विमानात जेवण ...

विमानात जेवण

विमानात मी माझ्या सीटवर बसलो.  दिल्लीला जायचे अंतर अडीच तासांचे आहे.  पुस्तक वाचणे, तासभर झोप घेणे .. 
या गोष्टी मी माझ्या प्रवासात 
बहूधा करतो.

टेक ऑफच्या अगदी आधी १० सैनिक आले आणि माझ्या आजूबाजूच्या सीटवर बसले. सर्व जागा भरल्या. 
मी माझ्या शेजारी बसलेल्या सैनिकाशी संवाद साधला …
"कुठे जात आहात ?"

"आग्रा, सर ! दोन आठवडे तिथे प्रशिक्षण घेणार आहोत. त्यानंतर, आम्हाला ऑपरेशनसाठी पाठवले जाईल," तो म्हणाला.

तासभर गेला. घोषणा ऐकू आली.  ज्यांना पाहिजे ते पैसे भरून जेवणाची पॅकेट्स मागवू शकतात. दुपारच्या जेवणाचा ताप संपला असे मला वाटले, मी पर्स घेऊन माझे दुपारचे जेवण बुक करण्याचा विचार करत असताना एका सैनिकाचे बोलणे ऐकू आले.
"आपणही जेवण मागवूया का ?" 
एका  सैनिकाने विचारले, 
"नाही ! त्यांचे जेवण महागडे आहे. आपला प्रवास पुर्ण झाला की विमानातून उतरून नेहमीच्या हॉटेलमध्ये जेवू या !"
"ठीक आहे !" इतर सैनिकांनी लगेच मान्य केले.

मी फ्लाइट अटेंडंटकडे गेलो व तिला सर्व सैनिकांच्या जेवणाचे पैसे दिले अन् म्हटले "सगळ्यांना जेवायला द्या."  मला तिच्या डोळ्यात अश्रू दिसले.  "माझा धाकटा भाऊ कारगिलमध्ये आहे, सर ! तुम्ही त्याला जेवण दिल्यासारखं वाटतंय सर." 
मी माझ्या सीटवर येऊन बसलो.
अर्ध्या तासात सर्वांसाठी जेवणाची पॅकेट्स आली... मी जेवण संपवून विमानाच्या मागे वॉशरूमला जात होतो. मागच्या सीटवरून एक वृद्ध गृहस्थ आला, "माझ्या सगळं लक्षात आलंय, तुझं अभिनंदन, मला या चांगल्या कामात वाटा घ्यायचा आहे” असे म्हणून माझ्याशी हस्तांदोलन केले व 500 रुपयांच्या काही नोटा त्याने माझ्या हातात ढकलल्या ... "मला तुझ्या आनंदात सहभागी होऊ दे."

मी परत आलो व माझ्या सीटवर बसलो. अर्धा तास गेला. विमानाचा पायलट माझा सीट नंबर शोधत माझ्याकडे आला. तो माझ्याकडे बघून हसला. तुमच्याशी हस्तांदोलन करायचे आहे असे तो म्हणाला. मी माझा सीट बेल्ट सोडला आणि उभा राहिलो. 
तो माझा हात हलवत म्हणाला, 
"मी फायटर पायलट होतो. तेव्हा तुझ्यासारख्या कोणीतरी मला जेवण विकत आणले. ते तुझ्यातील प्रेमाचे प्रतीक आहे. ते मी कधीच विसरणार नाही."

विमानातील प्रवाशांनी टाळ्या वाजवल्या. मी थोडा संकोचलो. 
मी केली ती चांगली गोष्ट होती पण मी ते कौतुकासाठी केलेले नव्हते.

प्रवास संपला. मी उठलो आणि पुढच्या सीटकडे गेलो व उतरण्यासाठी दाराजवळ उभा राहिलो. एका तरुणाने माझे नाव टिपुन घेतले आणि माझ्याशी हस्तांदोलन केले. दुसऱ्या एका व्यक्तीने माझ्या खिशात काहीतरी ठेवले आणि न बोलता निघून गेला. दुसरी टीप.

विमानातून उतरताना माझ्यासोबत उतरलेले सैनिक एका ठिकाणी जमा झाले होते. मी त्यांच्याकडे गेलो आणि विमानातील सहप्रवाशांनी मला दिलेल्या नोटा काढल्या आणि त्यांच्या हातात दिल्या, "तुम्ही तुमच्या प्रशिक्षणाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी हे पैसे तुम्हाला काहीही खाण्यासाठी उपयोगी पडतील. आम्ही जे काही देतो ते कमी आहे. तुम्ही आम्हाला दिलेल्या संरक्षणापेक्षा … 
माझ्या डोळ्यात नकळत अश्रू आले.

ते दहा सैनिक विमानातील सर्व प्रवाशांचे प्रेम आपल्यासोबत घेऊन जात आहेत. माझ्या गाडीत चढताना, "जे या देशासाठी प्राण देणार आहेत त्यांच्या दीर्घायुष्याची काळजी घे, परमेश्वरा !” अशी मी मनापासून देवाला प्रार्थना केली. एक सैनिक असा असतो जो भारताला दिलेल्या कोऱ्या चेकप्रमाणे आयुष्य घालवतो.

तरीही त्यांचे मोठेपण न जाणणारेही आहेत ! तुम्ही शेअर करा किंवा नका करू तुमची निवड ! भारतमातेच्या या प्रेमळ बालकांचा आदर करणे म्हणजे आपल्या स्वतःचा आदर करणे होय !

 जय हिंद 🙏
 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

 👮‍♂️👮‍♂️👮‍♂️👮‍♂️👮‍♂️

_________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

आपली सहल खूप छोटी आहे ... Short Tour

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट