◾कविता :- हे वर्ष अमृताचे... | ✍योगेश चाळके
हे वर्ष अमृताचे....
नांदो सदा निरंतर...स्वातंत्र्य भारताचे
राहो सदा चिरंतर..हे वर्ष अमृताचे
ध्वज उंच उंच जावा..डौलात तो डुलावा
अन् धर्म भारताचा....विश्वात थोर व्हावा
.राखीन हीत माझे...होऊन आत्मनिर्भर
चालेल देश माझा....साऱ्या जगाबरोबर
..या माय हिंदवीची..गाईल विश्व महती
नाही तिच्या प्रमाणे..कोणी कुठेच जगती
..वाहून देह माझा..करणार देशभक्ती.
बलवंत ही उद्याची..भारत महान शक्ती...
मुक्तासुत... अर्थात योगेश चाळके
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा