◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...
भारतामध्ये कोरोनाचा संसर्ग जास्त पसरू नये म्हणून केंद्र सरकारने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास पूर्णपणे बंदी घातली. त्यामुळे नागरिकांना नाइलाजाने का होईना आपल्या स्वतःच्या घरी चार भिंतीच्या आतच थांबावे लागले. भारतातील नागरिकांवर यापूर्वी कधीही दिवसेंदिवस कुठेही बाहेर न पडता घरातच थांबावे लागले असा प्रसंग आला नव्हता. दिवसेंदिवस घरातच थांबल्यामुळे भारतातील नागरिकांना काही गोष्टींची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली किंवा काही गोष्टी त्यांच्या लक्षात येऊ लागल्या की ज्या गोष्टींवर त्यांनी यापूर्वी आपल्या आयुष्यात कधीही विचार केलेला नव्हता किंवा त्यांच्याकडे त्यांनी वेळेच्या कमतरतेमुळे दुर्लक्ष केले होते.
घरातील व्यक्तींबरोबर बराच काळ व्यतीत केल्यामुळे नातेसंबंधांचे खरे महत्त्व समजून आले. परिवार खऱ्या अर्थाने एकत्र आले.आपल्या परिवारातील सदस्यांबरोबर नात्याची वीण अधिकच घट्ट झाली व त्यांच्याबरोबर भावनिक संबंध जोडले गेले.आपल्या पूर्वजांनी आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात कुटुंबव्यवस्थेला कशासाठी अनन्यसाधारण महत्त्व दिले होते त्यामागची कारणे या कालावधीत उमजून आली. आपण आपल्या चरितार्थासाठी जे काही काम करतो त्यामागे आपले कुटुंब हे प्रेरणा किंवा फार मोठी ताकद असते याची प्रकर्षाने जाणीव झाली.
बरेच दिवस घरातच राहिल्यामुळे ब-याच लोकांना आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव देता आला.काहींनी वेगवेगळ्या प्रकारची चित्रे काढण्यास सुरुवात केली, काही लोकांनी वेग वेगळ्या प्रकारची वादे वाजविण्यास सुरुवात केली, काही लोकांनी लिखाणास सुरुवात केली, काही लोकांनी गाणी म्हणण्यास सुरुवात केली, काहीनी अभिनय करण्यास सुरुवात केली. लोकांना त्यांच्या आयुष्यात प्रथमच प्रकर्षाने जाणीव झाली की आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात कुठलातरी छंद आपण जोपासला पाहिजे..जर आपण एखादा छंद जोपासला तर आपले मन प्रसन्न राहते,आपला उत्साह वाढतो, काहीतरी नवीन निर्माण करण्याची उमेद निर्माण होते, आपल्या बुद्धीला चालना मिळते व आपला जीवन प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी मदत होते.
रस्त्यावरील वाहनांची वर्दळ बऱ्याच प्रमाणात कमी झाल्यामुळे ,कारखान्यातील उत्पादन काही महिने बंद झाल्यामुळे प्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय घट झाली. त्यामुळे पक्षी मुक्तपणे आकाशात संचार करू लागले, झाडे चांगल्या प्रकारे बहरू लागली, छोट्या छोट्या वेलिही डोलू लागल्या,प्राण्यांनाही शुद्ध हवा मिळू लागली. नदीतील प्रदुषणाच्या पातळीतही घट झाली व त्यामुळे नदीतील पाणी स्वच्छ दिसू लागले व नदीचा तळही दृष्टीस पडू लागला. लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव, समारंभ, मिरवणुका मोर्चे इत्यादीवर बंदी आल्यामुळे ध्वनि प्रदूषणातही लक्षणीय घट झाली.नागरिकांना श्वास घेण्यासाठी स्वच्छ हवा उपलब्ध झाल्यामुळे प्रदूषणामुळे जे काही आजार होतात त्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात घट दिसून आली. नागरिकांना स्वच्छ प्रदूषण रहित हवेचे महत्त्व कळून आले.
काही महीने हॉटेल पूर्णपणे बंद होते,ऑनलाइन ही नागरिकांना बाहेरून काहीही खायला मागवता येत नव्हते. बाहेर जाऊन काहीही खाणे शक्य नव्हते.त्यामुळे या काळात लोकांचे आजारी पडण्याचे प्रमाणही कमी झाले होते. लोकांना प्रथमच या गोष्टीची जाणीव झाली कि आपण बाहेरील खाणे थोड्याफार प्रमाणात कमी केले तरी आपल्या प्रकृतीच्या तक्रारी थोड्याफार प्रमाणात कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
आपल्याला जो काही मानवी देह मिळाला आहे तो किती मौल्यवान आहे किंवा त्याची खरी किंमत काय आहे याची जाणीव सर्वांना प्रथमच या काळात कळून किंवा उमजून आली. लोकांनी आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. लोक सकाळी लवकर उठून घराबाहेर पडून स्वच्छ हवेत फिरण्यासाठी जाऊ लागले काहींनी प्राणायाम व योगासने सुरू केली. काही लोकांनी सायकल चालविण्यास सुरुवात केली. काहींनी पळण्याचा व्यायाम सुरू केला. लोक वेग वेगळ्या प्रकारचे खेळ खेळू लागले.
लोकांना जीवन कसे जगावे, जीवनात कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यावे, कोणत्या गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजेत या सर्वांची शिकवण या कोरोना महामारीने दिली असे मला वाटते. वर नमूद केलेल्या गोष्टींचा मानवाने शांतपणे विचार करून त्या गोष्टी जर व्यवस्थित,योग्य प्रकारे व नियमितपणे आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणल्यास त्यांचे जीवन सुखमय,आनंददायी व निरोगी होईल.
🙏🙏🙏
लेखक : आनंद रुद्रप्पा हूलगेरी
1,पर्ल रेसिडन्स,मिरानगर,जुळे सोलापूर,सोलापूर.
पिन -413008 भ्रमणध्वनी ---
☎ 9175087388 / 8208306246
असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आमचे YouTube चैनल सबस्क्राईब करा
दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp व Teligram समुहा मध्ये सहभागी व्हा
-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
📱आवडल्यास नक्की शेअर करा📱
धन्यवाद
ह्या पैकी काय वाचायचे आहे ❓
सुंदर
उत्तर द्याहटवा