पोस्ट्स

विशेष लेख लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मोठ्या मनाचा छोटा सेल्समन

मोठ्या मनाचा छोटा सेल्समन भोसरीवरून घरी परतत होतो. दुपारपासून कस्टमरच्या कंपनीत ‘पेमेंट टर्म्स’वरून डोकं उठलं होतं. ऑर्डर हातात पडल्यात जमा होती, तोच एक आनंद होता........ ‘मॉर्डन कॅफे’च्या चौकात सिग्नलला थांबलेलो असताना एक लहानसा पोरगा गाडीजवळ आला. मी स्वतः भीक द्यायच्या विरुद्ध आहे. भिकाऱ्यांना कधीच पैसे नाही देत. पण त्या मुलाच्या हातात विकायला पुस्तकं दिसली. अशा गोष्टी या मुलांकडून घ्यायची संधी मात्र मी कधीच सोडत नाही. त्या मुलाला हात दाखवून गाडी बाजूला घेतली. मुलगा आला, ६० रुपयाला ४ पुस्तकं घ्या म्हणाला. सहज पुस्तकं बघितली तर लहान मुलांची स्केचबुक होती. बरी वाटली. नुकताच जोराचा पाऊस येऊन गेल्यामुळे आणि रात्री नऊची वेळ झाल्यामुळे रस्त्यावर पण अगदीच तुरळक गर्दी होती. पोरगा वयाने असेल ११-१२ वर्षांचा, पण पक्का सेल्समन होता. शेवटची थोडीच शिल्लक आहेत, घेऊन टाका. स्वस्तात देतो म्हणाला. मला नाही आवडत कधीच बार्गेनिंग करायला आणि मुलांच्या बरोबर तर नाहीच. पण एक विचार करून त्याला म्हणालो मी १० सेट घेतो.  कितीला देणार ?  क्षणभर विचार करून शंभरला देतो म्हणाला.  त्याला विचारलं किती दिवस पुस्तकं वि

स्माईल प्लीज

"स्माईल प्लीज" पहिला वाढदिवस... एकट्याने साजरा होणारा पहिला. एकुलता एक मुलगा. त्याच्यासाठी मुली बघणं चालू होतं... एक दिवस कोरोनाने खाऊन टाकला त्याला. दे धक्का. त्या धक्क्यानं बायकोही गेली. बाकी शून्य. रिटायर्डपण आलेलं. जवळचं म्हणावं असं मैत्रही जुळलं नाही कधी. प्रत्येक दिवस अंगावर यायचा. आला दिवस ढकलायचा झालं. कुठनं तरी डबा यायचा. एकवेळचा डबा दोन्ही वेळेला पुरवून ऊरायचा. पल पल आठवणी चघळायच्या फक्त. माझ्याच नशिबी का ? भयानक चिडचीड व्हायची. चिडणार कुणावर ? कुणावरही. कुणीही चालून जायचं. पेपरवाला, दूधवाला, ईस्त्रीवाला,डबेवाला,वाॅचमन. सगळ्यांना सवय झालीय. जगाशी भांडण. कपाळावर सदैव आठ्यांची जळमटं विणलेली. चिरका खडूस वसकल्यासारखा आवाज. आणि म्हणे यांचं आडणाव जवळकर. मला सांगा , कोण जवळ करणार म्हातार्याला ? आज सकाळी बँकेतून फोन आलेला. केवायसी अपडेट करा म्हणे. फोनवर भांडण. तणतणत झेराॅक्सवाला गाठला. आधारकार्ड, पॅनकार्डची झेराॅक्स बँकेत नेऊन दिली. खरं दुःख वेगळंच होतं. फार एकेकटं वाटत होतं. म्हातार्याचा वाढदिवस कुणाच्याही लक्षात नसावा ? संध्याकाळ होत आली. कुणीही विश केलं नव्हतं म्हातार्या

टागोरांचे भावविश्व संपन्न करणाऱ्या दोन स्त्रिया

टागोरांचे भावविश्व संपन्न करणाऱ्या दोन स्त्रिया  रवींद्रनाथ टागोर म्हटले की समोर येते ती पांढरी शुभ्र दाढी असलेली भव्य चेहऱ्याची व्यक्ती. त्यांनी लिहिलेले ' जनगणमन 'आठवते. टागोर म्हटले की त्यांच्या ' गीतांजलीला ' मिळालेला नोबेल पुरस्कार आठवतो. टागोर म्हटले की त्यांचे शांतिनिकेतन आठवते.टागोर हे महान गीतकार आणि संगीतकार.  त्यांनी इंग्रज सरकारला'सर 'ही पदवी परत केल्याचे आठवते. आणि आठवतात अशाच साऱ्या अनेक गोष्टी. बंगाली माणसाच्या घराघरात आणि मनात मानाचे स्थान असलेले हे व्यक्तिमत्व. पण त्यांच्या तरुणपणातील एक अधुरी प्रेमकहाणी आपल्याला फारशी माहिती नसते. आणि तिचा संबंध आपल्या महाराष्ट्राशी आणि मराठी मुलीशी आहे. आत्माराम पांडुरंग तर्खडकर किंवा तर्खड  हे त्या काळातील मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर आणि समाजसुधारक. त्यांच्यावर बंगालमधील केशवचंद्र सेन यांचा प्रभाव होता. त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन तर्खडकरांनी मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली. या स्थापनेच्या वेळी त्यांचा उद्देश होता, तो म्हणजे समाजातील जातीभेद दूर करणे, मुलींना शिक्षणासाठी उत्तेजन देणे, बालविवाह रोखणे आण

फक्त प्रेम करा !

*फक्त प्रेम करा !* सख्खा भाऊ , सख्खी बहीण , सख्खी मैत्रीण सख्खे काका , सख्खी काकू , सख्खी मावशी  नेमकं काय असतं हे " सख्ख प्रकरण ? "  सख्खा म्हणजे आपला  सख्खा म्हणजे सखा सखा म्हणजे जवळचा जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही , केंव्हाही , काहीही सांगू शकतो  त्याला आपलं म्हणावं , त्याला सख्ख म्हणावं ! ज्याच्या जवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो   मोठ्ठ्याने हसू शकतो किंवा  काळजातलं दुःख सांगून स्फुंदु स्फुंदु रडूही शकतो त्याला सख्ख म्हणावं , त्याला आपलं म्हणावं ! ज्याच्याकडे गेल्यानंतर  आपलं स्वागत होणारच असतं  आपल्याला पाहून त्याला हसू येणारच असतं अपमानाची तर गोष्टच नसते  फोन करून का आला नाहीस अशी तक्रारही नसते ! पंढरपूरला गेल्यावर  विठ्ठल म्हणतो का ..... या या फार बरं झालं ! माहूर वरून रेणुका मातेचा  किंवा कोल्हापूर वरून महालक्ष्मीचा किंवा तिरुपतीहून गिरी बालाजीचा आपल्याला काही Whatsapp call आलेला असतो का ? या म्हणून ! मग आपण का जातो ? कारण भक्ती असते , शक्ती मिळते आणि संकट मुक्तीची आशा वाटते ....म्हणून ! हा ही एक प्रकारचा *" आपलेपणाच !"* लौकिक अर्थाने , वस्तूच्या स्वरूपा

देणार्याने_देत_जावे ...या कवितेत विंदा म्हणतात शेवटी ... Olympics storys

#देणार्याने_देत_जावे ...या कवितेत विंदा म्हणतात शेवटी ...                                         #देणार्याचे_हात_घ्यावेत. या ओळीचा नक्की अर्थ काय आहे हे मला आता या क्षणापर्यंत समजलं नव्हतं ते आत्ता उमगलं ही बातमी वाचताना.         हल्ली असं म्हटलं जातं की जगात लोकांची संकुचित वृत्ती वाढत चाललीय. जो तो फक्त मी आणि माझं या पलिकड फारसं जायला तयार नाही. कोणी कोणाला फारसं मदत करायच्या भानगडीत पडत नाही.  मात्र ही अशी  काही उदाहरणं ही आपल्याला कायमस्वरूपी आदर्श घालुन देतात. विचार करायला भाग पाडतात.  कालचीच गोष्ट. #टोकियो_ऑलिंपिक्स मधे भाला फेकीत महिलांमधे रौप्य पदक मिळवणारी  पोलंडची #मारिया_आंद्रेज्क (Maria Andrejczyk) हिची ही कहाणी.    २०१६ साली पदक हुकलेली ही पोलंडची ॲथलिट. २०१९ साली एका मोठ्या शस्रक्रियेतुन बाहेर पडली आणि २०२१ ला रौप्य पदक मिळवलं जिद्दीनं.    मात्र तिच्या नजरेत एक बातमी आली. पोलंड मधीलच एका आठ महिन्याच्या  Miłoszek Małysa या मुलावर  तातडीनं हृदय शस्रक्रिया अमेरिकेत करण्यासाठी मदत निधि गोळा केला जात होता.     या मुलासाठी लागणाऱ्या रकमेपैकी निम्मी रक्कम उभी राहिली होती. उर्व

ओंजळभर नाणी

'ओंजळभर नाणी- '                  लेखिका- सौ राधिका  ( माजगावकर )पंडीत         भल्या मोठ्या जनरल स्टोअर्स चे मालक दादासाहेब आचार्य माझ्या चांगल्याच परिचयाचे झालेले होते. मला बघितल्यावर हिशोबाची वही बाजूला सारत ते म्हणाले, "अलभ्य लाभ, वहिनी बरं झालं तुम्ही आलात ते. मी तुमची वाटच बघत होतो. तुम्हाला एक गमतीशीर किस्सा सांगायचा आहे." असं म्हणून त्यांनी सांगायला सुरवात केली.....               काल तीन मुले दुकानात आली. अगदी लहान वयाची, बावरलेली, काहीशी बिथरलेली ती मुलं आत येऊन दुकानातील वस्तू शोधक नजरेने, कुतूहलाने बघत होती. दोन भाऊ व बहीण असावेत ते.         वस्तू बघत असता "अरे, ही नको ती घेऊ या"असे संवाद त्यांच्यात चालले होते. दुकानात गर्दी नसल्याने मी लांबूनच त्यांची होणारी गडबड, गोंधळ, बोलणं ऐकत होतो.  नोकरांनी त्यांना अनेक वस्तू दाखवल्या, मात्र तिघात एकमत होत नव्हतं.         सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ तिघांची शोध मोहीम चालू होती. अचानक तिघांची नजर एकाच वेळी विणाधारी सरस्वतीच्या आकर्षक मुर्ती कडे गेली. तिच्याकडे बोट दाखवून तिघेही एकाच वेळी एकाच आवाजात गरजले,

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

इमेज
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम .  ..  .  या पुस्तकात माझ्या जिवनात घडलेल्या घटना मी कोण होतो या  साठी लिहित नाही तर जीवन काय असते हे सांगण्यासाठी मी हे  पुस्तक लिहित आहे - wings of fire ...  टिप :- खालील Audio book संपूर्ण ऐका आणि आवडले तर इतरांना पण  पाठवा __________________________________________ .

पर्यावरण वाचवण्यासाठी उपाय | Marathi Audio book | audio story

इमेज
पर्यावरण वाचवण्यासाठी उपाय           वाहनांचे वाढते प्रदूषण हा आपल्या वातावरणाला खूप मोठा धोका आहे. सध्याच्या आधुनिक युगात आपण आजूबाजूला पाहतो की वाहनांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे जे काही  प्रदूषण होते ते कमी करायचे असेल तर ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर लोकांनी जास्त प्रमाणात केला पाहिजे असे माझे अत्यंत स्पष्ट मत आहे. सध्या बॅटरीवर चालणारी वाहने बाजारात येत आहेत त्यांचाही वापर मोठ्या प्रमाणात झाला तर वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या   धुराचे प्रमाण कमी होईल, वातावरण स्वच्छ व शुद्ध होण्यास नक्कीच मदत होईल..           आपणास जर भाजीपाला, फळे, दूध, किराणामाल इत्यादी खरेदी करण्यासाठी जावयाचे असेल व अंतर कमी असेल तर आपण वाहना ऐवजी सायकलचा वापर केला पाहिजे. सर्वांनी आपल्या दैनंदिन कामकाजासाठी आठवड्यातून एक दिवस तरी वाहना ऐवजी सायकलचा वापर केला पाहिजे. गेल्या काही वर्षापासून मी याची स्वतःला सवय लावून घेतलेली आहे. याप्रमाणे आपण याचा आपल्या दैनंदिन जीवनात अंमल केला तर आपल्याला तीन प्रकारे फायदा मिळेल.पहि

Exam worrier च्या यशाची कहाणी | Marathi Audio story | Marathi Audio book

इमेज
"किस्मत में लिखी हर मुश्किल टल जाती है...           यदि हो बुलंद हौसले तो मंजिल मिल ही जाती है... सिर उठा कर यदि आसमान को देखोगे बार बार...              तो गगन को छूने की प्रेरणा मिल ही जाती है"...! "सर परीक्षा झाली असतीनां मी 99% च मिळविले असते"...!!! ......जवेरीया महेबुबखाँ पठाण ( वर्ग 10 वी , आष्टी केंद्रातून सर्वप्रथम ) नमस्कार मित्रांनो ... सुप्रभात ...पाचेक वर्ष झाली असतील एकदा कामानिमित्त आष्टीत गेलो आणि बसस्टँड वरून पुढे निघतांना "ऐ मनोज यार ...! दोन मिनिटं ईकड ये...!!!" असा ओळखीचा आवाज आला...आमच्या तीनही भावांचा म्हणजे मी माझ्या पाठचा  डॉ. भोजराज , हेमंत यांचा कॉमन मित्र म्हणजे महेबूब पठाण याचा तो आवाज होता. जवळ गेलो पानटपरीवर गप्पांना सुरुवात झाली...महेबूब म्हणाला ," यार मनोज माझी मोठी मुलगी खुप अभ्यास करते , ती घरी सारखी अभ्यासच करत असते , आता तुच काय ते बघ ,  तुझ्याकडं क्लासला पाठवीतो ...आता तिच्या अभ्यासाची काय ती काळजी तुच घ्यायची ...आज पासुन ती आता तुझी मुलगी...!!! मी म्हणालो ," ठिक आहे पाठव...!!!         दुसऱ्या दि

◾विशेष लेख आणि गाणी :- वटपौर्णिमा | जगदीश खेबूडकर

इमेज
🌻 आनंदी पहाट 🌻                          वटपौर्णिमेची                       🌹🥀🌿🌸🌳🌸🌿🥀🌹          प्राणवायू.. हा सध्याच्या काळात जगभर चर्चा होणारा विषय. पण भारतीय संस्कृतीने हे प्राणवायूचे महत्त्व केव्हाच ओळखले होते, म्हणूनच सण कोणताही असो आम्ही निसर्गाशी मैत्री करतो.         जगदगुरु संत तुकाराम म्हणूनच वृक्षवेलींना सोयरे मानतात. निसर्ग संरक्षण, संवर्धन.. संगोपनासाठी श्रद्धेचे कथाभाग जोडून हे निसर्ग पूजनाचे संस्कार रुजविले गेलेत.         वड तर औषधी वृक्ष. याची साल.. पाने.. फळेच काय पण समिधाही जीवनाला उपकारक. वड हा मोफत प्राणवायूचा खजिनाच. शेकडो वर्षाचा सेवाव्रती. आजही विस्तिर्ण डेरेदार वृक्षाच्या सानिध्यात पिढ्यानपीढ्या सुखेनैव जगताहेत.         स्त्रीच्या जीवनात पती हा तिच्या संसाराचा प्राण. यमराजाकडून पतीचे प्राण पुन्हा परत मिळवणारी ही भार्येची.. वटसावित्रीची पूजेची कथा. ही सावित्री वटवृक्षाप्रमाणेच आपल्या पतीला सत्यवानाला दीर्घायुष्य लाभण्याचे वरदान प्राप्त करते.         सावित्री ही बुद्धिमान.. आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी जंगलात राहणारी चतुर पतिव्रता होती. प्रत्यक्ष यमाच

◾विशेष लेख :- आई

इमेज
एकेकाळी मला जगरहाटी समजावून सांगणारी माझी आई अचानक वृद्ध होते ! रस्ता ओलांडतांना माझा लहानगा हात घट्ट पकडून ठेवणारी आई आजही माझा हात तस्साच घट्ट पकडते,  कारण बदललेल्या जगाच्या झगमगाटाने, गोंगाटाने ती बावचळून गेलेली असते ! पेन्शनच्या बुकात सही करायला मी आईला बँकेत घेऊन जातो, इथे इथे सही कर म्हणून सांगतो.... आई फक्त माझ्या डोळ्यात विश्वासाने बघते अन खुणेवर सही करते........ कधीकाळी मी सुद्धा अस्साच विश्वास टाकलेला असतो तिच्यावर लहान असतांना ! आईच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होते, मी तिला हाताने घास भरवतो...... तेंव्हा मला आठवतात तिचे चिऊ-काऊचे घास अन.. मौंजीच्या दिवशी आम्ही केलेले अखेरचे एकत्र भोजनही...... !! ज्यांच्याबरोबर अल्लड वयात अनोळखी जगात पाउल ठेवले, ज्यांच्या भोवती आयुष्याचे भावनाविश्व विणले,त्या माझ्या वडिलांच्या पश्चात माझी आई असते आंतून एकटी, देवघरातल्या नंदादीपाच्या जोडवातीकडे कोरड्या नजरेने एकटक बघणारी.... कधीकाळी झालेल्या चुकांसाठी शिक्षा म्हणून पाया पडायला लावलेला मी आपणहून आईला वाकून नमस्कार करतो मला भासतात वडिलांची पदकमले... ते सुद्धा सुखावलेले असतात अंतःकरणातून,

◾विशेष लेख :- भारतीय गांवांचा वेगळेपणा ...

इमेज
भारतीय गांवांचा वेगळेपणा ...... १)• शनिशिंगणापूर (महाराष्ट्र)     संपूर्ण गांवात, एकाही घराला कडी-कोयंडा नाही.     गांवात पोलीस चौकी,पोलीस ठाणे नाही.     गांवात चो-या नाहीत. २)• शेटफळ (महाराष्ट्र)     प्रत्येक ग्रामस्थाच्या घरात, कुटुंबाचा सदस्य      असल्यासारखी सर्पराजाची उपस्थिती. ३)• हिवरे बाजार (महाराष्ट्र)     भारतातील सर्वात "श्रीमंत" खेडे.      ६० अब्जाधीश घरे. एकही "गरीब" नाही.     सर्वाधिक GDP असणारं खेडं. ४)• पनसरी (गुजरात)     भारतातील सर्वात "अत्याधुनिक" खेडेगांव.     गावातील सर्व घरात CCTV जोडण्या असून,     Wi-Fi सुविधाही आहेत.     गांवातील सर्व 'पथदीप' सौरउर्जेवर चालतात. ५)• जंबुर (गुजरात)     भारतीय वंशाचे असूनही, सर्व नागरिक     "आफ्रिकन" वाटतात.     [परिसरात आफ्रिकन गांव अशीच ओळख] ६)• कुलधारा (राजस्थान)     "अनिवासी" गांव. गांवात कोणीही रहात नाही.      घरे बेवारस सोडलेली आहेत. ७)• कोडिन्ही (केरळ)      जुळ्यांचे गांव. जवळपास प्रत्येक घरात जुळं. ८)• मत्तूर (कर्नाटक)     दैनंदिन व्यवहारासह सगळ्याच कामकाजासाठी     &

◾विशेष लेख :- टर्निंग पॅाईंट..

इमेज
‘टर्निंग पॅाईंट..!’             १० वर्षापूर्वी नुकत्याच लागलेल्या नवीन नोकरीवरून घरी परत येताना तो भयानक ॲक्सीडेंट झाला.डॉक्टरांनी दोन्ही हात कोपरापासून काढण्याशिवाय पर्यायच नाही हे सांगितले.फार मोठा धक्का होता तो घरच्यांसाठी. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ही घटना घडल्याने भविष्याचा विचार केला की फक्त अंधार दिसायचा. किती मेहनतीने,हुशारीने प्रतिष्ठीत आय आय टी मधे कॉम्प्युटर इंजिनीरिंग मिळवून मी सर्वोत्तम संस्थेत शिरलो होतो.खूप सारी स्वप्न घेऊन! ही घटना माझं पूर्ण आयुष्यं हादरवून टाकणारी होती. अनेक शस्रक्रियांनंतर शेवटी दोन्ही हात कृत्रिम बसवायचा सल्ला दिला डॉक्टरांनी.. घरात एकच भयाण वातावरण पसरलं होतं पण दुसरा पर्यायच नसल्याने कृत्रिम हात रोपण शस्त्रक्रीया करावीच लागली. रोज स्वत:चे असे हात बघून आयुष्यं खरंच जगायचं का ?हाच विचार मनात येऊन जायचा.  मनातून  तर जवळ जवळ संपलो होतो मी.दोन महिने झाले आणि त्या सततच्या परावलंबित्वाची, त्या सहानभूती भरलेल्या नजरांची  अक्षरशः किळस यायला लागली होती. अनेक मित्र,नातेवाईक समजवायला यायचे.आयुष्यं असं थांबवून चालत नाही जगावंच लागतं वगैरे सगळं. दुसऱ्याला सा

◾विशेष लेख :- प्रवास... आयुष्याचा

इमेज
आयुष्याच्या वळणावर अशी कही माणसे भेटतात, जी आपल्याला जगायचं कसं हे शिकवून जातात. मग शिकवणारे फक्त शिक्षक नसतात. तर आयुष्य जगताना जे अनुभव येतात, ते शिक्षणापेक्षा जास्त मौल्यवान असतात. आज इस्लामपुरला चाललेलो, काही कामा निमित्त. एक वृद्ध, वयस्कर आजोबांनी हात केला, खुप थकलेला चेहरा होता. मी गाड़ी थांबवली, तर आजोबांनी विचारलं साखर कारखान्यावर सोडनार का? मी हो बोललो. आणि त्यांना गाड़ीवर निट बसता येईल का, याची खात्री केली. ते हो बोलले, आणि एक अनुभवी प्रवास आमचा सुरु झाला. मी सहज विचारलं, "आजोबा राहता कुठे?" तर आजोबानी सांगितलं पैसे नाहीत म्हणून असं हात करून जातो मी. कदाचित त्यांना मी विचारलेला प्रश्न निट ऐकता आला नसावा. मी पुन्हा विचारलं, "आजोबा राहता कुठे?" उत्तर आलं, येडे गावात. मग ना राहून विचारलं, कुठे जाताय तुम्ही? तर साखर कारखान्यावर एका माणसाला भेटायला. मग आजोबाना विचारलं, त्यांची ती अवस्था बघून, की तुम्ही जे बोलला पैसे नाहीत. तर आजोबा तुम्हाला मूल नाहीत का? आजोबा बोलले "दोन बोकड आहेत."  मला नाही समजलं. मी पुन्हा विचारलं, "तुम्हाला मूलं नाहीत का?"

◾विशेष लेख :- सोबत

इमेज
आजकाल कुणाशीही बोलावंसं वाटत नाही. खूप कंटाळा येतो. सगळीकडे मुखवटे चढवलेले चेहेरे. ज्याची पाठ फिरेल, त्याची निंदा करणारे. ह्यांची मानसिकता इतकी स्वस्त असते ना.... की नको वाटतं....! इतकं खोटं कसं काय ते वागू शकतात ?  ह्यात "आपले लोक" पण असतात हे विशेष! ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला ऍडजस्टमेंट केलेली असते, ते देखील एका "नकाराने" बदललेले बघितले आणि वाटलं, 'आपण एकटे असतो तेच बरं असतं.' ह्यांच्यापेक्षा पुस्तकांमध्ये आणि छंदांमध्ये रमावं, मन प्रसन्न रहातं, आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर जाता... कधीतरी अशी वेळ येते की, तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो. त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते. प्रत्येकाचे मूडस् संभाळणं, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं, ह्या सगळ्यात आपण पार दमून जातो, सतत दुसऱ्याच्या गरजांचा विचार करताना "स्वतःला काय हवं आहे?" हा प्रश्न कधी मागे राहतो हे कळतच नाही. आणि इतकं सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, नात्यात हवा असलेला आदर, विश्वास, आपुलकी मिळते असंही नाही. मग अशा वेळी प्रश्न पडतो  "हे सगळं

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट