पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कविता : राहून गेले

इमेज
_________________________ जगणे कठीण होते बरेच भोगुन झाले  खुप जगायचे होते थोडे राहून गेले नजरा बऱ्याच होत्या जखमा देत होत्या लक्तरे या देहाचे कितीदा पाहुन झाले विस्कटलेले आयुष्य थोडे शिवायचे राहून गेले किती हात होते किती घात होते  गर्दीतून स्पर्श किती झेलून झाले लज्जेला थोडे झाकायचे राहून गेले किती धावत होते किती पहात होते खेळ वासनेचा खेळून किती वार केले आक्रोशालाही थोडे शांत करायचे राहून गेले किती आकृत्या  विकृत झाल्या किती बळी गेल्या मेणबत्तीचेही कितीदा  वितळून झाले निषेधाचेही थोडे  निषेध करायचे राहून गेले धाव जोरात होती पळवाट कुठेच नव्हती वेदनेलाही ठार करून शिल वेशीवर टाकून गेले अमानुषतेलाही थोडे समजावयाचे राहून गेले संजय धनगव्हाळ धुळे ९४२२८९२६१८ _____________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

सोडून द्यावं | marathi poem | जीवनावर कविता

इमेज
 🙏🏻😊 सोडून द्यावं 😊🙏🏻 🍁 एकदोन वेळा समजावून  सांगूनही पटत नसेल तर समोरच्याला समजावणं *सोडून द्यावं* 🍁 🍁 मुलं मोठी झाल्यावर स्वतंत्रपणे  निर्णय घेत असतील  तर पाठीमागे लागणं  *सोडून द्यावं* 🍁 🍁 मोजक्याच लोकांशी ऋणानुबंध जुळतात, एखाद्याशी नाही पटलं तर बिघडलं कुठं *सोडून द्यावं* 🍁 🍁 एका ठराविक वयानंतर  कोणी नावं ठेवली तर मनावर घेणं  *सोडून द्यावं* 🍁 🍁 आपल्या हातात काही नाही, हा अनुभव आल्यावर इतरांची वा भविष्याची चिंता करणं  *सोडून द्यावं* 🍁 🍁 इच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं तर स्वतःकडून अपेक्षा करणं *सोडून द्यावं* 🍁 🍁 प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं,  आकार, रंग सगळंच वेगळं म्हणूनच म्हणतो तुलना करणं  *सोडून द्यावं* 🍁 🍁 आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्यानंतर रोज जमा खर्चाची मांडणी करणं   *सोडून द्यावं* 🍁 *समजलं तर ठीक नाहीतर हे ही सोडून द्यावं* 🙏🏻🙏🏻 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-  सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

आता मला जमायला लागलय | मराठी कविता | audio poem

इमेज
✨🍀✨ आता मला जमायला लागलय . आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर  जे जे मला दुखवत गेले  त्या त्या सगळ्यांना  न दुखावता सोडून देणं  *आता मला जमायला लागलयं.* संघर्षाच्या किंवा वादविवादाच्या क्षणी वाद न घालता तेथून दूर  निघून जाण्यातंच खरी परिपक्वता असते  *हे ही समजायला लागलय.* माझ्या बरोबर घडणाऱ्या  अनेक वाईट गोष्टींचा  उहापोह करून त्यात  शक्ती खर्ची घालून  आजूबाजूला जे जे उत्तम आहे त्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून जातोय *हे ही जाणवायला लागलयं.* आलेल्या अनुभवांतून बाहेर पडत स्वतःला सावरून,  इतरांना आनंदी करणे *मला आता जमायला लागलय.* कोणत्याही न पटणाऱ्या गोष्टींवर काहीही न बोलणे म्हणजे  त्यांना संमती असणे ,गरजेचे नाही, कधी-कधी काहीही न बोलणं किंवा कोणतही प्रत्युत्तर न देणं खूप काही बोलून जातं आणि सांगूनही जातं.  *हे ही कळायला लागलंय .* आपण लोकांवर किंवा त्यांच्या विचारांवर बंधन आणू शकत नाही पण स्वतः च्या मनावर मात्र बांध घालू शकतो. आपण अशा लोकांचे वागणे किती मनावर घ्यायचे, त्यांना किती महत्व द्यायचं, त्यांनी बोललेल्या गोष्टी किती डोक्यात साठवायच्या आणि स्वतःचे आयुष्य खराब क

सुसंस्कार..

इमेज
_सुसंस्कार.-_ _लेखक- अनामिक._            आयुष्याच्या प्रवासात कोण, कुठे, केंव्हा आणि कशा स्वरूपात मिळेल काहीच सांगता येत नाही. अशाच एका प्रवासात मला आलेला  अनुभव थोडक्यात असा.           माझ्या जिवलग मित्राच्या मुलीचं लग्न होतं राजमुंद्री या गावाला. विशाखापट्टणम पासुन काही मैलांवर असणारं हे गाव.        मी विशाखापट्टणम स्टेशनवर मिसेससह पोहोचलो. रेल्वे प्रवाशांनी खचाखच भरली होती. पाय ठेवायला जागा नव्हती. काही प्रवासी ऊभ्यानेच प्रवास करीत होते.        एकदाची ट्रेन सुरू झाली आणि हायसे वाटले. राजमुंद्रीला जातांना तूली नावाचं एक स्टेशन लागतं. गाडी हार्डली एखादा मिनिट थांबत असेल.       खिडकीतूनच चहा व्हेंडरला हाक मारून दोन काॅफींची ऑर्डर दिली आणि ईथेच सर्व गडबड झाली. मी ensure करायला हवं होतं की माझ्या वाॅलेटमधे चिल्लर पैसे आहेत की नाहीत. एक दोनशेची नोट होती त्याला दिली. ऊरलेले पैसे वापस घेता घेता ट्रेन सुरु पण झाली.         झालं, तिकडे रेल्वेचं इंजीन भडकलं आणि ईकडे बायको. थांबता थांबेना. "आधीच सांगितलं होतं तुम्हाला, काॅफी घेऊ नका म्हणून, आणि वेंधळे तर ईतके की पैसे आधीच देऊन टाकले."

शांत स्वरात बोलल्यास साक्षात ईश्वरच त्या घरात वास्तव्य करतो

इमेज
"शांत स्वरात बोलल्यास साक्षात ईश्वरच त्या घरात वास्तव्य करतो."  "चढलेला मोठा आवाज"... आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आली आहेत की, घरामध्ये चढ्या आवाजात बोलू नये. विषारी लहरी पसरतात. मृदू स्वरात संवाद करावा. कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत ठेवावा.  घरात हसतमुखाने वावरावे. मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे.  घरांतील नोकरवर्गावरही तारस्वरात ओरडू नये कारण त्यांना राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या *ऋण लहरी अशुभ अनुभव* देऊ लागतात. अचानक पोट बिघडते. भूक मंदावते. अस्वस्थ वाटू लागते. म्हणून कोणालाच चढ्या आवाजात रागावणे किंवा शिव्या देणे हे *अदृष्य लहरींची शिकार* होण्याची वेळ आणते. काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नि जसा आपोआप शांत होतो तसा आपलाही राग आवरला जातो.  *शुभ लहरींचे* ही तसेच आहे. १२ हजार मैलांवर असलेल्या मुलाला आई आशिर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते. २५ वर्षाच्या कर्णाला पाहून कुंतीचे  उत्तरीय ओले होते. वासराला पाहून गायीला पान्हा फुटतो.  एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्

शट्डाऊन ॲन्ड रीस्टार्ट

इमेज
वाचण्यात आले ला सुंदर लेख   🌸शट्डाऊन अॅण्ड रीस्टार्ट🌸 चांगले - वाईट दिवस सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. पण काही वेळा आपल्या जीवनात काय चालले आहे हे आपल्यालाच कळत नाही. कष्ट करूनही फळ मिळाल्यासारखे वाटत नाही, विचार जुळत नाहीत. परिस्थिती पटत नाही. एकटेपणाची घंटा सतत कानात वाजत राहते. कशातही मन लागत नाही. हाती घेतलेले काम पूर्ण होत नाही. नवीन काम मिळत नाही. जवळच्यांपासून दुरावा जाणवतो. आपल्याला कुणी समजत नसल्याच्या विचाराने मन कटू होते... अशावेळी निराश होऊन काही परिस्थिती बदलणार नसते. रडूनही सहानुभूती शिवाय काहीच मिळत नाही. जे आपणच समजू शकत नाही किंवा सांगू शकत नाही ते आपले जवळचे तरी कसे समजतील. स्वत:ला किंवा कुणालाही दोष देणे मूर्खपणाच ठरेल. ही परिस्थिती, हा प्रसंग कुणावरही येऊ शकतो. खरे तर प्रत्येकावर कधी ना कधी येतोच. अशा वेळी न रडता, न घाबरता खंबीरपणे सामोरे गेले पाहिजे... मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या बाबतीत आपण जसे करतो ते स्वत:वर करा. कधी कधी मधेच मोबाईल आणि कॉम्प्युटरची बटणे दाबूनही काही होत नाही. तेच चित्र दिसत राहते. आपण काही केल्या यंत्र चालू होत नाही., अशा वेळी तुम्ही काय करता...?

SpaceX एक अद्वितीय कंपनी

अवकाशाला गवसणी घालून  ••• पृथ्वी  एक जिवंत   Instagram वर ही पोस्ट पहा SpaceX (@spacex) ने सामायिक केलेली पोस्ट टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

व्यवसाय / उद्योग प्रकार

इमेज
📍 # *सुक्ष्म_तसेच_लघु_उद्योगांची_यादी*  💼 आपल्याला उद्योग सुरू करायचा असतो परंतु नेमका कुठला व्यवसाय सुरू करावा हे कळत नाही. मुळात आपल्याला ज्या गोष्टींची आवड आणि ज्ञान असेल त्याच क्षेत्रात आपण उद्योगाची सुरुवात करावी. अश्याच विविध क्षेत्रातील उद्योगांची यादी आपल्यासाठी उद्योजक महाराष्ट्र देत आहे. यापैकी आपण आपला उद्योग निवडू शकतात 👉 *खनिज संपत्तीवर आधारीत उद्योग –*  🎯कुंभार उद्योग 🎯चुना उद्योग,  🎯दगड फोडणे-कोरणे, 🎯नक्षीकाम करणे व दगडापासून उपयोगी वस्तू तयार करणे,  🎯पाटी पेन्सिल बनविणे,  🎯प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वस्तू तयार करणे,  🎯सरपणासाठी कोळसा तयार करणे,  🎯भांडी साफ करण्यासाठी पावडर तयार करणे,  🎯सोने, चांदी, दगड आणि कृत्रिम धांतूपासून दागिने तयार करणे,  🎯गुलाल-रांगोली तयार करणे  🎯लाखेच्या बांगड्या तयार करणे,  🎯रंग वॉर्निश,  🎯डिस्टेम्पर तयार करणे,  🎯काचेची खेळणी तयार करणे 🎯सजावटीसाठी काच कापणे, काच डिझायनिंग व पॉलिश करणे,  🎯रत्न कटाई करणे.  👉 *वन संपत्तीवर आधारीत उद्योग -*  🎯हातकागद उद्योग,  🎯वह्या- रजिस्टर- लिफाफा इत्यादी लेखन सामुग्री तयार करणे,  🎯काथ तय

व्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी

इमेज
 *१. वेळ -*  👉तुम्ही व्यवसायाला पुरेसा वेळ देऊ शकत असाल तरच व्यवसाय सुरु करा. इतरांवर विसंबून राहून तुम्ही व्यवसाय करू शकत नाही. वेळेचे योग्य नियोजन आवश्यक असते. व्यवस्यासाठी वेळ देणे म्हणजे २४ तास व्यवसायाच्या ठिकाणी बसून राहणे नव्हे. तर त्याचे कामकाज योग्य पद्धतीने चालत आहे कि नाही याकडे सतत लक्ष देणे आवश्यक असते. एकपेक्षा जास्त व्यवसाय असतील तर तुम्हले वेळेचे योग्य नियोजन करावेच लागते. प्रत्येक व्यवसाय त्याच्या १००% क्षमतेने चालावा यासाठी त्याला आवश्यक तो वेळ द्यावाच लागेल.   *२. एकाच ठिकाणी १८ तास आणि कोणत्याही प्रकारचे, काम करण्याची तयारी -*  👉एकाच ठिकाणी दिवसातील १८ तासांपेक्षाही जास्त वेळ काम करण्याची तयारी हवी. व्यवसायात काही वेळेस अशा घटना घडतात कि तुम्हाला त्यासाठी तहान भूक विसरून तासंतास काम करत राहावे लागते. कित्येक वेळा एखादी मोठी ऑर्डर असते, किंवा कामकाजात एखादी अडचण येते अशावेळी तुम्हाला तहान भूक विसरून तुमचे काम करावे लागते. अगदी दहा पंधरा अठरा तास सुद्धा व्यवसायाच्या ठिकाणी काम करत राहण्याची वेळ येऊ शकते. यासाठी तुमची मानसिक शारीरिक तयारी असणे आवश्यक असते. ९ ते ५ काम

प्रयत्न सुरू ठेवा, यश नक्कीच मिळेल...

इमेज
लेख- प्रयत्न सुरू ठेवा, यश नक्कीच मिळेल...!! 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹       आज  अचानक मन जरा स्थिरावलं... काय गमावलं, काय कमावलं... याचा हिशोब मला कळेना, म्हणून मी जरा मागे डोकावून पाहिलं.. नवीन काही करायचं ठरवलं तर.. हरण्याची भीती कायम मनाला सतावत होती. अख्खा जग समोर आणि मी जगाच्या मागे आहे, हा विचार एकसारखा मनात गोंधळ घालत होता..      एरवी मला सगळेच म्हणायचे, तू काहीच करु शकत नाही..! असे म्हणणारे खूप मिळाले. पण मी का करु शकत नाही...? कसं करु शकत नाही...? हे ठरवणारे ते कोण..!!  कोण का करू शकतो, कसं करू शकतो.. का करू शकत नाही.. हे आपण कुणाबद्दल नाही ठरवू शकत.. मुळात तो आपल्याला अधिकारच नाही.   काय करायचं, काय नाही. हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं..!!           पण कुठेतरी ऐकलं होतं.. प्रत्येक नवीन गोष्टीची सुरुवात ही 'हो' म्हणून करायची असते. मनात ठरवलं आणि प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनाने करू लागलो. आजपर्यंत आयुष्यात प्रवास करताना थोडी घाई झाली.         पण आज कुठे समोर जाऊन मनाला शांती मिळाली.   मी यशस्वी झाल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. जिंकल्यानंतर हरण्याची भीती

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट