मी असेपर्यत येत रहा...
मी असेपर्यत येत रहा... बाप..... ☺️☺️ अगदी काळजात धस्स करणार वाक्य..... *ऊभ्या आयुष्यात, कधीही न झुकलेला, न थकलेला, हारजीत, उन पाऊस सगळ धिरानं पचवलेला, माझा बाप आज बेडवरुन ऊठु शकत नाही. सुन मुलगा करतात सगळं पण त्याला नाईलाजाची किनार आहे की कर्तव्य की प्रेम माहीत नाही. आणि सासरी गेलेल्या लेकी, त्यांच्या जगात व्यस्त आहेत. नाही म्हणायला पाच सहा दिवसांतुन व्हिडीओकॉल करतात. आणि बाबा म्हणतात, *"मी असेपर्यत येत रहा"* डोळ्यातुन गंगा यमुना वहातात. अगदी जन्म झाल्यापासुन, दवाखान्यातुन घरी आणणारा रात्री बेरात्री जागुन खांद्यावर जोजवणारा बाप, शाळेच्या पहिल्या दिवशी अलगद हात सोडणारा बाप, सायकल शिकवताना, *"हो जमतय जमतय, बँलेन्स कर हँन्डल, समोर बघ"* म्हणुन अचानक हात सोडुन आत्मविश्वास दुणावणारा बाबा, कॉलेजात पहिल्या दिवशी काळजीत दिसणारा, परिक्षेच्या रात्री डोक्यावरुन हात फिरवणारा बाप, स्वतःसाठी फाटके बुट, बटनाचा फोन वापरुन कॉलेजची भरमसाठ फी भरणारा बाबा, बाहेरची घोंघावणारी वादळे थोपवुन धरतोय दरवाजातच बाजीप्रभु सारखा. आपल्याला नेहमी हसताना दिसतो. *जखमा