पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मोहम्मद रफी यांची संपूर्ण मराठी गाणी | All marathi song's off mohammad rafi

इमेज
प्रभु तू दयाळू कृपावंत दाता  दया मागतो रे तुझी मी अनंता जगविण्यास देहा दिली एक रोटी  नमस्कार माझे तुला कोटी कोटी  वासना कशाची नसे अन्य चित्ता तुझ्या पावलांशी लाभता निवारा  निघे शीण सारा मिळे प्रेमधारा  सर्व नष्ट होती मनांतील खंता ज्ञान काय ठावे मला पामराला  मनी शुद्ध माझ्या असे भाव भोळा  तुझे नाम ओठी नको वेदगीता ________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

Exam worrier च्या यशाची कहाणी | Marathi Audio story | Marathi Audio book

इमेज
"किस्मत में लिखी हर मुश्किल टल जाती है...           यदि हो बुलंद हौसले तो मंजिल मिल ही जाती है... सिर उठा कर यदि आसमान को देखोगे बार बार...              तो गगन को छूने की प्रेरणा मिल ही जाती है"...! "सर परीक्षा झाली असतीनां मी 99% च मिळविले असते"...!!! ......जवेरीया महेबुबखाँ पठाण ( वर्ग 10 वी , आष्टी केंद्रातून सर्वप्रथम ) नमस्कार मित्रांनो ... सुप्रभात ...पाचेक वर्ष झाली असतील एकदा कामानिमित्त आष्टीत गेलो आणि बसस्टँड वरून पुढे निघतांना "ऐ मनोज यार ...! दोन मिनिटं ईकड ये...!!!" असा ओळखीचा आवाज आला...आमच्या तीनही भावांचा म्हणजे मी माझ्या पाठचा  डॉ. भोजराज , हेमंत यांचा कॉमन मित्र म्हणजे महेबूब पठाण याचा तो आवाज होता. जवळ गेलो पानटपरीवर गप्पांना सुरुवात झाली...महेबूब म्हणाला ," यार मनोज माझी मोठी मुलगी खुप अभ्यास करते , ती घरी सारखी अभ्यासच करत असते , आता तुच काय ते बघ ,  तुझ्याकडं क्लासला पाठवीतो ...आता तिच्या अभ्यासाची काय ती काळजी तुच घ्यायची ...आज पासुन ती आता तुझी मुलगी...!!! मी म्हणालो ," ठिक आहे पाठव...!!!         दुसऱ्या दि

◾कविता :- विस्कटलेले आयुष्य | संजय धनगव्हाळ

इमेज
विस्कटलेले आयुष्य ****************** जगायच होतं तिला कोरकरकरीत आयुष्य तिच्या राजकुमारासाठी नी् नवरी होवून तिला नव्या घरचा उबंरठा ओलांडायचा होता पण या माणसांच्या गर्दीत विटाळलेल्या नजरांनी तिच्यावर घाव घातला आणि भातुकलीचा खेळ नको त्या उंबरठ्यावर आणून सोडला ती रडत होते ओरडत होते आक्रोश तिचा कोणीच  एकत नव्हते तिची वेदनाही कोणालाच कळत नव्हती आयुष्याचे लक्तरे होतांना ती रोज नव्याने पहात होती कुठे कसा मांडावा भातुकलीचा खेळ तिलाच कळत नव्हते विस्कटलेले आयुष्य ती रोज जगतं होते जगावं कि मरावं  प्रश्न तिच्यासाठी गंभीर होता त्या गुलाबी मंबईचा उंबरठाही तिला ओलांडता येत नव्हता जेव्हा जेव्हा ती  सुर सनईचे एकायची  तेव्हा झाकून घ्यायची देहावरचे शापित स्पर्श आणि घरावरून जाणारी  लग्नाची वरात ती दारात ऊभी राहून पहायची जणू तिला घ्यायला राजकुमार आलाय म्हणून एकसारख बघायची संजय धनगव्हाळ धुळे ९४२२८९२६१८ ________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-  सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾कविता :- ताई

इमेज
             'ताई'              ताई, आहे आईसम माझ्यावर तुझी सावली, आईची माया मी... तुझ्यात गं पाहिली, दुख:वर माझ्या... घातली तू नेहमीच फुंकर, झाली गं माझ्या वेदनेची कमी काहिली, आईची माया मी... तुझ्याच गं पाहिली, यश-अपयश माझं पचवायला तू शिकवलं, अश्रूंना माझ्या गं हसायला तू शिकवलं, किर्ती माझी तू, जगी अभिमानाने गायिली, आईची माया मी... तुझ्यात गं पाहिली, स्वप्नांचा माझ्या तू, नेहमीच केला आदर, तूझ्या अपेक्षांच्या क्षिजितांवर गाठले यशाचे शिखर, नवी स्वप्न भरारी ची मी गं पाहिली, आईची माया मी... तुझ्याच गं पाहिली, मंगेश शिवलाल बरई.                हिरावाडी, पंचवटी, नाशिक-४२२००३.                संपर्क-९२७१५३९२१६. ________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

कविता :- अशी माझी एकादशी अन् असा माझा उपवास

इमेज
"अशी माझी एकादशी            अन् असा माझा उपवास", चहासोबत सकाळच्या होती न्याहारी वेफरची मस्त, पाहता-पाहता केले मी, वेफरचे चार-पाच पुडके फस्त, फराळात दुपारच्या साबुदाणा वडा अन्  रताळ्याचा शिरा,  खाण्याच्या बाबतीत मी तर ठरलो मग कोहीनूर हिरा, तोंडात लाडू राजगिऱ्याचे अधुन-मधुन लागले वाजू , सोबतीला होतेच बदाम अन् काजू , त्यातल्या-त्यात टाईमपासासठी आले समोर खजुर, मग मी खाण्यासाठी ते, झालो जरा,  जास्तच अतुर, मेजवानीत रात्रीच्या, होती भगर अन् चटकदार आमटी, दिवसभराच्या उपवासानंतर, कशी घेऊ हो ? मी पोटाला चिमटी,  अशी माझी एकादशी अन् असा माझा उपवास, स़ोबत फराळाच्या पदार्थांचा राहतो 'आपुलकीचा सहवास,                मंगेश शिवलाल बरं ई.                 पंचवटी, नाशिक ४२२००३. _________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾कविता :- आली आली आषाढी वारी | aali aali ashadhi wari marathi poem | मंगेश शिवलाल बरई

इमेज
'आली आली आषाढी वारी' आनंदाची आषाढी वारी, चला चला  जाऊया पंढरी,       || घ् || फुले जेथे भक्तीचा मळा, विठु सावळा लावी लळा, चला चला जावू भिमातिरी, आली आली आषाढी वारी,                   || १ || लोहदंड क्षेत्री उभी पंढरी,  आवतरली  चंद्रभागेतिरी, पांडुरंग-रखुमाई उभे विटेवरी, आली आली आषाढी वारी,                    || २ || मातृ  पितृ सेवेत असतां दंग, जाहले प्रकट  पाहण्या पांडुरंग, पुंडलिक नामाच्या भक्ताच्या दारी,       आली आली आषाढी वारी,                    || ३ || धन्य धन्य तो विठु सावळा, भरतो आषाढी  भक्तीचा सोहळा, भक्तांना  त्यांच्या संकटी तारी, चला चला जाऊया  पंढरी,                          || ४||   मंगेश शिवलाल बरई.  हिरावाडी, पंचवटी, नाशिक -४२२००३. _________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

थोडं प्रेम स्वतः वरही... | Marathi Audio story | Audiobook

इमेज
पहिला फ्री मराठी ऑडिओ ब्लॉग ऐका आणि इतरांना पण शेअर करा | First Free Marathi Audio Blog आयुष्यात आलेला 'एखादा काळ' हा वाईट नसतोच, वाईट असते ती त्या काळातली आपली परिस्थिती, काळाशी दोन हात करतांना आपली सतत कमी पडत राहाणारी उर्जा, आपल्यातली मानसिक आंदोलने आणि त्या काळातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी आपली होत असणारी तडफड. ही तडफड जितकी जास्त होते , जगण्याची...जगण्यावर प्रेम करण्याची उर्जा तितकी जास्त वाढत जाते. दुःख माणसाला जिवंत राहाण्याची, आयुष्यावर नव्याने प्रेम करण्याची उर्मी देतं. द्यायला हवं... पण... जर आपलं स्वतःवरही प्रेम असलं तरच हे होऊ शकतं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थीपणा कधीच नसतो. ती भेट असते ...आपण स्वतःला दिलेली.  कुणीतरी येईल , आपल्याला आनंद देईल ही वाट बघत बसण्यापेक्षा आपण स्वतःच स्वतःला आनंद देणारे होऊ शकतोच पण बर्‍याचदा माणसे स्वतःवर प्रेम करण्यासाठीही इतरांची वाट पाहाण्यात आयुष्य घालवतात... प्रेम म्हणजे स्वतःपर्यंत पोहोचण्याचा प्रवास असतो. जगण्याचा प्रवास असतो. आयुष्याची ओढ असते आणि जिवंतपणाशी जुळलेली नाळ असते... ओसाड जागी पावसात दा

◾अभंग :- भेटी लागी जीवा लागलीसे आस

इमेज
🌻 *आनंदी पहाट* 🌻            *मनाचिये वारी पंढरीची*          *भक्ती मार्गाच्या वाटेवरची*               *श्रीक्षेत्र देहूनगरीतून आज तुकोबांच्या पालखीचे प्रतिनिधिक प्रस्थान.*           🛕          🚩👣🚩                 🚩👣🚩                                          🌹⚜️🚩🔆🙏🔆🚩⚜️🌹         *परमेश्वरी शक्तीवर ज्यांचा विश्वास आहे त्यांना हे नक्कीच पटते की केव्हा कसे वागावे याची सद्बुद्धी परमेश्वरच देतो.*         *यंदा विठुरायाची इच्छा अशी की तुम्ही माझ्या भेटीसाठी येण्याची गरज नाही. त्यासाठीचे कष्ट तुम्ही उपासनेत खर्च करावेत. मानस पूजेने तुम्ही माझे चिंतन करा.*         *मनाचे वैशिष्ट्य असे की तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करता, त्या गोष्टीचा जगभर प्रवास मन घडविते. जेव्हा हे मन विठ्ठलालापाशी स्थिरावते तेव्हाही याची अनुभुती प्राप्त होते.*         *चांगल्या आठवणी या मनात सदैव आनंद.. उत्साह.. चैतन्य निर्माण करतात. मग आज डोळ्या समोर यावा पंढरीला निघालेला तो देहू नगरीतला जगदगुरुंचा पालखी प्रस्थानाचा देखणा सोहळा. ते शिस्तीतले शुभ्र वेषातील टोपी घाललेले वारकरी. फुलांनी सुशोभित पालखी.. तुकोबांच्य

◾बोधकथा :- स्वप्न आणि सत्य

इमेज
एकदा स्व‍प्न‍ आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. भांडणाचा विषय होता... ’भविष्य  घडविण्याात सर्वाधिक सहभाग कोणाचा असतो’ दोघेही खूप भांडले, भरपूर वाद घातला पण निर्णय काही होईना.  शेवटी दोघेही आपल्या पित्याकडे गेले. पित्याला वादाचा विषय सांगितला. पिता म्हणाला,’’ज्याचे कोणाचे हात आभाळाला टेकतील पण तरीही पाय जमिनीवर असतील त्याचा भविष्य घडविण्यात निर्णायक सहभाग असतो.’’  दोघेही परत आले. सर्वप्रथम स्वप्नाने एकाच उडीत हात आभाळाला टेकवले, मात्र पाय जमिनीपासून केव्हाच उचलले गेले होते.  मग सत्याने प्रयत्न केला मात्र त्यााचे पाय कायम जमिनीवर टेकलेले होते पण हात आभाळाला पोहोचू शकले नाहीत. दोघांनीही खूप प्रयत्न केले पण दोघेही अयशस्वी‍ राहिले. शेवटी थकून ते पुन्हा एकदा पित्याकडे गेले तेव्हा पिता म्हणाला,’’ भविष्य घडविण्यासाठी सत्य आणि स्वप्न या दोघांचाही समान सहभाग असतो.’’ तात्पर्य ~ ख-या अर्थाने भविष्य घडवायचे असेल तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे राहायला हवे. ______________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-  सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾कादंबरी :- फकिरा

इमेज
फकिरा 👇 ____________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾कादंबरी :- ययाती

इमेज
वाचा __________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-  सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾कविता :- त्याग मूर्ती

इमेज
🌸 त्याग मूर्ती 🌸 शेअर करा झालेत खुप आता स्त्रीयांवर अत्याचार सदोदितच असे तीच्या डोळयाला धार...  कुठपर्यंत ती आता सारे सहन करील कोणा कोणाचे ती रोजच्या पाय धरील...  नेहमी नेहमी तिनेच का घ्यावा कमीपणा तिचेही मन आणि भावना जरा जाणा...  तिही असे एक माणुस वागा  जरा तिच्या परीनं जीवनाच तुमच्या सोनं ती करीनं...  वेळ प्रसंगी तिच्यातही अवतरते भवानी व्यर्थ तुमची मग वाया जाईल जवानी...  स्त्री आहे खरी एक त्याग मुर्ती वसुंधरा  तिच्या सवे आपण  प्रेमानेच संसार करा...  ********************** ✍️ - आत्माराम रामदास शेवाळे ''  शब्दस्नेही " वाघोली  ता.शेवगाव ************************* टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾जीवन मंत्र :- जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी | Marathi Audio story | Audiobook

इमेज
🌺  *जसे बोलण्यापेक्षा,* *शांत रहायला जास्त महत्व असते,* *तसेच सांगण्यापेक्षा,* *ऐकून घेण्यालाही जास्त महत्व असते.* *प्रमाणापेक्षा जास्त सुख,* *आणि प्रमाणापेक्षा जास्त दु:ख,* *कधीच कोणाजवळ व्यक्त करु नका,* *कारण...* *लोकं सुखांना नजर लावतात,* *आणि दु:खावर मीठ चोळतात.* *यशस्वी माणसे निर्णयाने जग बदलतात,* *आणि अयशस्वी माणसे जगाला घाबरून निर्णय बदलतात.* *स्वभाव हा हॉटस्पॉट सारखा असला की,* *कोणत्याही पासवर्ड ची गरज पडत नाही,* *लोक आपोआपच जुळत जातात,* *कारण...* *प्रभाव चांगला असण्यापेक्षा,* *स्वभाव चांगला असणे महत्त्वाचे असते.* *मोत्यांना तर सवयच असते विखुरण्याची,* *पण धाग्याला सवय असते,* *सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची.* *जिंकणे म्हणजे नेहमी पहिलाच नंबर येणे,* *असे नसून...* *एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करता येणे,* *यालाही जिंकणे असेच म्हणतात.* *अपने अंदर से अहंकार को;* *निकालकर स्वयं को हलका करे;* *क्योकि उंचा वही उठता है;* *जो हलका होता है;* *चांगल्या वेळेपेक्षा,* *चांगली माणसे महत्वाची असतात,* *कारण...* *चांगल्या माणसांमुळे,* *चांगली वेळ अनेक वेळा येऊ शकते.

◾भक्तीगीत :- एकतारी संगे एकरूप झालो

इमेज
 🌻 आनंदी पहाट 🌻 मनाचिये वारी पंढरीची सफल जीवनाचे रहस्य सांगणारी 🌹⚜️🌸🚩🛕🚩🌸⚜️🌹     *देवाचिये द्वारी उभा क्षणभरी*     *तेणें मुक्ती चारी साधियेल्या*     *हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा*     *पुण्याची गणना कोण करी*                 मुक्ती म्हणजे आनंद. "न लगे मुक्ती धनसंपदा.. संत संग देई सदा" असं तुकोबा म्हणतात. संत भक्तीचा उपाय हा नामस्मरण सांगतात. पंढरी वारीमध्ये संत सहवास लाभतो तो नामस्मरणाने. त्याने सुखोपभोगी जीवनाचा खरा अर्थ सांगणारी दृष्टी लाभते.         माऊली म्हणतात.. देवाच्या दारात क्षणभर जरी उभे राहिले तरी सलोकता, समीपता, सरुपता आणि सायुज्यता या चारही मुक्तीचा लाभ होतो.         मुक्ती म्हणजे खरा आनंद. सलोकता म्हणजे ही जगताची सृष्टी भगवंताची आहे, त्याचे सानिध्य मला आहे. समीपता म्हणजे तो सदैव माझ्याच सोबत आहे. सरुपता म्हणजे मी त्याचाच अंश आहे. सायुज्यता म्हणजे तो आणि मी वेगळे नाहीच. हा मुक्तीचा अर्थ पटतो आणि मग सर्वदूर.. प्रत्येकामध्ये विठ्ठलच दिसतो.. इतरांशी वागणूक बदलते. या आनंदासाठी विठ्ठल भक्तीत रमून त्या अगणीत पुण्याने जीवन आनंदी होते.         मनाचिये वारीत ज्ञा

◾बोधकथा :- झाकली मुठ सव्वा लाखाची

इमेज
एकदा एका राजाच्या घरी, धार्मिक कार्य करण्यासाठी एक भटजी जातात. धार्मिक कार्य पार पडल्यावर दक्षिणा म्हणून राजा त्यांना काही रुपये देऊ करतात. ती दक्षिणा, आपल्या मुठीत घेऊन तो ब्राम्हण राजदरबारातून बाहेर पडतो.  गावातील सर्व लोकांना माहित असतं, कि राजाच्या घरी आज काहीतरी पूजा अर्चना आहे. आणि, ते भटजी जसे मुख्य गावात येतात. तशी त्यांच्यापाशी लोकांची एकच झुंबड उडते. आणि एक कुतूहल म्हणून सगळी लोकं त्यांना विचारणा करतात. राजाने, दक्षिणा म्हणून तुम्हाला काय दिलं आहे..? भटजी महाचतुर असतात, ते म्हणतात.. मी तुम्हाला ते असं सांगणार नाही. तुम्हीच ते ओळखा. आणि या ओळखा ओळखीच्या खेळाचं कधी एकदा पैजेत रुपांतर होतं. हे कोणालाच समजत नाही.  एक व्यक्ती म्हणतो.. तुमच्या मुठीत झाकलेली जी काही वस्तू असेल. ती मी दहा हजार रुपयात विकत घ्यायला तयार आहे. तर दुसरा व्यक्ती, लगेच वीस हजाराची बोली लावतो. तिसरा, चौथा, पाचवा, सहावा..असं करता करता ती बोली वाढतच जाते.  आणि बघता बघता हि बोली अगदी एक लाखावर येऊन पोहोचते. आता बाकी सर्व लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. कि त्या झाकल्या मुठीत नेमकं काय असेल..? बाहेर चालू असलेला

◾अभंग :- ऊठ ऊठ पंढरीनाथा | mp3 abhang download | marathi song

इमेज
       🌻 आनंदी पहाट 🌻          !! मनाचिये वारी पंढरीची !!   विठुरायाला भक्तांच्या विनवणीची 🌹⚜️🌸🚩🛕🚩🌸⚜️🌹     हरीच्या भजनें हरीचे भक्त     हरीचे भक्त ।     झाले विख्यात भूमंडळीं ॥     तरोनि आपण तारिले आणिका ।     वैकुंठनायका प्रिय झाले ॥     ज्यांचे ध्यानी मनीं हरी ।     राहिला निरंतरीं दृष्टीपुढें ॥             ......संत निळोबा         पिंपळनेरच नाहीतर शिरुर.. पारनेर या अहमदनगर जिल्ह्यातील गावाची ओळख आहे संत निळोबांच्या गुरुभक्तीमुळे.         संत निळोबांची पालखी यंदाच्या मनाचिये वारीत आहे. संत निळोबा हे गुरुभक्तीचे आदर्श. असिम श्रद्धा आणि विश्वास या बळावरच जग चाललेय. संत निळोबा हे संत तुकाराम महाराजांचे शिष्य.. निस्सिम भक्त. तुकोबांचे जीवन.. विठ्ठल भक्ती आणि अभंग ऐकून त्यांनी शिष्यत्व पत्करले. त्यांचे तुकोंबांवर एवढे प्रेम की ते म्हणतात..       तुका ध्यानी, तुका मनी ।      तुका दिसे जनी वनी ।      तुका तुका म्हणोनी ।      निशिदिनी बोलावे ॥         निळोबांचे गुरुप्रती असलेले हे प्रेम, निष्ठा आणि भक्ती यामुळेच संत तुकोबांना वैकुंठाहून त्यांना दर्शन देण्यास यावे लागले अशी आख्यायिका

◾बोधकथा :- राज-ज्योतीष भरती

इमेज
     ╔═════ ▓ ࿇ ▓ ═════╗     बोधकथा       ╚═════ ▓ ࿇ ▓ ═════╝ अवंतीनगरीचे राजे बाहुबली यांना राजज्‍योतिष्‍याची गरज होती. मंत्रिपरिषदेसमोर त्‍यांनी ही इच्‍छा व्‍यक्त केली. राजज्‍योतिषाबाबत घोषणा केली जावी आणि पात्र व्‍यक्तिला निरखुन पारखून नियुक्त केले जावे अशी सर्व मंत्रिगणांनी सर्वसहमतीने ठरवले. या पदासाठी पात्र उमेदवारांनी मुलाखती द्याव्‍यात अशी दवंडी दुस-या दिवशी राज्‍यात पिटवण्‍यात आली. सर्व उमेदवार ठरलेल्‍या वेळी दरबारात उपस्थित झाले. राजाने स्‍वत:च मुलाखती घेण्‍यास सुरुवात केली. अनेक ज्‍योतिष्‍यांनी आपल्‍या ज्ञानाचे सादरीकरण करण्‍यास सुरुवात केली परंतु राजाचे समाधान झाले नाही. अखेरीस तीन ज्‍योतिषी उरले त्‍यातील पहिल्‍या ज्‍योतिष्‍याला राजाने विचारले,”तुम्‍ही भविष्‍य कसे सांगता” ज्‍योतिषी म्‍हणाला,”नक्षत्र पाहून” राजाने दुस-या ज्‍योतिष्‍याला हाच प्रश्‍न विचारला तेव्‍हा दुसरा ज्‍योतिषी म्‍हणाला,”हस्‍तरेषा पाहून भविष्‍य सांगतो. ” तर तिसरा ज्योतिषी उत्तरला  "फासे टाकून खात्रीलायक भविष्य वर्तवितो." परंतु राजाला कुणाचीच उत्तरे आवडली नाहीत. अचानक राजाला तेव्‍हा आपल्‍या राज्‍या

◾भक्तीगीत :- देव माझा विठू सावळा | mp3 abhang download | marathi song

इमेज
🌻 आनंदी पहाट 🌻 !! मनाचिये वारी पंढरीची !! सत्संगींच्या सहवासातील 🌹⚜️🌸🚩🛕🚩🌸⚜️🌹         चंदनाचे झाड परिमळे वाढ ।      त्याहुनी कथा गोड विठ्ठलाची ॥      परिमळू सुमने जाई जुई मोगरे ।      त्याहुनी साजीरे हरि आम्हा ॥      आम्हा धर्म हरि आम्हा कर्म हरि ।      मुक्ती मार्ग चारि हरि आम्हा ॥        .....संत निवृत्तीनाथ महाराज         श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर ही निवृत्तिनाथांच्या वास्तव्याने पुनीत अशी संतभूमि. भारतीय संस्कृतीने प्रदान केलेली विश्वातील सर्वश्रेष्ठ अशी विश्वकल्याणाची माऊलींची प्रार्थना म्हणजे पसायदान. हे उदार हृदयी पसायदान जन्मले निवृत्तिनाथ कृपेने. निवृत्तिनाथांच्या आज्ञेने माऊलींनी आपल्या स्वतंत्र प्रज्ञेने संस्कृत गीतेवर सुलभ मराठीत ज्ञानेश्वरी लिहिली आणि ती जगविख्यात ठरली.         यंदाही मनाचिये पंढरी वारीत दहा पालखीमध्ये निवृत्तिनाथांची पालखी आहे. भागवत धर्माचे निवृत्तिनाथ हे आद्यगुरु. त्यांनी  ज्ञानेश्वर.. सोपानदेव.. मुक्ताबाईंचा सांभाळ तर केला. त्यांचे गुरु झाले. भागवत धर्माचे सारेच संत त्यांचे मोठेपण मान्य करुन वंदन करतात.         या पंढरीच्या राजाच

◾गीत :- शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी

इमेज
꧁ 🌻 आनंदी पहाट 🌻 ꧂ ⚜⚜⚜ शुभविवाह मंगलपर्व विशेष ⚜⚜⚜ 💞🥀🌸🔆💑🔆🌸🥀💞          स्वप्न ही सगळेच बघतात. रम्य स्वप्न उराशी बाळगून केलेली वाटचाल ही पण जीवनाला अर्थ देते. त्या वाटचालीतही आगळे समाधान प्राप्त होते.         आता आज आकाशात तो शुक्रतारा उगवलाय.. तळ्याच्या पाण्यात सर्वत्र ते आल्हाददायक चांदणेच दिसतेय छान मंदमंद वारा वाहतोय आणि ज्याच्या सोबतीने आजन्म वाटचाल करावी असे वाटले, तो सहकारी भेटल्याने नकळत गाणे गुणगुणले जातेय की तू अशीच जवळ रहा.. माझ्या डोळ्यांत डोळे मिसळून रहा.         आज हा आनंद शब्दा पलिकडचा. या भावना शब्दांत वर्णन करणे अशक्यच. पण तू मात्र ते समजून घे. तूला फुलांसारखे कोमल मन लाभलेय. त्याच्या गंधाने अंतरंगात स्पंदने निर्माण होत अंग शहारुन गेलेय. या सुखद स्वराने मी पुर्णपणे भारावून गेलोय. या सुखद स्वरांनी जन्मभर सोबत करावी. माझे स्वप्न आज सत्यात उतरलेय.   🌹🔆🥀👁❣👁🥀🔆🌹 *_शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी_* *_चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी_* *_आज तु डोळ्यांत माझ्या..._* *_आज तु डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा_* *_तु अशी जवळी रहा, तु अशी जवळी रहा_* *

◾अभंग :- पंढरीची वारी जयाचिये कुळीं |

इमेज
   🌻आनंदी पहाट🌻   मनाचिये वारी पंढरीची   सुलभ भक्ती सोपानाची 🌹⚜️🌸🚩🛕🚩🌸⚜️🌹        उघडली दृष्टी इंद्रिया सकट ।      वैकुंठीची वाट पंढरी जाणा ॥      दृष्टीभरी पाहे विठ्ठल दैवत ।      पूर्ण मनोरथ विठ्ठल देवे ॥  .....संत सोपानदेव         सासवड पुण्यालगतचे गाव. सोपानदेवांच्या वास्तव्यामुळे पुनीत अशी ही भूमी. सोपान अर्थातच भक्ती मार्गाचा डोंगर पार  करण्यासाठी सुलभ शिकवण देणारे असे सोपानदेव. हे सोपानदेव भाग्यवान. त्यांना घरीच गुरु लाभले ते ज्ञानीयाच्या राजाचेही असे गुरु निवृत्तीनाथ.         सोपानदेव बालपणापासून भाऊबहिण.. संत नामदेवासह पंढरी वारी करायचे. त्यांच्या उक्ती आणि कृतीने त्यांनी भक्ती मार्ग सुलभ केलाय. यंदाही मानाच्या दहा पालखीमध्ये ज्ञानोबा, तुकोबांच्या समवेत सोपानदेव आहेतच.         भौतिक जगात सदैव सुखाची तळमळ असते. जीवन सुखी.. सुरक्षित.. आनंदी व्हावे म्हणून सतत नवनवीन शोध लागतात. पण तरीही मनुष्य जीवनातील चिंता कमीच होतच नाहीत. मनःशांती लाभतच नाही. सुरक्षितता वाटतच नाही.          मग जीवनात सदैव असलेल्या शाश्वत सुखासाठी आमचे संत वाट दाखवतात ते भक्ती मार्गाच्या पंढरीची. वारीत ट

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...