◾कविता :- सोनियाचा दिन... | ✍खंदारे सूर्यभान गुणाजी
सोनियाचा दिन
गणराज्य स्वातंत्र्याचा,
सोन्यापरी हा सण.
करू सोहळा साजरा,
नाचू गाऊ आनंदानं...
सडा सारवण करु,
काढू फुलांची रांगोळी.
ध्वज फडकता गगनी,
नाद घुमे भू-मंडळी...
लोकशाही गणतंत्र,
राज्यघटना भारताची.
सर्व धर्म समभाव,
बीज रोवू समतेची...
संविधान शिल्पकार ,
बाबासाहेब आंबेडकर.
एक संघ बांधून देश ,
दिला राष्ट्राला आकार...
प्रांत भाषा वेश भूषा,
करू सर्वांचा आदर.
मनी जपू मानवता,
देश भक्तीचा जागर...
देश करु बलवान,
देऊ समानतेची हमी.
राष्ट्र गीत मुखी गात,
देऊ ध्वजाला सलामी...
खंदारे सुर्यभान गुणाजी
मु.पो.जलधारा ता.किनवट
नांदेड - 9673804554
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा