◾गीत :- गणपती महिमा सांगणारे गाणे
🌻 आनंदी पहाट 🌻 ⚜️⚜️⚜️⚜️⚜️ शब्दप्रभू जगदीश खेबूडकर "माझी परंपरा कोण चालवेल ही चिंता या जगदीश खेबूडकर पोराने मिटवली".. इति गदिमा. आपल्या क्षेत्रातील दुसऱ्या प्रतिभावंताला दिलखुलास दाद देणारे.. कौतुक करणारे.. मोठेपणा मान्य करणारे लोक फारच थोडे. गदिमां यापैकीच एक. जेव्हा मराठी चित्रपटात गीतकार म्हणून गदिमांचा एकछत्री अंमल होता तेंव्हा जगदीश खेबूडकरांचा प्रवेश झाला. लवकरच हे नाव सर्वोतमुखी झाले. गदिमांचेही याकडे बारीक लक्ष होते. खेबूडकर यांची गीते विविधांगी तरीही सकस.. ते पण सहजसुलभ भाषेत हे गदिमांना मान्य होते. "हा.. पूढे माझीही आठवण विसरायला लावेल.." अशी गदिमांनी सर्वासमक्ष केलेली स्तुती ऐकताच तत्काळ खेबूडकर म्हणाले.. "गदिमा हे हिमालय आहेत.. मी गदिमांच्या पाऊलवाटेवर चालतोय.. त्यांचे ठसे समुद्राच्या वाळूवरचे नाहीत, तर पाषाणावरचे कधीच न मिटणारे ठसे आहेत.. मी हा हिमालय चढणार नाही, तर या भव्य हिमालयाला प्रदक्षिणा घालेल.." असे आपले शिष्यत्व खेबूडकरांनी जगजाहीर केले. एकमेकांचा सन्मान करणारी ही गुरुशिष्य जोडी