सारे जहासे अच्छा हिंन्दोस्थ हमारा | संजय धनगव्हाळ | yashacha mantra

👆👆👆👆👆👆
'सारे जहासे अच्छा हिंन्दोस्थ हमारा'
(हे माझे विचार आहेत सर्वांनाच पटतील असे नाही.मला 
वाटले म्हणून लिहले ,गैरसमज नसावा)
*संजय धनगव्हाळ*
*******************
वरील पोस्ट वाचली आणि माझ्या मनात अनेक विचारांची गर्दी झाली.खरतर जातपात धर्म हे जर सोडले तर हा  भारत देश सर्वांचा आहे.जेव्हा जेव्हा या देशावर काही आपत्ती आली किंवा येते तेव्हा सर्वकाही विसरून सर्वधर्मीय मदतीला एकत्र येतात त्यावेळी कोणी कोणाला जात विचरत नाही.संकट आले आहे त्यातून कसे सहिसलामत निघता येईल फक्त हाच विचार त्यावेळी प्रत्येकाच्या डोक्यात असतो मग तो कुठल्याही जातीचा असो त्यावेळी त्याच्यासाठी माणुसकी हाच मोठा धर्म असतो आणि सर्वकाही विसरून प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संकट निवारण करत असतो.आपल्याला कळत नाही पण या देशात आज असे बरीच माणस,कुटुंब आहेत की ते जात विसरून गुण्यागोविंदाने राहतात एकमेकांच्या सुख दुःखात,शुभ कार्यात सण उत्सवात त्यांचा सहभाग असतो.एकमेकांचा घनिष्ठ घरोबा असतो.मग तो मुस्लिम असो,हिंन्दी असो,नाहितर आणखी ईतर कोणत्याही जातीधर्माचा असो.कोणाशी कसे ऱ्हायचे,वागायचे हे अपण ठरवायचं असतं आपल्यावर असते की आपण कोणाशी कसे नाते टिकवून ठेवायचे.जेथे प्रेमाचे नाते जुळत असतील तेथे जर जात आणली किंवा आली तर मग कोणाचेही कोणाशी कुठलेही नाते जुळणार नाही.म्हणून जातीधर्मापेक्षा माणुसकी हाच मोठा धर्म आहे असं मला वाटंतं,जिथे माणुसकी असेलं तिथे निश्चित आपलेपणा असतो.ह्रुदयाच्या कुपीत जर प्रेमाचे फुले कायम टवटवीत असतील तर त्याचा सुगंध कुठेही,कोणत्याही जातीधर्मात मैत्रीच्या नात्याने दरवळत असतो.
 सकारात्मक विचारांनी संबंध जोडला तर कोणत्याही जातीधर्मात कटुता येणार नाही.पण जातीधर्माच्या नावाने जर.कोणी राजकारण करत असेल किंबहूना विष कालवत असेल तर तिथे माणुसकीच शिल्लक रहात नाही.मतभेद असावीत पण जातिभेद नसावा. कारण या देशात प्रत्येक जातीधर्माचे लोकं एकत्र राहतात,प्रत्येक जातीधर्माच्या संघटनामुळेच या देशाला भरभक्कम आधार आहे.प्रत्येक जातीधर्माच चिलखत किंवा कवच आहे म्हणूनच आजतागायत या देशात किती संकट आलीत केवळ प्रत्येक धर्माने ढाली होवून या देशाच रक्षण केले आहे.म्हणून या देशात सर्वधर्मसमभाव आहे.सर्वा धर्मीय एकत्र राहतात.व्यवहारीक,
व्यवसायीक देवानघेवाण होते.प्रतेकाला काहीना काही निमित्तमात्र गरज पडते म्हणून एकमेकांशी मैत्रीपूर्ण नातं ठेवावचं लागत.जर जातीपातीचा,धर्माचा तिरस्कार मनात ठेवला तर माणसांच जावूच द्या या देशाच काय होईल हा मोठा प्रश्न अनेकांसमोर उभा राहील.एक जात एक संघ याच बळावर भारत देश भक्कम आहे.काही नतद्रष्टे सुध्दा आपल्या अवतीभवती वावरत असतातच की जे माणसा माणसा मधे जातीपातीच विरूद्ध धर्माच विषाचं कालवन मना मनात भरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करित असतात पण त्यातून निष्पन्न काय? घातपात जाळपोळ  मारामारी!यातून काहीच मिळत नाही होते फक्त उपासमारी,बेरोजगारी शारीरिक अपंगत्व आणि या देशाच नुकसान.  
     खरतर प्रत्येकाने एकच विचार करून वागल पाहिजे,राहील पाहिजे,जगलं पाहिजे की ज्या देशात राहून आपला भाकरीचा प्रश्न सुटतो,रोजगार मिळतो हाताला काम मिळते घरदार गाड्या घेवून श्रीमंत होतो गडगंज संपत्ती गोळा करून सुखात राहतो त्याच देशात राहून जातीधर्माच्या नावाचे आपल्या देशाला ईजा पोहचवली किंवा,घाव घालून आपला भारत देश जखमी होत असेल तरं ईथे कस ऱ्हायचं हे ज्याने त्यानेच ठरवायचं आहे. म्हणून बोध घ्यायचा असेल तर स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या अंतविधीला आलेल्या जनसमुदायातुन घ्यायचा.या अंतयात्रेत अनेक धर्माचे लोक सहभागी होते.शिवाय सर्व राजकीय नेते,सेलेब्रिटी होते जो तो जात विसरून सहभागी झाला आणि ज्याने त्याने आप आपल्या धर्मानुसार लता दिदींना श्रध्दांजली अर्पण केली.लता मंगेशकर खूपच नावाजलेले दिग्गज व्यक्ती होती म्हणून यांच्या अंतयात्रेत अनेकांचा सहभाग होता असनाही.सर्वसामान्य लोकोंच्या बाबतीतही असे द्रुश्य बघायला मिळते.असे अनेक उदाहरणे देता येतील.शाहरुख खाने दुवा केली तर त्याच्या बायकोने नमस्कार केला,आणखी इतर धर्मीय असतील त्यांनी त्याच्या पध्दतीने प्रार्थना केली असेल.कोणी काय केले हे महत्त्वाचे नाही.पण ईथे कोणीही जातिचा अथवा धर्माचा विचार केला नाही सर्व धर्मीय सहभागी झालेत.
     या सुसंस्कृत देशात संस्कार आणि माणुसकी खूप महत्वाची आहे संस्कार आणि माणुसकीला खूपच महत्त्व आहे म्हणून या देशात मानवता टिकून आहे तेव्हा मतभेद विसरून किंवा आपण विरुद्ध पक्षाचे आहोत हा विचार त्यावेळी मनात आला नसावा म्हणून देवेंद्रफडणवीस  आधारासाठी पवार साहेबांच्या शेजारी उभे राहिले.त्यावेळी फडणवीसानी पद प्रतिष्ठेचा विचार केला नाही.किवा जातीचा विचार केला नाही.एक माणूस म्हणून ते तिथे थांबले होते.
शिवाय आपण एका पक्षाचे मोठे राजकीय नेते आहोत आणि आपल्या कडे अनेकांच लक्ष आहे, कोण काय म्हणेल, त्या घटनेच थेट प्रसारण सुरू आहे, याचा विचार न करता बापाच्या पायात बुट घालणारी एक संस्कारी मुलगी फक्त याच देशात जन्माला येते
बाप शेवटी बाप असतो मग तो राजकीय पदावर असो नाहीतर सर्वसाधारण.ईथे माणुसकी सर्वात उच्चकोटीची ठरते.आणि माणसाची व धर्माची ओळख ही माणुसकी मुळेच होते.शिवाय जातीला संस्काराची झालर असेल तरच त्या जातीला काहीतरी दर्जा मिळतो.अन्यथा कोणीही त्यावेळी घडलेल्या प्रसंगी कोणत्याही जातिधर्माचा व्यक्ती उपस्थीत राहून तो जे काही करत असेल त्यावेळेस त्या घटेनेवर प्रसंगावर टिकाटिप्पणी करून मनात नकोते प्रश्न निर्माण करून मन दुखवत असेल जातीधर्माच्या मर्मावर बोट ठेवून माणसामध्ये दरी  घालत असेल तर तिथे संस्कारच नाहीतर माणुसकी सुध्दा ऱ्हात नाही.कसलचं राजकारण न करता जातपात धर्म माणुसकी टिकवायची असेलतर माणसाने माणसाशी अपलेपणाने वागलं पाहीजे मग तो राजकीय नेता असो, उच्चभ्रू उद्योगपती असो,सेलेब्रिटी असो नाहीतर सर्वसामान्य असो त्याने सर्वकाही विसरून माणूस म्हणूनच वागल पाहिजे.
उच्च निच्च,वरीष्ठ कनिष्ठ आपण खुप मोठे आहोत अस मनात न ठेवता पद प्रतिष्ठा जात बाजुला ठेवून प्रत्येक जाती धर्माचे हात एकमेकांच्या हातात घेवून या देशाचा सांभाळ केला आणि एक माणूस म्हणून वागलात राहिला तरच 
 सारे जहासे अच्छा हिंन्दोस्थ हमारा म्हणण्यात अर्थ आहे.
संजय धनगव्हाळ
धुळे
९४२२८९२६१८





टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾थोडं मनातलं :- नवरा बायको मधील प्रेमल संवाद| Marathi Audiobook | audio story

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

फक्त व्यक्त व्हायला शिका...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण