्त वाईटच होतात... संबंध दुरावले जातात.....  आपुलकीतला रस संपत जातो... उरते ती फक्त निराशा... हल्ल

कविता : आयुष्याच्या अखेरीस

इमेज
आयुष्याच्या अखेरीस ************** आयुष्यभर कष्ट केलीत पण मनासारखे जगता आले नाही राब राब राबत गेलो पण माणस् कळली नाहीत  ईच्छा साऱ्या दुर ठेवून आयुष्यभर गरज सर्वांची पुर्ण करत राहीलो स्वतःसाठी कमी मात्र दुसऱ्यांसाठी जास्त  जगलो नोकरी असेपर्यंत सारकाही सुखासीन असतं त्यानं संजय धनगव्हाळ धुळे ९४२२८९२६१८ _____________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-  सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

कविता : राहून गेले

इमेज
_________________________ जगणे कठीण होते बरेच भोगुन झाले  खुप जगायचे होते थोडे राहून गेले नजरा बऱ्याच होत्या जखमा देत होत्या लक्तरे या देहाचे कितीदा पाहुन झाले विस्कटलेले आयुष्य थोडे शिवायचे राहून गेले किती हात होते किती घात होते  गर्दीतून स्पर्श किती झेलून झाले लज्जेला थोडे झाकायचे राहून गेले किती धावत होते किती पहात होते खेळ वासनेचा खेळून किती वार केले आक्रोशालाही थोडे शांत करायचे राहून गेले किती आकृत्या  विकृत झाल्या किती बळी गेल्या मेणबत्तीचेही कितीदा  वितळून झाले निषेधाचेही थोडे  निषेध करायचे राहून गेले धाव जोरात होती पळवाट कुठेच नव्हती वेदनेलाही ठार करून शिल वेशीवर टाकून गेले अमानुषतेलाही थोडे समजावयाचे राहून गेले संजय धनगव्हाळ धुळे ९४२२८९२६१८ _____________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

सोडून द्यावं | marathi poem | जीवनावर कविता

इमेज
 🙏🏻😊 सोडून द्यावं 😊🙏🏻 🍁 एकदोन वेळा समजावून  सांगूनही पटत नसेल तर समोरच्याला समजावणं *सोडून द्यावं* 🍁 🍁 मुलं मोठी झाल्यावर स्वतंत्रपणे  निर्णय घेत असतील  तर पाठीमागे लागणं  *सोडून द्यावं* 🍁 🍁 मोजक्याच लोकांशी ऋणानुबंध जुळतात, एखाद्याशी नाही पटलं तर बिघडलं कुठं *सोडून द्यावं* 🍁 🍁 एका ठराविक वयानंतर  कोणी नावं ठेवली तर मनावर घेणं  *सोडून द्यावं* 🍁 🍁 आपल्या हातात काही नाही, हा अनुभव आल्यावर इतरांची वा भविष्याची चिंता करणं  *सोडून द्यावं* 🍁 🍁 इच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं तर स्वतःकडून अपेक्षा करणं *सोडून द्यावं* 🍁 🍁 प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं,  आकार, रंग सगळंच वेगळं म्हणूनच म्हणतो तुलना करणं  *सोडून द्यावं* 🍁 🍁 आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्यानंतर रोज जमा खर्चाची मांडणी करणं   *सोडून द्यावं* 🍁 *समजलं तर ठीक नाहीतर हे ही सोडून द्यावं* 🙏🏻🙏🏻 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-  सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

आता मला जमायला लागलय | मराठी कविता | audio poem

इमेज
✨🍀✨ आता मला जमायला लागलय . आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर  जे जे मला दुखवत गेले  त्या त्या सगळ्यांना  न दुखावता सोडून देणं  *आता मला जमायला लागलयं.* संघर्षाच्या किंवा वादविवादाच्या क्षणी वाद न घालता तेथून दूर  निघून जाण्यातंच खरी परिपक्वता असते  *हे ही समजायला लागलय.* माझ्या बरोबर घडणाऱ्या  अनेक वाईट गोष्टींचा  उहापोह करून त्यात  शक्ती खर्ची घालून  आजूबाजूला जे जे उत्तम आहे त्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून जातोय *हे ही जाणवायला लागलयं.* आलेल्या अनुभवांतून बाहेर पडत स्वतःला सावरून,  इतरांना आनंदी करणे *मला आता जमायला लागलय.* कोणत्याही न पटणाऱ्या गोष्टींवर काहीही न बोलणे म्हणजे  त्यांना संमती असणे ,गरजेचे नाही, कधी-कधी काहीही न बोलणं किंवा कोणतही प्रत्युत्तर न देणं खूप काही बोलून जातं आणि सांगूनही जातं.  *हे ही कळायला लागलंय .* आपण लोकांवर किंवा त्यांच्या विचारांवर बंधन आणू शकत नाही पण स्वतः च्या मनावर मात्र बांध घालू शकतो. आपण अशा लोकांचे वागणे किती मनावर घ्यायचे, त्यांना किती महत्व द्यायचं, त्यांनी बोललेल्या गोष्टी किती डोक्यात साठवायच्या आणि स्वतःचे आयुष्य खराब क

स्वप्नभंग | मराठी कविता | marathi poem

इमेज
     विषय :- स्वप्नभंग   लाख मोलाचे अश्रू माझे आठवणीत तुझ्या किती रडत बसू ? नाही आधार तुझा डोळे पुसावया मग का तरी मी तुझ्यावर रुसू ? जन्मोजन्मीची गाठ आपुली ती सत्य वचने दिलंस तू मला हातात हात तुझा नी माझा प्रेम माझं कळलं तरी काय तुला ? बाबांच्या शब्दाबाहेर जाण्याची हिम्मत तरी का नव्हती  तुझ्यात बोलके नव्हते तुझे डोळे तरीही नजरेने घायाळ केलंय तुझ्या प्रेमात स्वप्न भरले ते डोळ्यांत माझिया दोघांच्या प्रेमळ सुखी संसाराचे मला कधी का कळालेच नाही ? फसवे होते सगळं फक्त एकट्याचे शेवटी एकांतात पडली मी अशी बघत बसली सख्या वाट तुझी खऱ्या प्रेमात स्वप्न नक्की भंगतेच चूकभूल असावी त्यात थोडी माझी स्वप्नांना अशी कुरुवाळीत मी दुरावा तो अंतरीचा अपुल्यात स्वप्नभंग करुनिया माझे तू  कधीचा राहिला ना आता माझ्यात कु. सोनाली कोसे, डोंगरगाव ( बुज.) ___________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

कविता - मीच फक्त चांगला आहे

*मीच फक्त चांगला आहे*  *बाकी सगळे वाईट*  *तुम्हीच सांगा ही भूमिका*  *Wrong आहे का Right ?* *स्वतःला " हिरो " ठरवतांना* *दुसऱ्याला " व्हिलन " करू नको*  *विनाकारण गाऱ्हाणे करत*  *इकडून तिकडे फिरू नको*  *पुढच्या क्षणी काय घडणार* *कुठे कुणाला माहीत असतं*  *विकेट कशी , कधी पडणार*  *कुणालाही ठाऊक नसतं* *अपॉइंटमेंट घेऊन कधी* *यमराज घरी येतो का ?* *गयावया केली म्हणून* *कुणाला सोडून देतो का ?* *यमा,तुझ्या रेड्यावर मी* *डबलसीट बसणार नाही*  *ठीक आहे बसू नकोस*  *असं कधीच असणार नाही*  *मनात असो किंवा नसो* *यमाच्या मागे बसावंच लागतं* *श्रीराम जयराम म्हणत म्हणत*  *मसनवाट्यात जावंच लागतं*  *चोवीस तासाच्या आत तुला* *रॉकेल टाकून फुकुन देतील* *कवटी फुटो न फुटो* *घरी लवकर पळून जातील* *मूर्ख माणसा,त्याच्यामुळे*  *प्रत्येक क्षण जगून घे* *सखी सोबत पावसा मध्ये*  *चिंब चिंब भिजून घे* *घर घर ,काम काम* *चोवीस तास तेच ते*  *इतकं सोनं , तितके पैसे* *वेड्या माणसा सोडून दे* *घण्याच्या बैला जागा हो*  *थोडी तरी मजा कर*  *हिरव्या हिरव्या झाडा सोबत*  *कधी तरी दोस्ती कर*  *दशम्या , धपाटे , पिठलं ,भाकर

कविता - आपल्या ग्रूपची गोष्टच न्यारी

आपल्या ग्रूपची गोष्टच न्यारी, प्रत्येकाची आवड जगावेगळी, प्रत्येक सभासदाचा रंग वेगळा, प्रत्येक रंगाची छटा निराळी.  कुणी फक्त सुप्रभात म्हणून गायब,  तर कुणी प्रत्येक पोस्ट वर स्मायली, कुणी करे व्हिडिओ चा भडिमार, तर कुणाची सकाळ सुविचाराने झाली. कुणी ज्ञानदानासाठी आसुसलेला,  तर कुणाची वृत्ती सदा धार्मिक कुणी हास्यरसात बुडवून घेई,  तर कुणाची पोस्ट मार्मिक, कधी आजीबाईंचा बटवा उघडे, तर कधी बोधप्रद कथा,  कधी कोडी असोत किंवा तत्त्वज्ञान, तर कधी गृहिणींची व्यथा.  हर तर्हेचे मनोरंजन करण्याचा,  वसा जणु घेतला आपण, कधी कुणाला येवू देणार नाही, कंटाळा किंवा एकटेपण. लोभ आहेच तो व्हावा वृद्धिंगत, आपल्या माणसांची ही लोभस संगत.🙏🏻🙂 टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

कविता - कळलेच नाही

🙏!  *कळलेच नाही*  !🙏 वर्षेचे वर्षे निघून गेली,  धकाधकीच्या जीवनात  वय केंव्हा वाढले  कळलेच नाही !       खांद्यावर खेळविलेली मुल,       खांद्याएवढी कधी झाली       *कळलेच नाही* !       एकेकाळी दिवसा       ढाराढूर झोपायचो,      राञीची झोप       केंव्हा उडाली       *कळलेच नाही* !  ज्या काळ्या केसावर  भाव मारत होतो, ते  पांढरे कधी झाले  *कळलेच नाही* !      वणवण भटकत       होतो नोकरीसाठी,      रिटायर्ड केंव्हा झालो       *कळलेच नाही* ! मुलांसाठी बचत  करीत होतो, कधी मुलं दूर गेली  *कळलेच नाही* !      आता विचार करतो,       स्वतःसाठी काही       करायचं पण शरीराने      केंव्हा साथ सोडली       *कळलेच नाही* ! कळलेच नाही, म्हणून  म्हणतो अजूनही वेळ  आहे, थोडं तरी जगून घ्या  सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या              🙏           *जिंदगी*  *ना मिलेगी दोबारा* टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

कविता - शरीर मृत होण्या आधीच आलिंगन द्या

*शरीर मृत होण्या आधीच आलिंगन द्या* *आयुष्य खूप छोटं आहे* *भांडत नका बसू*  *डोक्यात राग भरल्यावर*  *फुटणार कसं हसू ?* *अहंकार बाळगू नका*  *भेटा बसा डोला*  *मेल्यावर रडण्यापेक्षा* *जिवंतपणी बोला*  *नातं आपलं कोणतं आहे* *महत्वाचे नाही* *प्रश्न आहे कधीतरी* *गोड बोलतो का नाही ?* *चुका शोधत बसाल तर* *सुख मिळणार नाही*  *चूक काय बरोबर काय* *कधीच कळणार नाही*  *काहीतरी खुसपट काढून उगीच नका रुसू* *आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू .....ll 1 ll* *चल निघ चालता हो* *इथे थांबू नको* *हात जोडून विनंती आहे* *अशी भाषा नको* *दारात पाय नको ठेऊ*  *तोंड नाही पहाणार*  *खरं सांगा असं वागून*  *कोण सुखी होणार ?* *तू तिकडे आम्ही इकडे* *म्हणणं सोपं असतं* *पोखरलेलं मन कधीच*  *सुखी होत नसतं* *सुखाचा अभास म्हणजे*  *खरं सुख नाही*  *आपलं माणूस आपलं नसणे* *दुसरं दुःख नाही*  *करमत नाही घरी म्हणून गाळू नका आसु* *आयुष्य खूप छोटं आहे* *भांडत नका बसू ....ll 2 ll* *एकतर्फी प्रेम करून* *उपयोग आहे का ?* *समोरच्याला आपली आठवण* *कधी तरी येते का ?* *नातं टिकलं पाहिजे असं* *दोघांनाही वाटावं* *कधी गायीने कधी वासराने*  *एकमेकाला चाटा

◾कविता :- महात्मा गांधी

इमेज
'महात्मा गांधी' सत्य अन् अंहिसेचे होते ते पुजारी, पत्करली नाही कधी त्यांनी कुणाची लाचारी, होते आहे मात्र आजही तत्वांची त्यांच्या परीक्षा, विसरला नाही अजूनही माणूस त्यांनी दिलेली विचारांची दिक्षा, होणार नाही आज  त्यांच्यासम कुणीही महान संत, नव्हताच त्यांच्या सहनशिलतेला कधीही कोणत्या गोष्टीचा अंत, मात्र, पसरतोय आज वारयासारखा भ्रष्टाचार होणार कसा त्यांचा आज जगाला साक्षात्कार, वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका, हि त्यांची शिकवण, देईल त्यांची कायम आठवण.                               मंगेश शिवलाल बरई.                    हिरावाडी, पंचवटी, नाशिक-४२२००३.                    संपर्क-९२७१५३९२१६. ______________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾कविता :- वेळ

*वेळ* ************ जगं वेळेवर चालते  असं म्हणतात म्हणून धावणारी माणस वेळ चुकवतं नसतातं वेळ म्हणजे माणूस जगण्याचं यंत्र आहे ध्येयसाध्य करण्याचा मंत्र आहे  माणसाचा जन्मही  वेळेवरच होत असतो ह्रुदयाची गती मोजतानाही  वेळच बघतं असतो खरतरं वेळेच्यापुढे कुणाचं काहीचं चालत नाही आणि वेळेआधी  कोणाला काहीच करता येत नाही काही जरी करायच म्हटलं तरी साऱ्या घडामोडी वेळेवरच होत असतात म्हणूनतर मुहूर्तलाही वेळ देत असतात      माणसानेतर वेळेच्या गतीने धावायच असतं धावताना जराही थांबायचं नसतं कारण पुढची वेळ कशी येईल सांगता येत नाही वेळ टळली की मग काहीच करता येत नाही म्हणून माणसाने वेळेला महत्व दिले पाहिजे सारकाही वेळच्यावेळी झालं पाहिजे वेळ थांबली की  माणूस थांबला समजायचं आणि एकदाचा थांबला की मग मागे वळून नाही बघायचं कारण वेळ ही कुणासाठी थांबत नाही गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही तेव्हा माणसाने  वेळेला समजून घेतल पाहीजे वेळेप्रमाणेच जगलं पाहिजे *संजय धनगव्हाळ* धुळे ९४२२८९२६१८ ___________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...