◾कविता :- हे भारत माता... | ✍मंगेश शिवलाल बरई
हे भारत माता,
तू जाग आता,
करतोय आम्ही आज साजरा,
दिवस तुझ्या स्वातंत्र्याचा,
वावटळं आली अनेक तरी...
नाही झाला कमी
मान आमच्या तिरंग्याचा,
हे भारत माता,
तू जाग आता,
गरीबी, लाचारी, भ्रष्टाचार,
असले तरी 'माणूस' डगमगला नाही कधी,
झाला जागा तो तुझ्यासाठी,
सुखाचे स्वप्न त्याचे रंगवण्याआधी,
फक्त त्याच्यासाठी...
हे भारत माता,
तू जाग आता,
हे भारत माता,
तू जाग आता,
होतीस तु जेव्हा पारतंत्र्यात,
केले आम्ही तेव्हा तुझ्या स्वातंत्र्यासाठी
आमच्या जिवाचे रान,
आज मात्र,
विसरत चाललो आम्ही
त्यांचे बलिदान,
जाग आणण्यासाठी त्यांना...
हे भारत माता,
तू जाग आता...
तू जाग आता...
मंगेश शिवलाल बरई.
हिरावाडी, पंचवटी, नाशिक-४२२००३.
📞फोन .९२७१५३९२१६.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा