◾कविता :- जगणं त्यांचं अन् जगणं आमचं | ✍मंगेश शिवलाल बरई
जगतात ते आरामात,
करतात ते उतमात,
पैशांच्या जोरावर.....
जगतो मात्र, आम्ही दिमाखात,
कष्टाच्या जोरावर,
मिळते त्यांना रोज
पंचपक्वानांची थाळी,
आम्हांला मात्र.....
मिळते नित्यनेमाने भाजी-पोळी,
पोटासाठी असते
आमची रोजची वणवण,
ठेवावे लागते त्यासाठी कधीकधी..
गहाण आमचे तन-मन,
असतो त्यांना,
राहण्यासाठी अलिशान बंगला,
आम्हाला मात्र,
एक किंवा दोन 'बीएसके' चा प्लॅटच वाटतो चांगला,
त्यांना फिरण्यासाठी लागते कार,
आम्ही मात्र,पायांच्या चपलांचे शिवुन-शिवुन चामडे झालो बेजार,
त्यांच्या डोळ्यात येत नसेल कदाचित..... दुखाचे आसु, मात्र, आमच्या डोळ्यात असते नेहमीच..... समाधानाचे हसु,
मंगेश शिवलाल बरई.
हिरावाडी, पंचवटी, नाशिक-४२२००३.
फोन-९२७१५३९२१६.
असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आमचे YouTube चैनल सबस्क्राईब करा
दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp व Teligram समुहा मध्ये सहभागी व्हा
-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
📱आवडल्यास नक्की शेअर करा📱
धन्यवाद
ह्या पैकी काय वाचायचे आहे ❓
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा