पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

◾कविता :- म्हणून मी नेहमी आनंदी असतो..

इमेज
मी भुतकाळ चघळत नाही ना मी भविष्याची चिंता करतो मी वर्तमानात जगतो म्हणून नेहमी आनंदी असतो...... मी कुणाकडुन काडीची अपेक्षा करत नाही मी कुणाबद्दल राग मनात  धरत नाही मी लगेच सगळ्यांना माफ करतो म्हणून मी नेहमी आनंदी असतो... मी कसलाच हव्यास आणि लोभ करत नाही बकरीचा मी दिवसभर सारखाच  चरत नाही मी समाधानी राहुन  फक्त दोन वेळाच खातो म्हणून मी नेहमी आनंदी असतो मी हायफाय राहण्यासाठी धडपडत नाही कोणासाठी कधीच दुःखाने तडफडत नाही साधं राहुन आपल्या माणसांत सुखानं रमतो म्हणून मी नेहमी आनंदी असतो कोण काय बोलतं ह्याचा मी कधीच विचार करत नाही कोणी काहीही बोलल तरी  पुन्हा मी ते स्मरत नाही माझां जीवन स्वछंदी आहे ते मी मजेत जगतो म्हणून मी नेहमी आनंदी असतो... मला पदाचा ना ज्ञानाचा अहंकार कधी शिवला नाही तुच्छतेचा विचार कधी मनाला भावला नाही पाय जमिनीवर ठेऊन प्रसंगी  अनवाणी चालतो  म्हणून मी नेहमी आनंदी असतो.. जगायला काहीच भौतिक सुख  लागत नाही म्हणून मी गर्वाने कधीच वागत नाही सगळ्यांशी प्रेमाने आदराने  आपुलकीने वागतो म्हणून मी नेहमी आनंदी असतो जन्म शाश्वत आहे तसा मृत्यू देखील शाश्वत आहे ही जाणीव आहे माझ्या

◾बोधकथा :- बोलणारी गुहा ... | bodhkatha | yashacha mantra

इमेज
एका जंगलात अनेक प्राणी राहत होते. जंगलाला लागून एक अर्धगोलाकृती डोंगर होता. या अर्धगोलाकृती डोंगरातून एक ओढा वाहत होता. ओढयाला बाराही महिने स्वच्छ नितळ पाणी असायचे. ओढ्याकाठी मोठमोठी झाडं वाढली होती. झाडांच्या थंडगार सावलीत आजूबाजूचे प्राणी जमायचे. थंडगार पाणी पिऊन आपापल्या मार्गाने चालू लागायचे.       या जंगलात एक सिंह होता. सिंह म्हातारा झाला होता. म्हातारपणामुळे त्याला जास्त फिरणं व्हायचं नाही. शिकारीचा पाठलाग करणं जमायचं नाही. त्यामुळे सिंहाची उपासमार होऊ लागली. खूप प्रयत्न करूनही छोटी मोठी शिकार मिळायची. ही शिकार करताना सिंहाची पुरती दमछाक व्हायची. पून्हा नवीन शिकार करायला त्राणच उरायचे नाही.    आशा परिस्थीतीत करणार काय ? एकेकाळचा जंगलाचा राजा, आता एकवेळच्या खाण्यासाठी झुंजत होता. रखडत होता. ज्या इवल्याशा प्राण्याकडं लक्षही दिलं नसतं, असे प्राणी खाऊन कसा तरी जगत होता.         असाच एके दिवशी हा म्हातारा सिंह शिकारीसाठी फिरत होता. त्याला खूप भूक लागली होती. भूकेनं व्याकुळ झाल्यामुळं त्याच्यानं चालणंही होत नव्हतं ; परंतु न चालुन करणार काय ?     तसाच तो फिरत फिरत अर्धगोलाकृती डोंगराच्

◾कविता :- जपावे ...

इमेज
पाय जपावा वळण्याआधी तोल जपावा  ढळण्याआधी अन्न जपावे विटण्याआधी नाते जपावे तुटण्याआधी शब्द जपावा बोलण्याआधी अर्थ जपावा मांडण्याआधी रंग जपावे उडण्याआधी मन जपावे मोडण्याआधी वार जपावा जखमेआधी अश्रू जपावे हसण्याआधी श्वास जपावा  पळण्याआधी वस्त्र जपावे मळण्याआधी द्रव्य जपावे सांडण्याआधी हात जपावे मागण्याआधी भेद जपावा खुलण्याआधी राग जपावा भांडणाआधी मित्र जपावा रुसण्याआधी मैत्री जपावी  तुटण्याआधी जीव जपावा जळण्याआधी वेळ जपावी मरण्याआधी...!🤝

◾ललित लेख :- शहाण्या माणसांचा क्लास...

इमेज
शहाण्या माणसांचा क्लास’ “अरे, पण गरज काय आहे याची?”  हे वाक्य ज्यांना योग्यवेळी, योग्य ठिकाणी, योग्य गोष्टीविषयी आणि योग्य व्यक्तीशी बोलताना वापरता येतं ना, ती माणसं शहाणी असतात. जपून वागतात, जपून जगतात आणि जगताना इतरांनाही जपतात. ऊठसूठ हाॅटेलात जाऊन खाणार नाहीत, सतत बाहेरून पार्सल मागवणार नाहीत, सारखी खरेदीही करणार नाहीत. रेल्वे स्टेशन किंवा एसटी स्टॅन्डवर पहाटे साडेचार किंवा पाच वाजता एकटे उतरले तर अर्धा तास तिथंच थांबतील. भल्या पहाटे जाऊन घरच्यांच्या साखरझोपेचा विचका करणार नाहीत आणि दुप्पट-तिप्पट पैसेही खर्च करणार नाहीत. अर्धा तास थांबतील, बसेस सुरू झाल्या की शांतपणे घरी पोचतील. सकाळचा पहिला चहा घरीच घेतील, सात वाजता आलेला वर्तमानपत्राचा ताजा अंक वाचतील. अर्धा तास वाचवण्यासाठी जिवाचा आटापिटा करून तिप्पट पैसे खर्च करणार नाहीत. पण कुटुंब असेल, लहान बाळ असेल तर असं वागणार नाहीत. रिक्षा करतील, थोडीफार घासाघीस करतील, आणि घरी जातील. हे जगण्यातलं व्यावहारिक शहाणपण पिढ्यानपिढ्या रक्तात मुरलेला एक वर्ग आपल्या समाजात आहे. अनेकजण त्यांना मिडलक्लास म्हणतात, पण माझ्या लेखी ती खरी शहाणी माणसं असत

◾आरोग्य :- एक्टिव्ह मेंदू ...

इमेज
* ऍक्टिव्ह मेंदू * जगाच्या पाठीवर बरेच जीव आपले जीवन व्यतीत करत आहेत कोणी पाण्यात तर कोणी जमिनीवर जीवन जगतायेत. निसर्गाने प्रत्येकाला स्वतःचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी काही तरी विशेष गोष्ट दिलेली आहे. ज्याच्या आधारावर प्रत्येक जीव आपापले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे प्रयत्न करत आहेत. पृथ्वीवर लाखो प्रजाती जिवंत आहेत. पण त्यांच्यापैकी मनुष्याला एक वेगळी ओळख आहे. आज संपूर्ण पृथ्वीवर मानवाचे वर्चस्व आहे. पृथ्वीच्या पाठीवर माणूस हा असा एकमेव प्राणी आहे ज्याने अवकाशात सुद्धा भरारी घेतली आहे, हे सर्व कश्याच्या भरवश्यावर केले असं वाटते? तर उत्तर आहे, ते म्हणजे दीड किलो वजनाच्या मेंदूवर! ज्याने सर्व प्रजातींमध्ये आपल्यालाच वर्चस्व मिळवून दिले आहे. त्या मेंदूला आपण आणखी अँक्टीव कश्याप्रकारे ठेवू शकता. * मेंदूला ऍक्टिव्ह ठेवण्याकरिता ह्या आहेत काही गोष्टी * * ध्यान * आपण ऐकले असेल कि पूर्वीच्या काळी ऋषी मुनी शेकडो वर्ष जगत असत. मग ते असे काय करत होते, कि त्यांचे आयुष्य एवढे अधिक होते. तर बऱ्याच अश्या गोष्टी आहेत, कि ज्यामुळे त्यांचे आयुष्य आपल्या पेक्षा अधिक होते, त्यामध्ये सर्वात पहिली ग

◾जिवन मंत्र :- मनावरचं ओझं कमी करण्यासाठी ...

