पोस्ट्स

संगीत लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मोहम्मद रफी यांची संपूर्ण मराठी गाणी | All marathi song's off mohammad rafi

इमेज
प्रभु तू दयाळू कृपावंत दाता  दया मागतो रे तुझी मी अनंता जगविण्यास देहा दिली एक रोटी  नमस्कार माझे तुला कोटी कोटी  वासना कशाची नसे अन्य चित्ता तुझ्या पावलांशी लाभता निवारा  निघे शीण सारा मिळे प्रेमधारा  सर्व नष्ट होती मनांतील खंता ज्ञान काय ठावे मला पामराला  मनी शुद्ध माझ्या असे भाव भोळा  तुझे नाम ओठी नको वेदगीता ________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾अभंग :- भेटी लागी जीवा लागलीसे आस

इमेज
🌻 *आनंदी पहाट* 🌻            *मनाचिये वारी पंढरीची*          *भक्ती मार्गाच्या वाटेवरची*               *श्रीक्षेत्र देहूनगरीतून आज तुकोबांच्या पालखीचे प्रतिनिधिक प्रस्थान.*           🛕          🚩👣🚩                 🚩👣🚩                                          🌹⚜️🚩🔆🙏🔆🚩⚜️🌹         *परमेश्वरी शक्तीवर ज्यांचा विश्वास आहे त्यांना हे नक्कीच पटते की केव्हा कसे वागावे याची सद्बुद्धी परमेश्वरच देतो.*         *यंदा विठुरायाची इच्छा अशी की तुम्ही माझ्या भेटीसाठी येण्याची गरज नाही. त्यासाठीचे कष्ट तुम्ही उपासनेत खर्च करावेत. मानस पूजेने तुम्ही माझे चिंतन करा.*         *मनाचे वैशिष्ट्य असे की तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करता, त्या गोष्टीचा जगभर प्रवास मन घडविते. जेव्हा हे मन विठ्ठलालापाशी स्थिरावते तेव्हाही याची अनुभुती प्राप्त होते.*         *चांगल्या आठवणी या मनात सदैव आनंद.. उत्साह.. चैतन्य निर्माण करतात. मग आज डोळ्या समोर यावा पंढरीला निघालेला तो देहू नगरीतला जगदगुरुंचा पालखी प्रस्थानाचा देखणा सोहळा. ते शिस्तीतले शुभ्र वेषातील टोपी घाललेले वारकरी. फुलांनी सुशोभित पालखी.. तुकोबांच्य

◾भक्तीगीत :- एकतारी संगे एकरूप झालो

इमेज
 🌻 आनंदी पहाट 🌻 मनाचिये वारी पंढरीची सफल जीवनाचे रहस्य सांगणारी 🌹⚜️🌸🚩🛕🚩🌸⚜️🌹     *देवाचिये द्वारी उभा क्षणभरी*     *तेणें मुक्ती चारी साधियेल्या*     *हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा*     *पुण्याची गणना कोण करी*                 मुक्ती म्हणजे आनंद. "न लगे मुक्ती धनसंपदा.. संत संग देई सदा" असं तुकोबा म्हणतात. संत भक्तीचा उपाय हा नामस्मरण सांगतात. पंढरी वारीमध्ये संत सहवास लाभतो तो नामस्मरणाने. त्याने सुखोपभोगी जीवनाचा खरा अर्थ सांगणारी दृष्टी लाभते.         माऊली म्हणतात.. देवाच्या दारात क्षणभर जरी उभे राहिले तरी सलोकता, समीपता, सरुपता आणि सायुज्यता या चारही मुक्तीचा लाभ होतो.         मुक्ती म्हणजे खरा आनंद. सलोकता म्हणजे ही जगताची सृष्टी भगवंताची आहे, त्याचे सानिध्य मला आहे. समीपता म्हणजे तो सदैव माझ्याच सोबत आहे. सरुपता म्हणजे मी त्याचाच अंश आहे. सायुज्यता म्हणजे तो आणि मी वेगळे नाहीच. हा मुक्तीचा अर्थ पटतो आणि मग सर्वदूर.. प्रत्येकामध्ये विठ्ठलच दिसतो.. इतरांशी वागणूक बदलते. या आनंदासाठी विठ्ठल भक्तीत रमून त्या अगणीत पुण्याने जीवन आनंदी होते.         मनाचिये वारीत ज्ञा

◾अभंग :- ऊठ ऊठ पंढरीनाथा | mp3 abhang download | marathi song

इमेज
       🌻 आनंदी पहाट 🌻          !! मनाचिये वारी पंढरीची !!   विठुरायाला भक्तांच्या विनवणीची 🌹⚜️🌸🚩🛕🚩🌸⚜️🌹     हरीच्या भजनें हरीचे भक्त     हरीचे भक्त ।     झाले विख्यात भूमंडळीं ॥     तरोनि आपण तारिले आणिका ।     वैकुंठनायका प्रिय झाले ॥     ज्यांचे ध्यानी मनीं हरी ।     राहिला निरंतरीं दृष्टीपुढें ॥             ......संत निळोबा         पिंपळनेरच नाहीतर शिरुर.. पारनेर या अहमदनगर जिल्ह्यातील गावाची ओळख आहे संत निळोबांच्या गुरुभक्तीमुळे.         संत निळोबांची पालखी यंदाच्या मनाचिये वारीत आहे. संत निळोबा हे गुरुभक्तीचे आदर्श. असिम श्रद्धा आणि विश्वास या बळावरच जग चाललेय. संत निळोबा हे संत तुकाराम महाराजांचे शिष्य.. निस्सिम भक्त. तुकोबांचे जीवन.. विठ्ठल भक्ती आणि अभंग ऐकून त्यांनी शिष्यत्व पत्करले. त्यांचे तुकोंबांवर एवढे प्रेम की ते म्हणतात..       तुका ध्यानी, तुका मनी ।      तुका दिसे जनी वनी ।      तुका तुका म्हणोनी ।      निशिदिनी बोलावे ॥         निळोबांचे गुरुप्रती असलेले हे प्रेम, निष्ठा आणि भक्ती यामुळेच संत तुकोबांना वैकुंठाहून त्यांना दर्शन देण्यास यावे लागले अशी आख्यायिका

◾भक्तीगीत :- देव माझा विठू सावळा | mp3 abhang download | marathi song

इमेज
🌻 आनंदी पहाट 🌻 !! मनाचिये वारी पंढरीची !! सत्संगींच्या सहवासातील 🌹⚜️🌸🚩🛕🚩🌸⚜️🌹         चंदनाचे झाड परिमळे वाढ ।      त्याहुनी कथा गोड विठ्ठलाची ॥      परिमळू सुमने जाई जुई मोगरे ।      त्याहुनी साजीरे हरि आम्हा ॥      आम्हा धर्म हरि आम्हा कर्म हरि ।      मुक्ती मार्ग चारि हरि आम्हा ॥        .....संत निवृत्तीनाथ महाराज         श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर ही निवृत्तिनाथांच्या वास्तव्याने पुनीत अशी संतभूमि. भारतीय संस्कृतीने प्रदान केलेली विश्वातील सर्वश्रेष्ठ अशी विश्वकल्याणाची माऊलींची प्रार्थना म्हणजे पसायदान. हे उदार हृदयी पसायदान जन्मले निवृत्तिनाथ कृपेने. निवृत्तिनाथांच्या आज्ञेने माऊलींनी आपल्या स्वतंत्र प्रज्ञेने संस्कृत गीतेवर सुलभ मराठीत ज्ञानेश्वरी लिहिली आणि ती जगविख्यात ठरली.         यंदाही मनाचिये पंढरी वारीत दहा पालखीमध्ये निवृत्तिनाथांची पालखी आहे. भागवत धर्माचे निवृत्तिनाथ हे आद्यगुरु. त्यांनी  ज्ञानेश्वर.. सोपानदेव.. मुक्ताबाईंचा सांभाळ तर केला. त्यांचे गुरु झाले. भागवत धर्माचे सारेच संत त्यांचे मोठेपण मान्य करुन वंदन करतात.         या पंढरीच्या राजाच

◾गीत :- शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी

इमेज
꧁ 🌻 आनंदी पहाट 🌻 ꧂ ⚜⚜⚜ शुभविवाह मंगलपर्व विशेष ⚜⚜⚜ 💞🥀🌸🔆💑🔆🌸🥀💞          स्वप्न ही सगळेच बघतात. रम्य स्वप्न उराशी बाळगून केलेली वाटचाल ही पण जीवनाला अर्थ देते. त्या वाटचालीतही आगळे समाधान प्राप्त होते.         आता आज आकाशात तो शुक्रतारा उगवलाय.. तळ्याच्या पाण्यात सर्वत्र ते आल्हाददायक चांदणेच दिसतेय छान मंदमंद वारा वाहतोय आणि ज्याच्या सोबतीने आजन्म वाटचाल करावी असे वाटले, तो सहकारी भेटल्याने नकळत गाणे गुणगुणले जातेय की तू अशीच जवळ रहा.. माझ्या डोळ्यांत डोळे मिसळून रहा.         आज हा आनंद शब्दा पलिकडचा. या भावना शब्दांत वर्णन करणे अशक्यच. पण तू मात्र ते समजून घे. तूला फुलांसारखे कोमल मन लाभलेय. त्याच्या गंधाने अंतरंगात स्पंदने निर्माण होत अंग शहारुन गेलेय. या सुखद स्वराने मी पुर्णपणे भारावून गेलोय. या सुखद स्वरांनी जन्मभर सोबत करावी. माझे स्वप्न आज सत्यात उतरलेय.   🌹🔆🥀👁❣👁🥀🔆🌹 *_शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी_* *_चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी_* *_आज तु डोळ्यांत माझ्या..._* *_आज तु डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा_* *_तु अशी जवळी रहा, तु अशी जवळी रहा_* *

◾अभंग :- पंढरीची वारी जयाचिये कुळीं |

इमेज
   🌻आनंदी पहाट🌻   मनाचिये वारी पंढरीची   सुलभ भक्ती सोपानाची 🌹⚜️🌸🚩🛕🚩🌸⚜️🌹        उघडली दृष्टी इंद्रिया सकट ।      वैकुंठीची वाट पंढरी जाणा ॥      दृष्टीभरी पाहे विठ्ठल दैवत ।      पूर्ण मनोरथ विठ्ठल देवे ॥  .....संत सोपानदेव         सासवड पुण्यालगतचे गाव. सोपानदेवांच्या वास्तव्यामुळे पुनीत अशी ही भूमी. सोपान अर्थातच भक्ती मार्गाचा डोंगर पार  करण्यासाठी सुलभ शिकवण देणारे असे सोपानदेव. हे सोपानदेव भाग्यवान. त्यांना घरीच गुरु लाभले ते ज्ञानीयाच्या राजाचेही असे गुरु निवृत्तीनाथ.         सोपानदेव बालपणापासून भाऊबहिण.. संत नामदेवासह पंढरी वारी करायचे. त्यांच्या उक्ती आणि कृतीने त्यांनी भक्ती मार्ग सुलभ केलाय. यंदाही मानाच्या दहा पालखीमध्ये ज्ञानोबा, तुकोबांच्या समवेत सोपानदेव आहेतच.         भौतिक जगात सदैव सुखाची तळमळ असते. जीवन सुखी.. सुरक्षित.. आनंदी व्हावे म्हणून सतत नवनवीन शोध लागतात. पण तरीही मनुष्य जीवनातील चिंता कमीच होतच नाहीत. मनःशांती लाभतच नाही. सुरक्षितता वाटतच नाही.          मग जीवनात सदैव असलेल्या शाश्वत सुखासाठी आमचे संत वाट दाखवतात ते भक्ती मार्गाच्या पंढरीची. वारीत ट

◾गीत :- गणपती महिमा सांगणारे गाणे

इमेज
🌻 आनंदी पहाट 🌻   ⚜️⚜️⚜️⚜️⚜️   शब्दप्रभू जगदीश खेबूडकर                            "माझी परंपरा कोण चालवेल ही चिंता या जगदीश खेबूडकर पोराने मिटवली".. इति गदिमा.         आपल्या क्षेत्रातील दुसऱ्या प्रतिभावंताला दिलखुलास दाद देणारे.. कौतुक करणारे.. मोठेपणा मान्य करणारे लोक फारच थोडे. गदिमां यापैकीच एक.         जेव्हा मराठी चित्रपटात गीतकार म्हणून गदिमांचा एकछत्री अंमल होता तेंव्हा जगदीश खेबूडकरांचा प्रवेश झाला. लवकरच हे नाव सर्वोतमुखी झाले. गदिमांचेही याकडे बारीक लक्ष होते. खेबूडकर यांची गीते विविधांगी तरीही सकस.. ते पण सहजसुलभ भाषेत हे गदिमांना मान्य होते.         "हा.. पूढे माझीही आठवण विसरायला लावेल.." अशी गदिमांनी सर्वासमक्ष केलेली स्तुती ऐकताच तत्काळ खेबूडकर म्हणाले.. "गदिमा हे हिमालय आहेत.. मी गदिमांच्या पाऊलवाटेवर चालतोय.. त्यांचे ठसे समुद्राच्या वाळूवरचे नाहीत, तर पाषाणावरचे कधीच न मिटणारे ठसे आहेत.. मी हा हिमालय चढणार नाही, तर या भव्य हिमालयाला प्रदक्षिणा घालेल.." असे आपले शिष्यत्व खेबूडकरांनी जगजाहीर केले. एकमेकांचा सन्मान करणारी ही गुरुशिष्य जोडी

◾गीत :- देहाचे आवरण गळूणी गेले

इमेज
          🌻 आनंदी पहाट 🌻           आत्मसाक्षात्काराची             🌸🚩🔆🌺🎶🌺🔆🚩🌸                 कोकणातील संतपरंपरेचे एक पवित्र स्थळ म्हणजे पावस. रत्नागिरी जवळचे हे ठिकाण पावन झालेय ते स्वामी स्वरुपानंदांच्या वास्तव्याने. खरं म्हणजे स्वामी स्वातंत्र्य सैनिक. स्वातंत्र्यासाठी येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगतानाच सोहम् साधनेकडे वळले.          हिरव्यागार निसर्ग कुशीत पावस येथे स्वामींचे समाधी मंदिर आहे. स्वामींनी देसाई कुटुंबियांकडे एकाच ठिकाणी ४० वर्षे राहून ज्ञानसाधना केली. अनेक ग्रंथ लिहले. ज्ञानेश्वर माऊलींचे भक्त. नित्य पठनासाठी ९००० ओवींची ज्ञानेश्वरी १०९ ओवीत लिहली. ज्ञानदेवांकडून स्वामी स्वरुपानंदांकडे आलेली सोहम साधना हा भक्तांसाठी सुलभ असा राजमार्गच. या योगींनी सुखी जीवनासाठी लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला.         मनुष्याचा गर्भावस्थेत असलेला जीव "अहं ब्रह्मासी" मी ब्रह्म आहे हे जाणतो. पण जन्म होताच "कोहम् कोहम्" अर्थातच "मी कोण" हे विचारतो. मग सुरु होतो तो जीवन प्रवास. या प्रवासात अनेक सुखदुःखाचा सामना हा जीव करतो. जीवनात सगळे भोग हे जीव भोगतो. सुख

◾कविता :- आईवडीलांचे उपकार

इमेज
आईवडीलांचे उपकार  न करता येई फेड ऋणांची  आईवडीलांच्या उपकारांची  न मोजता येती उपकार  ते चांदण्यांपेक्षाही फार  न गरज मुलाविना कशाची  वेळ घालवू त्यांच्या सोबत  विचार करु त्यांच्याबाबत  दोन शब्द हवी त्यांना प्रेमाची आवड ही पसंत करुनी  विचार त्यांचे मान्य करुनी  पाड वर्षा केंव्हातरी हर्षाची  त्या बोलण्याला मान देऊनी मताचा त्या आदर करुनी  घे शोध मुखाच्या हर्षि तेजाची  रागवल्याने न रागवता हसऱ्या मुखाने तु बोलता  ओळखून भाषा त्यांच्या प्रेमाची  लेकरा मिळावे खुप सुख  मातापित्या इतकीच भुक  पाहणी कर मनाची,हृदयाची  स्वछ मनातुनी,हृदयातुनी देण थोडीशी त्यांच्याकडूनी घे रे प्रेमाची प्रेमाची प्रेमाची 📜 रमा शिरशे  माझी दुसरी कविता |  स्वप्न फुलवरा | रमा शिरशे | click here _______________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾विशेष लेख आणि गाणी :- वटपौर्णिमा | जगदीश खेबूडकर

इमेज
🌻 आनंदी पहाट 🌻                          वटपौर्णिमेची                       🌹🥀🌿🌸🌳🌸🌿🥀🌹          प्राणवायू.. हा सध्याच्या काळात जगभर चर्चा होणारा विषय. पण भारतीय संस्कृतीने हे प्राणवायूचे महत्त्व केव्हाच ओळखले होते, म्हणूनच सण कोणताही असो आम्ही निसर्गाशी मैत्री करतो.         जगदगुरु संत तुकाराम म्हणूनच वृक्षवेलींना सोयरे मानतात. निसर्ग संरक्षण, संवर्धन.. संगोपनासाठी श्रद्धेचे कथाभाग जोडून हे निसर्ग पूजनाचे संस्कार रुजविले गेलेत.         वड तर औषधी वृक्ष. याची साल.. पाने.. फळेच काय पण समिधाही जीवनाला उपकारक. वड हा मोफत प्राणवायूचा खजिनाच. शेकडो वर्षाचा सेवाव्रती. आजही विस्तिर्ण डेरेदार वृक्षाच्या सानिध्यात पिढ्यानपीढ्या सुखेनैव जगताहेत.         स्त्रीच्या जीवनात पती हा तिच्या संसाराचा प्राण. यमराजाकडून पतीचे प्राण पुन्हा परत मिळवणारी ही भार्येची.. वटसावित्रीची पूजेची कथा. ही सावित्री वटवृक्षाप्रमाणेच आपल्या पतीला सत्यवानाला दीर्घायुष्य लाभण्याचे वरदान प्राप्त करते.         सावित्री ही बुद्धिमान.. आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी जंगलात राहणारी चतुर पतिव्रता होती. प्रत्यक्ष यमाच

◾कविता :- तुझ्यासाठी पांडुरंगा

इमेज
##   तुझ्यासाठी पांडुरंगा  ## बोलता बोलता देवा आली आषाढी वारी सांग तुच आम्हा आता कसे यावे तुझ्या दरबारी...  केलेस तुच आमचे इथले सारे रस्ते बंद कसा ठेवायचा देवा तुझ्याशी आता संबंध...  तुला अशक्य नाही काही पण तु मनात आणत नाही आता तरी तुझ्यासाठीच  जरा आमच्याकडे पाही...  करुन टाक सारे रस्ते कायमचेच आता खुले तुझ्यासाठीच पांडुरंगा  खुशीत वारकरी डुले...  कवीवर्य- आत्माराम रामदास शेवाळे  'शब्दस्नेही' रा. वाघोली   ता.शेवगाव जि. अहमदनगर ८२७५२००७२० ____________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾कविता :- स्वप्नफुलवरा

इमेज
    स्वप्नफुलवरा     फुलात हा फुलवरा मांडला कुणी सांग जरा  या मनगुलमोहरा फुल हे पाकळ्यांचे  साधन प्रसन्नततेचे सुगंधा दरवळण्याचे  गुणधर्म हे पुष्पाचे  नष्ट होई फणकारा  दृश्य पाकळीप्रकरा  जिवन सुखदुःखाचे  क्षणीच कोमेजण्याचे  मृदेत मिसळण्याचे पुष्पासम गुण औषाचे  फुलला स्वप्नफुलवरा  या मनात भरभरा  कोमल पाकळ्यांविना  अर्थ न अमोल जिवना  भाव्याशा स्वप्नांविना  अमधुरसे जिवना  फुलेल औष सरसरा फुलता स्वप्नफुलवरा   रमा शिरशे ____________________________________________ टिप : -{ कविता कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾जीवन मंत्र :- आदर्श जीवन जगण्यासाठी २० मंत्र

इमेज
आदर्श जीवन जगण्यासाठी ☞ (०१) चूक झाली तर मान्य करा. ☞ (०२) समोरच्याचे मत विचारात घ्या. ☞ (०३) चांगल्या कामाची स्तुती करा. ☞ (०४) आभार मानायला विसरू नका. ☞ (०५) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा. ☞ (०६) सतत हसतमुख रहा. ☞ (०७) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा. ☞ (०८) कुणाच्याही व्यंगावर हसु नका. ☞ (०९) स्वतःची कुवत व ताकद ओळखा. ☞ (१०) टिका तक्रार यात वेळ घालवु नका. ☞ (११) कृती पुर्व विचार करा. ☞ (१२) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका. ☞ (१३) क्रोधावर नियंत्रण ठेवा. ☞ (१४) मैत्री भावना कायम मनी राहु द्या. ☞ (१५) नेहमी सत्याची कास धरा. ☞ (१६) इतरांना चांगली वागणूक द्या. ☞ (१७) विचार करून बोला. ☞ (१८) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा. ☞ (१९) वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास टाळा. ☞ (२०) कामापुर्ती मैत्री ठेउन खरी मैत्री गमाऊ नका. कुटुंब  टिकवणे का महत्वाचे आहे ,,,, आज परत एकदा नकळत मुंगी तळ्यात पडली स्वतःला वाचविण्यासाठी  झाडाचं पान आणि कबुतराची वाट पाहू लागली  मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला  झाडावरच बसून  असहाय मुंगीला मरताना पाहू लागला  कबुतर

◾बोधकथा :- कर्म हीच पूजा | रामकृष्ण परमहंस

इमेज
एकदा एक बाई रामकृष्ण परमहंसाकडे आल्या आणि म्हणाल्या , " मला या संसाराचा विट आला आहे . मुलं मोठी झाली. आता... प्रपंच सुटेल असे वाटले. पण... नातवंडांच्या प्रेमात पडले . रोज त्याला सांभाळावे लागते . परंतु आता घर सोडायचा विचार आहे . "  रामकृष्णांनी विचारले ,  " घर सोडून तुम्ही काय  करणार ? " त्या बाई म्हणाल्या ,  " गंगेच्या तीरावर एक झोपडी बांधणार . त्यात श्रीकृष्णाची मूर्ती बसविणार . रोज त्या मूर्तीची पूजा करणार . कृष्णाला नेवैद्याने जेवू घालणार . कृष्णाला झोपेतून उठविणार, आंघोळ घालणार." परमहंसांनी विचारले, " श्रीकृष्णाची मूर्ती दगडाची असणार ना ? " तेव्हा त्या बाई ' हो ' म्हणाल्या . रामकृष्णांनी विचारले ,  " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार ? "  त्या बाई ' हो ' म्हणाल्या .  त्यावर रामकृष्ण म्हणाले .  "आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार , मग नातवंडामध्ये श्रीकृष्ण का पाहत नाहीत ? श्रीकृष्ण समजून नातवंडाला जेवू घाला. श्रीकृष्ण म्हणून आंघोळ घाला. श्रीकृष्ण म्हणून त्याला झोपवा. "   तुम्ही तुमच्या नातवंडानाच तु

◾संगीत :- राजा ललकारी अशी दे | जगदीश खेबूडकर | song download mp 3

इमेज
🌹🌸🌴🌾🦋🌾🌴🌸🌹                       ज गात कितीही शोध लागले तरीही पोटाची भूक भागविण्यासाठी एकमेव पर्याय आहे तो शेतीचाच. लहरी निसर्गाशी झगडत आमचा बळीराजा काळ्या मातीतून सोने पिकवतो.         संपुर्ण शेतकरी कुटुंबच शेतात राबते. या कष्टातही ते आनंद शोधतात. अहोरात्र कष्ट करताना एकच स्वप्न उराशी बाळगतात की सारे काही हिरवेगार होऊन हे शिवार फुलू दे.          आपल्या धन्याविषयी.. त्याच्या कष्टाविषयी.. त्याच्या लक्ष्मीला प्रचंड आदर असतो. तो जेव्हा शेतात राबतो तेव्हा ती सुद्धा खांद्याला खांदा लावून मदत करते. त्याला साद घालते. जेव्हा कष्टाचे चीज होते.. शिवार फुलते तेव्हा धन्यामध्ये वाघाचे बळ येतं.         भरलेल्या मोटेप्रमाणे त्यांचे मन फुलते. तिचा.. त्याचा सूर.. ताल जमलाय. तिचा आनंद बघून तो पण खुष होतो. तो कष्ट उपसतो, तिला ठाऊक आहे त्याच्या घामातून मोती तयार होणार आहेत, कारण ही माती मायाळू आहे. दुपारी थोडा वेळ विश्रांतीला झाडाची सावली मिळू दे.. अर्थातच सर्वत्र वनराई बहरू दे हे मागणे.         शेतकरी कुटुंबाची ही सुखाची अपेक्षा.. ही ललकारी.. साद जगाच्या आनंदासाठी आहे. अपार कष्टातही आनंदाने जगणाऱ

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...