◾विशेष लेख :- इच्छा तिथं मार्ग...
मनाचा निश्चय केला की, व्यक्ती आपले ध्येय निश्चितपणे गाठू शकते. फक्त गरज असते ती प्रबळ इच्छाशक्तीची! जगात कोठेही असलात तरी एकदा तुमच्या मनाने ठरवले, तर तुम्ही तुमचा हेतू सहज साध्य करू शकता. यश प्राप्त करण्यासाठी यशाची तीव्र ओढ असावी लागते. हृदयापासून काही करायचे ठरवले आणि ते पूर्ण करण्याची ज्वलंत इच्छा असली, तर ठरविलेले कार्य निश्चित पूर्ण होऊ शकते. प्रबळ इच्छाशक्तीमुळे आत्मविश्वास बळावतो, निर्णयक्षमता वाढते, उत्साह निर्माण होतो; तसेच ध्येय गाठण्यासाठी गतिशीलता आणि कृतिशीलता दोन्हींमध्ये आवश्यक असणारा समन्वयही निर्माण होतो. एकदा एका तरुणाने महान विचारवंत सॉक्रेटिस यांना विचारले, ‘‘सर, आपण आयुष्यात इतके यशस्वी झाला आहात म्हणून मी आपल्याकडे यशाचे रहस्य जाणून घेण्यासाठी आलो आहे.’’ तरुणाची जिज्ञासा पाहून त्यांनी त्याला दुसऱ्या दिवशी गावातील नदीकाठी भेटायला बोलविले. अगोदर ठरल्याप्रमाणे ते दोघे नदीच्या काठावर भेटले. सॉक्रेटिस यांनी तरुणाला आपल्याबरोबर नदीकडे चालायला सांगितले. असे करीत करीत ते नदीच्या पात्रातून चालू लागले. खांद्यापर्यंत पाण्यात गेल्यावर सॉक्रेटिसनी अचानक त्या तरुणाचे