◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...
कोरोनाने आम्हाला काय शिकवले भारतामध्ये कोरोनाचा संसर्ग जास्त पसरू नये म्हणून केंद्र सरकारने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास पूर्णपणे बंदी घातली. त्यामुळे नागरिकांना नाइलाजाने का होईना आपल्या स्वतःच्या घरी चार भिंतीच्या आतच थांबावे लागले. भारतातील नागरिकांवर यापूर्वी कधीही दिवसेंदिवस कुठेही बाहेर न पडता घरातच थांबावे लागले असा प्रसंग आला नव्हता. दिवसेंदिवस घरातच थांबल्यामुळे भारतातील नागरिकांना काही गोष्टींची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली किंवा काही गोष्टी त्यांच्या लक्षात येऊ लागल्या की ज्या गोष्टींवर त्यांनी यापूर्वी आपल्या आयुष्यात कधीही विचार केलेला नव्हता किंवा त्यांच्याकडे त्यांनी वेळेच्या कमतरतेमुळे दुर्लक्ष केले होते. घरातील व्यक्तींबरोबर बराच काळ व्यतीत केल्यामुळे नातेसंबंधांचे खरे महत्त्व समजून आले. परिवार खऱ्या अर्थाने एकत्र आले.आपल्या परिवारातील सदस्यांबरोबर नात्याची वीण अधिकच घट्ट झाली व त्यांच्याबरोबर भावनिक संबंध जोडले गेले.आपल्...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा