माणुसकी ... Manuski | New Marathi Poem | संतराम नाना पाटिल
कविता : माणूसकी बोल माणसा खडे बोल मी बोलतोय मनी एक काळ आसा होता मला विचारत नव्हतं कुणी ... मोल होत वस्तुला देवान घेवानही वस्तुची जगण्यासाठी त्या काळी नव्हती गरज पैशाची .... सोनं चांदी विकायची आणा गीनी रूपायात काठीला सोने बांधून लोक फिरायचे गावात... गावालाही गावपण होते चावडीत लोक बसायचे सर्व मान्य तोडगा काढून न्याय निवाडा करायचे .... सारे गाव सरपंच पाटील नाममात्र एकजण अन्याय नसे कोणावरच जोडले जायचे सगळेजन .... निवडणूक नसली तरी गावगाडा एकाने हाकायचा क्षणिक सुखासाठी कोण गावच नाही विकायचा.... परस्परांच्या प्रेमावरती ठरायची तेंव्हा माणुसकी नाती गोती जपायची म्हणजे वाढायची लायकी .... सोने चांदी पैसा नव्हता