◾कविता :- नजरेतल्या माझ्या | ✍मंगेश शिवलाल बरई
नजरेतल्या माझ्या, अश्रूंच्या लाटा, दाखवतील का ? आयुष्याच्या नव्या वाटा, सवालानं या.... मन माझं नेहमीच कुरतडतं, कुठेतरी, एकाद्या कोपरयात बसून माझंच जग मला आठवत असतं, किती सुंदर, किती देखणं, त्यात माझं अर्थपूर्ण हसणं, मात्र आता तर.... फुटतोय माझ्या प्रत्येक..... वेदनेला फाटा, होत चाललंय.... धूसर आयुष्य माझं, प्रत्येक नजरेतून, अस्तित्व माझं मला भासतं कधीतरी चुकून पडलेल्या स्वप्नातून, कोणी, कधीही तुडवून जावं असाच मी वाटेतला काटा, नजरेतल्या माझ्या, अश्रूंच्या लाटा, दाखवतील का ? आयुष्याच्या नव्या वाटा. मंगेश शिवलाल बरई. हिरावाडी, पंचवटी, नाशिक. ➖➖➖➖➖➖🔴➖➖➖➖➖➖ दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp समुहा मध्ये सहभागी व्हा -{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 📱 आवडल्यास नक्की शेअर करा 📱