इमेज
💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏 मनावरचं ओझं कमी करण्यासाठी मनातलं दुःख हे बोललंच पाहिजे . परंतु ते कोणाशी बोलायचं हे मात्र समजलं पाहिजे . आपण फक्त एकाच ठिकाणी चुकतो . काहीजणांची लायकी नसताना त्यांना जवळ करतो . सल्ला घेते वेळी किंवा देते वेळी समोरचा माणूस योग्य असणं महत्त्वाचं  असतं .            जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तीच्याच सहवासात राहणे योग्य . आपली संगत आपले भविष्य घडवित असते . आपण कोण आहोत यापेक्षा आपण कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्त्वाचे आहे .          सुसंस्कृत माणसाची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शृकते . जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते . कधीकधी धीर देणारा हात , ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते. 🌹🌹🌹🌹🚩🙏🏽🌹🌹🌹🌹

◾ललित लेख :- जीवनातील फोमो...

इमेज
लेख : जीवनातील फोमो  लेखक : राजेंद्र वैशंपायन मागच्या आठवड्यातला प्रसंग. माझ्या भाचीकडे गेलो होतो. तिचा सहा महिन्याचा मुलगा आहे. मी गेलो होतो त्या वेळी थोडं खेळून झाल्यावर त्या मुलाला खरी खूप झोप आलेली होती पण तो झोपायला काही तयार नव्हता. शेवटी गाणं ऐकव, मांडीवर घेऊन थोपट असे सगळे उपाय करून तो झोपला एकदाचा. साधारणतः मुलं  वर्ष-सहा-महिन्याची  झाली की ही गम्मत सुरु होते.  डोळ्यावर खूप झोप आलेली असते पण मुलं झोपायला अजिबात तयार नसतात. ताणून ताणून जागं राहण्याचा प्रयत्न सुरु असतो. मी कुतूहल म्हणून एकदा याबद्दल एका  डॉक्टरना विचारलं होतं.  त्यावर त्यांनी एक खूप स्वारस्यपूर्ण माहिती दिली होती. ते म्हणाले की याला बरीच कारणं असतात पण त्यातलं एक कारण म्हणजे फोमो (FOMO - Fear of Missing Out) हेही असतं. म्हणजे मुलाच्या आजूबाजूला जे काही रंगीबेरंगी जग ते अनुभवत असतं, ते जग आपण झोपलो तर आपल्यापासून दूर जाईल याची त्याला भीती वाटते आणि त्यामुळे ते मूल झोपायला तयार नसतं.  मला या गोष्टीचं खूप नवल वाटलं.मुलाच्या न झोपण्याच्या अनेक कारणामागे फोमो (FOMO) हे कारण असेल तर माणूस भावनिकदृष्टया आपल्या आजूबाजूल

◾कविता :- चहा म्हणजे चहा असतो...

इमेज
चहा म्हणजे चहा असतो कधीही मिळाला तरी वाह वाह असतो उन्हाळ्यात थंड, हिवाळयात उष्ण तर पावसाळ्यात बहारदार असतो कधीही मिळाला तरी वाह वाह असतो मुंबईत तो पिला जातो पुण्यात घेतला जातो कोल्हापुरात टाकला जातो तर, नागपुरात तो मांडला जातो चहा म्हणजे चहा असतो कधीही मिळाला तरी वाह वाह असतो क्षण आनंदाचा असो  वा आलेल असो टेंशन  आळस झटकायला लागतो तसाच  थकवा घालवायला ही लागतो चहा म्हणजे चहा असतो कधीही मिळाला तरी वाह वाह असतो काहीच काम नसताना पण चालतो  आणि खूप काम असलं तरी पण लागतो गप्पा मारताना जसा लागतो तसाच एकटेपणा मिटवायला ही लागतो चहा ला वेळ नसते पण, वेळेला चहाच लागतो चहा म्हणजे चहा असतो कधीही मिळाला तरी वाह वाह असतो.

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट

इमेज
✍  प्रारब्धवशात जे आहे तेच होते.... (१) लग्न   (२) पैसा   (३)  मरण   (४)  अन्न   (५)  जन्म...  ✔हे ज्याचे जिथे असतील तिथे ओढून घेऊन जातात... उदाहरण -- १) लग्न :- रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रम्हदेवांना विचारले, "या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे ?" ब्रम्हदेवांनी कुंडली पाहून सांगितले, "समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे, त्याच्याबरोबर होणार आहे." रावणास राग आला. माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची ? शक्यच नाही. नोकरांना सांगितले, "याला समुद्रात फेकून द्या." नोकरांनी त्याचा अंगठा कापला व त्यास समुद्रात टाकला. तो मुलगा एका बेटावर पोहोचला. तिथला राजा वारला होता. लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यामागे फिरत होते. हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली. लोकांनी त्यास त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले. मुलगा वयात आला. रावणाची कन्या उपवर झाली. बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला. रावणाने पाहुणचाराकरिता जावयास बोलाविले. रावण म्हणाला, "ब्रम्हदेवपण हल्ली खोटे बोलतो." त्याने सांगितले होते, "

◾आरोग्य :- दीर्घायुष्य आणि तुमची झोप !

इमेज
● दीर्घायुष्य आणि तुमची झोप !  झोप!... शास्त्रज्ञांनी अशी एक उपाययोजना शोधली आहे की जी तुम्हाला दीर्घायुषी बनवते, तुमची स्मृती, सर्जनशीलता वाढवते, तुम्ही बारीक राहता, जास्त लक्षवेधक दिसू |लागता. ही उपाययोजना तुम्हाला सर्दी, फ्लूपासूनच नाही तर कर्करोग आणि स्मृतीभ्रंशापासून देखील वाचवू शकते. हृदयविकार, पक्षाघात, मधुमेह होण्याचा धोका कमी करते आणि तुम्हाला जास्त आनंदी आणि तणावमुक्त ठेवते.. काहींना हे वर्णन अतिरंजित वाटेल, पण यातला प्रत्येक शब्द शास्त्रीय चाचणीवर खरा उतरलेला आहे. ही बातमी ना रंजक द्रव्याची आहे ना कुठल्या जादूई औषधाची! ही आहे आठ तासांच्या शांत झोपेमुळे मिळणाऱ्या फायद्याची! आपण मात्र आज या आठ तास झोपेला फारसे महत्त्व देत नाही, ती नियमित घेत नाही आणि खरं सांगायचं तर कित्येकांना ‘ती’ येतही नाही. ती म्हणजे, झोप! झोप म्हणजे फक्त जागेपणाचा अभाव असा अर्थ होत नाही. ती एक खूप गुंतागुंतीची, चयापचय असलेली प्रक्रिया आहे. झोप सर्वानाच अवश्यक आहे. आपल्या मेंदूत एक घड्याळ असतं, जे अंधार, प्रकाश किंवा तापमानातील बदल यावर चालतं. ‘सरकाडियन ऱ्हिदम’ (circadian rhythm) म्हणतात याला. हे घड्या

◾आरोग्य :- पाण्या विषयी अत्यंत महत्वाची माहिती ...

इमेज
©️ डॉ. गौरी कैवल्य गायकवाड. बार्शी. पाण्या विषयी अत्यंत महत्वाची माहिती: रात्री झोपताना स्वयंपाक घरातील देवघरा मध्ये संध्याकाळी लावलेला  दिवा जर विझला असेल, तर तो तर लावतेच, पण त्या सोबत, पिण्याच्या पाण्याच्या भांड्यांजवळ देखील एक दिवा लावते, आणि ज्या दिवशी शक्य असेल, त्या दिवशी एक फुल देखील तेथे वाहते, आणि मनोभावे पाण्याच्या सर्व भांड्यांना हात जोडून कृतज्ञता व्यक्त करते. वाचताना काही जणींना हे विचित्र वाटू शकेल, कोणाला हास्यास्पद वाटेल. पण मी स्वतः एक डॉक्टर आहे. विज्ञानाच्या परीक्षेतून तावून सुलाखून बघितल्या शिवाय सहसा कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. पण सहा महिन्यांपूर्वी "पाणी" या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण असे संशोधन माझ्या हाती लागले, आणि त्या नंतर चक्क काही धार्मिक पुस्तकां मध्ये त्याचे जसेच्या तसे संदर्भ देखील मिळाले. ते सोप्यात सोप्पे करून खाली देत आहे.. नक्की वाचा. १) पाणी... म्हणजे जीवन. पाण्याला स्वतःची विशिष्ट अशी एक स्मरणशक्ती असते.  २) पाणी पिताना ज्या प्रकारचे आपले विचार असतात, किंवा ज्या मानसिक स्थिती मध्ये आपण पाणी पितो, त्याचा प्रचंड परिणाम पाण्यावर आणि

◾विशेष लेख :- हा बदल नक्की केव्हा झाला ?

इमेज
🌸हा बदल नक्की केव्हा झाला ?🌸 🌷वीस पंचवीस वर्षांपूर्वी नोकरी  करणारा  मुलगा पगार  निमूटपणे वडिलांच्या हातात देत होता.... !     मग वडील त्यातून घरातला काही खर्च करायचे, थोडी बचत केली जायची आणि मुलाला   येण्याजाण्याच्या तिकीटापुरते आणि दिवसाला फार तर एक चहा पिता येईल इतके पैसे दिले जात होते. आता मुलाला पगार किती मिळतो हे विचारायला आई-वडील कचरतात. मुलगा त्या पैशाचे काय करतो हे विचारायची हिम्मत/इच्छा आई-वडिलांकडे  नसते...!          हा बदल केव्हा झाला....? 🌷कॉलेजमध्ये जाताना साडी ऐवजी पंजाबी ड्रेस घालायला मिळतो याचा आनंद मानणारी मुलगी आता तिच्या मुलीला हाफ पॅन्टमध्ये फिरताना बघते. मनातल्या मनात चरफडते पण स्पष्टपणे मुलीला "अंगभर कपडे घाल" असे म्हणायची हिंमत करत नाही....!                              हा बदल केव्हा झाला....?   🌷वयात आलेली मुलगी संध्याकाळच्या आत घरात असायची, घरकामात मदत करायची. आता एकदा स्वयंपाक घरात येऊन खायला काय आहे ते बघते आणि स्वतःच्या खोलीत जाऊन परस्पर ऑर्डर करून खाणं मागवते.         हा बदल केव्हा झाला......? 🌷लग्नाअगोदर मुला-मुलीने एक-दोन वेळा भेटणे म्हणजे

◾थोडं मनातलं :- सल आणि लस ...

इमेज
सल..... आणि.....लस             दोन अक्षरे, पण शब्द वेगळे. फक्त अक्षरांची जागा बदलली की हे दोन्ही शब्द तयार होतात. अक्षरे तीच पण मागेपुढे लिहिण्याने अर्थ बदलतो.               सल म्हणजे एखादी गोष्ट मनात साठून तीची नकोशी असणारी जाणिव मनास सतत टोचत असते. ती काढून टाकायचा प्रयत्न असतो.              आणि या उलट लस म्हणजे एखादी गोष्ट होऊनये म्हणून जाणीवपूर्वक शरीराला टोचून घेणे.             टोचणे दोघातही असते. पण एक नकोसे असते. आणि दुसरी मात्र घेतली का? घेणार का? याची चौकशी होते.           पहिल्याचे टोचणे मनाशी असते, तर दुसऱ्याचे शरीराशी. पहिल्याच्या आठवणीसाठी मन तयार नसते. किंवा आठवल्यावर दु:ख होते. तर दुसऱ्या टोचणीसाठी मन खंबीर झालेले असते. थोडक्यात पहिल्या टोचणीचे परिणाम मानसिकतेवर जास्त अवलंबून असतात. तर दुसऱ्या टोचणीचे परिणाम शरीरावर दिसतात.            पहिले कोणत्याही परिस्थितीत लपवण्याचा प्रयत्न असतो. तर दुसऱ्याचे कौतुक करतो. (आजकाल तर काही वेळा त्यांचे फोटो देखील काढले जातात.)                पहिल्याचा परिणाम मनावर आणि नंतर शरीरावर किती कालावधी पर्यंत राहिल हे सांगता येत नाही. पण तो लवकर

◾विशेष लेख :- गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा

इमेज
गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा - द्वारकानाथ संझगिरी आजची हिंदी चित्रपट सृष्टी माझी नाही. बरं झालं आम्ही दादरच्या कॅफे स्विमिंगपुलवर गाणी ऐकत, चहा पीत, सिगरेट ओढत सिनेमावर चर्चा करत होतो, तेव्हा चित्रपट सृष्टीत आज साचलेल्या चिखलाचा मागमूसही नव्हता. एकमेकांवरची गलिच्छ चिखलफेकही नव्हती. आमच्या वेळेला एक म्हण होती, माकडाच्या हातात कोलीत. आता ती म्हण बदलली आहे, आता माकडांच्या हातात चॅनेल अशी नवीन म्हण अस्तित्वात आलेली आहे. त्या काळात फिल्मी माणसांना शिखंडी बनवून राजकीय अर्जुन शरसंधान करत नव्हते. धार्मिक आणि राजकिय स्तरावर ती चित्रपट सृष्टी दुभंगलेली नव्हती. सिनेमातल्या माणसांच्या पोटी जन्माला आलेली मुलं आणि बाहेरून चित्रपट सृष्टीत आलेले कलाकार मंडळी असा वर्ण वर्चस्वाचा खेळ नव्हता. न कुणीतरी परदेशात बसलेला डॉन कठपुतली प्रमाणे नट नट्या आपल्या तालावर नाचवत होता. ना एकमेकांच्या करिअर संपवण्याच्या वल्गना होत किंवा सुपारी दिली जाई.  ती आमची चित्रपट सृष्टी नंदनवन नव्हती. आदर्शवतही नव्हती. पण इतकी किडलेली कधीच नव्हती.  त्यावेळी अर्थात बरीच मंडळी चित्रपट सृष्टीत सामान्य कुटुंबातून येत. आणि कष्टाने,

◾आरोग्य :- फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी या 5 गोष्टी नियमित वापरा

इमेज
फुफ्फुस शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. फुफ्फुस निरोगी नसल्यावर अनेक आजार उद्भवतात. जसे की दमा,न्यूमोनिया,क्षयरोग,फुफ्फुसांचा कर्करोग इत्यादी, म्हणून फुफ्फुसांची काळजी घेणं महत्त्वाचे आहे. आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून आपण फुफ्फुसांना निरोगी ठेवू शकतो. चला तर मग जाणून घेऊ या.   1 व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहार- आंबट फळे जसे- संत्री,लिंबू, टोमॅटो,किवी,स्ट्रॉबेरी,द्राक्षे,अननस,आंबे या मध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहाराचा सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात. व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहारात अँटी ऑक्सीडेन्ट असतात, जे श्वास घेल्यावर ऑक्सिजन सर्व अवयवांमध्ये पोहोचतात.    2 लसणाचा सेवन - लसणाचे सेवन केल्याने कफ नाहीसा होतो. जेवल्यानंतर लसूण खालले तर हे छाती स्वच्छ ठेवतो. लसणात अँटीऑक्सीडेंट असतात जे संसर्गाविरुद्ध लढतात आणि शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात.     3 लायकोपिन समृद्ध आहाराचे सेवन-  अन्नात असे आहार घ्यावे जे लायकोपिनने  समृद्ध असावे जसे गाजर,टोमॅटो ,कलिंगड,पपई,बीटरूट आणि हिरव्यापालेभाज्या. अशा प्रकारच्या आहारात केरोटीन

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट