◾कविता :- अरे माणसा... | ✍ मंगेश शिवलाल बरई
'अरे माणसा'
असू दे तुझी मधुर वाणी,
बोलण्याने तुझ्या...
येऊ देऊ नकोस कोणाच्याही
डोळ्यात पाणी,
असु दे चेहऱ्यावर तुझ्या
मंजुळ हास्य,
मात्र पत्करु नकोस तू
कोणाचे लाचार दास्य,
वापर तू ,
जगण्याचे नवे तंत्र,
मिळू दे,
तुझ्यामुळे
समाजाला यशाचा नवा मंत्र,
जग तू स्वाभिमानाने,
तुझ्या अस्तित्वाने इतरांच्या नजरा,
बधतील तुझ्याकडे अभिमानाने,
घे तु उंच आकाशी भरारी,
दाखव जरा....
जगाला तुझी हुशारी,
मात्र
होऊ देऊ नकोस
होऊ देऊ नकोस
तुझी वागणूक विचित्र
कर समाजासमोर...
उभे 'आदर्श' माणुसकीचे चित्र,
हो दानशूर तू ,
वाटून इतरांना सुख,
घे विकत त्यांचे दुख,
अरे माणसा नाही
तुझ्यापेक्षा कुणी श्रेष्ठ दानी,
असु दे तुझी मधुर वाणी,
असु दे तुझी मधुर वाणी.
मंगेश शिवलाल बरई.
हिरावाडी, पंचवटी, नाशिक ४२२००३.
संपर्क- ९२७१५३९२१६.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा