ते निघून गेल्या आणि मी चक्करावून गेलो.
काल संध्याकाळी म्हणजेच 7:30च्या सुमारास एक इनोव्हा गाडी लिफ्ट लॉबीच्या समोर येऊन उभा टाकली प्रथमता त्या गाडीला नजर अंदाज केला. माझ्या पॉईंट वर तोमर नावाचा मध्यप्रदेश येथील गार्डला बसवलं आणि मी ठेथुन मोबाईल चार्जिंग साठी निघालो. तिकडून आल्यावर त्या गार्डने मला सांगितलं कि " भाई ओ जो सफेद बडावाला गाडी लगा हैं, ओ रॉंग पार्किंग मै लगा हैं " तरी मी त्या गाडी कडे नजर अंदाज केला. 10 ते 15 मिनटं झाल्यावर 60 वर्षाच्या आसपास एक बाई बोली "आपको किसीने कुछ बोलतो नही." मी म्हणालो "किस लिये " त्या म्हणाल्या "ओ जो सफेद वाला गाडी हैं ना उसके लिये "मी त्यांच्या बोलण्यावरून ओळखून घेतलं. कि, ह्या बाई महाराष्ट्रीयन आहेत. " मी बोलो अँटी कोणी काही बोल नाही. आमचं बोलण चालूच होत. तेवढ्यात ती गाडी निघाली. आणि माझ्या नजरे समोर आलं ते तिची नंबर प्लेट त्यावंच MH -26 पाहून मी म्हणालो. "अँटी ही तर गाडी आमच्या येथील आहे. त्यावर त्यांनी बोल्या " हो ' माझ्या मुलगा कलेक्टर विपीन इटनकरआहे. नांदेडला " हे ऐकून माझ्या काळजाचे ठोके वाढले. आणि भुया वर झाल्या आणि एकच वाक्य बोलो." काय! त्या म्हणाला 'तू मला सकाळी भेट मी आत्ताच आले. नांदेडवरून दमले आहे. आणि...
ते निघून गेल्या मी चक्करावून गेलो. कि सर्व साधारण दिसणारी बाई कुठून पण वाटत. नाही कि ज्याच्या हातात 16 तालुके, पोलिसाचा लवजमा घेऊन फिरणाऱ्या साहेबां ची आई एवढी कशी साधारण असू शकते. खुडचीवर बसल्या जागी मी विचार करत होतो. कि त्यांना बोलण्याच्या वेळी सुरुवात कुठून करायची. या विचारत व मनात एक आनंद घेऊन मी घराकडे निघालो. जेवण केल आणि लगेच झोपी गेलो. पण भेटण्याच्या आतुरतेने सकाळी 5 वाजताच जाग आली. लवकर कधी वेळ होईल. कामावर जाण्याची हे वाट पाहत होतो. कसबासा वेळ गेला आणि थेट आपली पोटली उचली आणि कामावर आलो. पण त्यांनी वेळ दिला होता. 12 ते 1 च्या दरम्यान गेट वर 8 ते 12 पर्यंत काम केल. आणि मी 12 वाजता गेट सोडून त्याच्या घराची वाट धरली. शानयांनात बसलो. अंक दाबला 5 व वर गेलो. काही वेळात शयनयान बंद झालं आणि दरवाजा उघडला. दोन पावलावर त्यांच्या घराचा दरवाजावर जाऊन संकेत यंत्रावर बोट ठेवलं पण ते बिघाड झालेल. समजलं आणि मी दरवाजा थोटावंला आणि जसा दरवाजा उघडला मला ते. बाई हातात हनुमान चालीसा घेऊन दिसली आणि त्या बोल्या " अरे! तू आलास. मी म्हणालो ' तुम्ही पूजा करताय काय. त्या म्हणाल्या " हो " मग मी म्हणालो 'मी 'नंतर येतो. त्या नी माझ्या मोबाईल नंबर मागितला आणि तुझं आडनाव सांग म्हंटल. मी म्हणलो " बसवंते " असं सांगून त्या म्हणाल्या " मी तुला फोन लावून भेटायला येते. मी ठीक आहे म्हणून निघून आलो.सायंकाळीच्या 5 : 30 वाजण्या च्या दरम्यान माझ्या मोबाईल वर ओंनोन नंबर आला आणि मी ओळखल आणि मोबाईल घेऊन रेंज च्या दिशेने पळत गेलो. पलीकडून आवाज आला " ह " पदमाकर मी चाहा मांडलाय लवकर ये मी म्हणालो. "हो " आलोच.. गडबड केली. आणि माझ्या पोटली कडे वळलो आणि त्यातून शर्ट काढला बटन चालत चालत लावण्यास सुरुवात केली. एका हातात आपल्याला डोक्यावरची टोपी आणि शर्टचे बटन लावण्यास सुरवात केली. तेवढ्यात आमच्या सोसायटीचे मॅनेजर दिसलें मी आपले बटन चाचपत चाचापत त्यांच्या थोडं दुरून जाण्याचा पर्यंत करत होतो तेवढयात त्यांनी मला पाहिलं आणि ते बोले का? हो, कुठे चालात " मी मानात खूश पण चेहरा उतरल्या सारखा करून म्हणालो. "सर आमच्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब त्यांच्या आईने मला चाह पिण्यासाठी त्यांच्या घरी बिलावलंय "हे सरळ आणि खरं उत्तर देऊन मी साहेबाना बोलून दाखवलो त्यावर ते म्हणाले. " हो " बरोबर आहे पण शर्ट असा मळकट घालून चालात . " मी मी बोलो साहेब या कामावर आलं तेव्हा पासून सेक्युरिटीचा ड्रेस आहे. इतर ड्रेस घालायला वेळच नाही." असं म्हणत म्हणत मी आपले पावलं त्या 501नंबर च्या घरा कडे निघाले..... आणि त्याच्या घरी गेली त्यांनी आपुलकीने सोफ्यावर बसण्यास सांगितले. आपल्याला हातातील टोपी पाठी मागे घेत मी सोफ्यावर बसलो. त्यांनी आपल्या मुलीला आणि जावई यांना बोलावून घेतलं आणि माझ्या बदल रात्री काय काय घडलं ते सांगिले म्हणजेच त्यांच्या गाडी बदल चाहा आलं त्या सोबत चिवडा आणि बिस्कीट पण होते.दबक्या आवाजात मी म्हणलो "अँटी मी फक्त एकदा जेवण करतो त्या नंतर काही खात नाही" त्यावर त्या बोल्या कि चाहा पी आणि ते सोबत घेऊन जा. असं म्हणत म्हणत चहा पिण्यास सुरवात केली. आणि नांदेड जिल्ह्यात कुठे कुठे गेलो ते सांगत होत्या आणि मला पटकन विचारल्या तू कुठे राहतो. मी म्हणालो "कंधार ला "त्यावर म्हणाल्या" हो" तिथे किल्ला आहे ना! मी म्हणालो हो " मी तर किल्ला पहिलाच नाही सर्व बघितलं पण ते राहील मी म्हणालो परत या तेवढ्यात बोल्या त्यांची बदली होईल आता.. मग काय.. बराच वेळ गप्पा गोष्टी केल्या आणि माझ्या डोक्यात आलं कि आपण तर कामावर आहोत तसच आणि आई वडिलांनी शिकवलेली शिकवण त्यांच्या पाया पडलो आणि आपल्या कामावर निघून गेलो.....
सांगण्याच एकच तात्पर्य कि कोण कुठे आणि केव्हा भेटेल याचा काही नेम नाही.. तेच जर त्यांना घरी भेटायचं म्हंटल तर वेळ घ्यावा लागत होता..
- पद्माकर बसवंते
🙏धन्यवाद 🙏
__________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा