◾कविता :- कर्फ्यु ... | ✍मंगेश शिवलाल बरई
'कर्फ्यु'
झाले सर्वच रस्ते ओस,
कोणलाच राहिला नाही इथं
कोणाचाच सोस,
व्यवहार झाले सारेच ठप्प,
नेहमीच उत्साहाने, आनंदाने वाहणारा वारा
आहे आज गप्प गप्प,
थांबली जगरहाटी,
रस्त्यावर जागोजागी
झळतेय दहशतीची पाटी,
अशात...
रस्त्याच्या एका कोपरयात,
झाडावर काही पक्षी विसावलेले....
त्याच झाडाखाली चार-सहा मजूर,
फाटक्या कपड्यात बसलेले,
काहीतरी काम मिळेल या आशेने,
त्यांचे डोळे होते पानावलेले,
स्पष्ट दिसत होता,
डोळ्यात त्यांच्या कुटुंबाचा आक्रोश,
भरण्यासाठी लेकरा-बाळांच्या पोटाची खळगी,
त्यांचे उडाले होते अक्षरशः होश,
पण करणार काय,
कारण....
त्यांच्या आयुष्याचेही,
रस्ते सारे पडले होते ओस.
मंगेश शिवलाल बरई.
हिरावाडी, पंचवटी, नाशिक -४२२००३.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा