◾विशेष लेख :- 'माझ्या द्ष्टीने स्वातंत्र्य'... | ✍ मंगेश शिवलाल बरई
स्वतंध्त्रय, स्वतंत्र्याचा अर्थ आज प्रत्येकाने आप-आपल्या सोयीनूसार लावलेला दिसतो आहे. म्हणूनच कदाचित स्वातंत्र्याच्या बाबतीत काही गैरसमज उदयाला आले आहेत.
मात्र, स्वातंत्र्य मिळण्याच्या पुर्वाच्या काळात सगळ्यांचे एकमेव ध्येय होतं. ते म्हणजे आपल्या भारत देशावर जे इंग्रजांचं राज्य होतं.त्यांची जी गुलामगिरी होती या देशावर त्या गुलामगिरीतून भारत देशाला मुक्त करणे. आणि त्यासाठी अनेक नेत्यांनी विरमरण पत्करून आपला देश स्वतंत्र केला, इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केला. आणि आपल्या स्वातंत्र्याचे स्वप्न साकार करून , आपला देश सर्वांगाने सुजलाम, सुपलाम केला.
आज आपला देश पारतंत्र्यातून निश्चितच मुक्त झाला. मात्र, हे आपल्याला मिळालेलं स्वतंत्र्य खरच स्वंतंत्र्य आहे का? हा प्रश्न मात्र आज खरोखरच अनुत्तरीत आहे. कारण आजची समाजिक स्थिती लक्षात घेतली तर प्रत्येक गोष्टीत भेद-भाव, धार्मिक तेढ निर्माण झाला आहे. तुलनात्मक गोष्टींना जास्त महत्व इथं प्राप्त झालं आहे. माणसातली वैचारिक पातळी क्षीण होत चालली आहे. ह्याच वैचारिक गुलामगिरीत माणसातली माणुसकी आज हरवुन बसली आहे. प्रत्येकजण स्वताच्या भौतिक सुखात गुंतून पडला आहे. कोणाला कोणाच्या विषयी काहीच वाटत नाही. प्रत्येक जण मी कसा याच्या पुढे जाईल ? या विचारात गुंतून पडला आहे. हा स्वार्थी माणसाचा स्वभावच माणसाला आज माणसाच्या स्वातंत्र्यापासून दुर लोटत आहे.
ह्या सर्व गोष्टी खरंतर स्वातंत्र्य काळात व्हायलाच नको. आपल्या पर्वजांनी हरप्रकारे यत्न करून आपल्याला स्वतंत्र्याचे हे सुगीचे दिवस दाखवले आहे. ते दिवस असे एकमेकांबद्दल हेवे-दावे करूनच हातून निष्टुन जावू नये. अशीच माफक अपेक्षा आज प्रत्येकाकडून व्यक्त करता येईल.
मंगेश शिवलाल बरई.
हिरावाडी, पंचवटी, नाशिक ४२२००३.
फोन-९२७१५३९२१६.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा