'स्व'चा शोध...

👇👇👇🙏
अतिशय वाचनीय लेख
👇👇👇
'स्व'चा शोध..
👆👆👆
सत्य सांगण्याची आणि सत्य स्वीकारण्याची शक्ती असेल तरच सत्य बोलावे. अन्यथा हे जग बेईमान लोकांची जत्रा आहे! पृथ्वीतलावरील करोडो लोकांनी फक्त २४ तासांसाठी ठरविले की, मला जे कुणाबद्दलही काहीही जे वाटते ते त्याला जाऊन सांगावे, तर या जगात मुश्किलीने एखाद्या माणसाची दोस्ती टिकेल.. 

सत्य फक्त कडवट नसते तर ते दाहक आणि धोकादायक सुद्धा असते. सत्य ऐकण्याच्या मनस्थितीत कोण आहे?आणि सत्य सांगण्याचा धोका तरी कोण स्वीकारेल? म्हणून लोक तोंडावर गोड गोड बोलतात. तुमची स्तुती करतात आणि पाठ फिरताच बरोबर उलट बोलतात. तुम्ही प्रयोग करून बघा. तुम्ही तुमच्या इष्टमित्र, नातेवाईक किंवा अगदी रक्ताची माणसे यांच्याबाबत तुम्हाला त्यांच्या बद्दल मनापासून जे वाटते ते बोलून पहा.. तुमची असत्यावर उभी असलेली घरे कोसळतील, मैत्री, प्रेम वगैरेचे पत्यांचे बंगले धडधडा कोसळतील. तुम्ही एकटे पडाल. या एकटेपणाच्या भयाने आपल्याला  ग्रासले असल्याने आपण आपले सगळे मानवी सबंध खोटेपणाच्या पायावर टिकवले आहेत. म्हणून सत्याचा मार्ग काटेरी आहे हे वाक्य तंतोतंत खरे आहे. 

दुसऱ्याबद्दल सत्य सांगणे किंवा आपल्याबद्दलचे सत्य ऐकणे हे या बेईमान जगात अगदीच अशक्य आहे. पण सत्य जाणून घेण्याचा आणखी एक मार्ग आपल्याकडे आहे. हा जादुई मार्ग जर तुम्हाला अनुसरता आला तर त्याच्या इतके थोर या जगात काहीच नाही. तो मार्ग आहे स्वतःच्या आत डोकावण्याचा. तुम्ही काय आहात? आणि कसे आहात? हे तुम्ही सोडून, इतर कुणीही कितीही प्रयत्न केला तरी त्याला माहित पडणार नाही. या पृथ्वीतलावर तुम्हाला ओळखणारे फक्त तुम्हीच असता. पण असे आत पहायचे ठरवले तर स्वतःच्या हाताने स्वतःची चामडी सोलून घेण्यासारखे आहे म्हणून लोक बाहेर पाहतात. बाहेर टीका करावीच. पण बाहेर टीका करण्याआधी आपण स्वतःवरच टीका केली तर बाहेरच्या सत्याला अर्थ प्राप्त होतो. लोक तुम्हाला गांभीर्याने घेतात. अन्यथा तोंडदेखले तुमच्याशी गोड बोलतील पण तुम्ही काय म्हणता हे एका कानाने ऐकतील आणि दुसऱ्या कानाने सोडून देतील. टाळ्या मात्र भरपूर वाजवतील. 

आपण जे काही बोलतो ते आपल्या आचरणात असेल तरच ते लोकांना भावते. अन्यथा सिनेमातल्या अमिताभच्या अभिनयाला लोक टाळ्या वाजवतात तश्या तुमच्या तथाकथित प्रबोधनाला टाळ्या वाजवतील. तुम्हाला हारतुरे घालतील आणि बोलका पंडित समजून तुम्हाला त्यांच्या भावविश्वातून वजा करतील. वरवर तुमच्याशी जोडल्याचा अभिनय मात्र अगदी अस्सल करतील. या जगातील बहुतांशी लोक चांगला विचार ऐकतात किंवा वाचतात त्यामागे प्रत्येक माणसाची एक विचित्र मानसिकता कार्यरत असते. असे काही चांगले ऐकले की ते स्वतःच्या आत स्वतःला सांगतात की हे जग जेवढे वाईट आहे तेवढा मी वाईट नाही. असे केल्याने लोकांचा अहंम सुखावतो. बाबा लोकांच्या प्रवचनाला जी गर्दी दिसते त्या गर्दीत असुरक्षित लोक तर असतातच पण असा स्वतःच्या अहमच्या सुखाचा शोध घेणारेही काही कमी लोक नसतात. 

मुद्दा आहे 'स्व'च्या सत्त्याचा शोध घेण्याचा.. दुसऱ्या कुणी आपले गुणदोष दाखविण्यापेक्षा आपणच आपला शोध घेतला तर ते कधीही चांगलेच. आपण जगराहाटी सारखे सामान्य जीवन जगत असताना जगण्यात आणि वागण्यात फरक पडला तर फार काही होत नाही. पण आपण जेव्हा सामाजिक कार्यकर्ते असतो तेव्हा आपल्याला कथनी आणि करणी एकच ठेवावी लागते. आपण असे करू शकलो नाही तर संभाव्य तोटा हा फक्त व्यक्तिगत तोटा राहत नाही. तर तो सामाजिक तोटा असतो. आजपर्यतच्या चळवळी याच कारणाने मोडकळीस आल्या. 

आपणच आपली झाडाझडती घेतली आणि 'स्व'चा शोध घेतला तर नक्कीच त्याचा फायदा सामाजिक कार्याला होईल म्हणून सत्याचा शोध बाहेर घेण्यापेक्षा जरा आतूनही घेण्याचा प्रयत्न करू.

लोकशाहीर संभाजी भगत, 
मिशन माणुसकी
#माणुसकीची_शाळा
#missionmanuskey

___________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

निसर्ग किमया कि देवता ... Mother Nature

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...