◾विशेष लेख :- मी तिरंगा बोलतोय ! | ✍विजय यशवंत सातपुते

मी तिरंगा बोलतोय !

 "जयहिंद... होय..इकडे राष्टध्वजाकडे पहा..मी तिरंगाच बोलतोय".
 "हे देश वासियांनो पारतंत्र्यातून स्वतःला स्वतंत्र केल्या नंतर सर्वांना गुण्यागोविंदाने नांदता यावं म्हणून तुम्ही हे गणतंत्र, ही लोकशाही, राज्य घटना स्थापन केली.भारतीय म्हणून स्वतःचा गौरव करताना तुम्ही राष्टध्वजाकडे मान मला देता पण..सव्हीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट हे दोन दिवस सोडले तर कुणालाही माझी साधी आठवण देखील येतं नाही. "
तिरंगा मनापासून मनातलं बोलत होता..आम्ही सर्व स्तब्ध होऊन ऐकत होतो .तिरंगा पुढे बोलू लागला. 
  "कुठाय तुमची संस्कार क्षम पिढी, माता पित्यांची... डोळ्यात धाक ,प्रेमळ हाक ?"
"कुठाय ते घर, कुटुंब मोठे,आम्हीच छोटे,सागर गोटे. ?"
"कुठे हरवली ती ..वाडा संस्कृती सणा वाराला जगजागृती. . .?"
"कुठे गेली..मराठी  शाळा ..इंग्रजी बोली ..साराच घोटाळा. . .?"
"आवडायची मला तुमची वेशभूषा चड्डी ठिगळ,लांडा सदरा 
बोली पघळ . .! आठवतात अजून, आज्जी, आजोबा शिस्तीत  त्यांच्या घडे बाळोबा . . 
दिसेनाशीच झाली पिढी व्यायाम कारी,नाना खेळात 
नंबर मारी. .अरे मित्रांनो कुठेय तो आजी भारत ,देश प्रेमाचे ,दैवी वारस. . .असेल जरी काही व्यसनी ,नात्यामधली चर्चा चटणी. .हरवली पिढी नोकर दार व्यवसायात सदा माघार.  !"
"पहायचो मी एक पिढी ,जाम स्वप्नाळू ,बापच बोले झालो लग्नाळू . करायची पिढी ,रोज वाचन ,देश कार्यात ,कार्य प्रवण . . दिसायची पिढी ,तत्वाला नेक ,माणुसकीची,उरात मेख. आजची पिढी ,करते मजा ,चुकांसोबत हळवी रजा. . 
हवी आहे मला अशी पिढी ,बंध नात्यांचे मनामधले ,जणू
श्वास शब्दांचे. . अशी ही पिढी ,भित्री असेल पण नसानसात ,जित्ती असेल. .!" 
"मायाळू  पिढी, पान्हा पोषण व्यवस्था करी रक्त शोषण. . .
सिंहावलोकन करताना ,पालक झालो ,भावी भारत  निशाणी वसने ल्यालो . .ही तिरंगी आस्मादिक निशाणी,गुंते नात्यात ,लग्न कार्यात दिसे मेळ्यात . .!"
"स्वातंत्र्यानंतर अर्धे शतक ,नव्या पिढीचा भारी वचक. . .
गावाकडची पिढी,ठरे अडाणी नव्या पिढीची नवी कहाणी. . 
अशी ही निसर्ग दत कनवाळू पिढी,फणस गोड...जाणार नाही ..जित्याची खोड. . .काटकसरी पण  हिशेबी पिढी,नव्यात रमे,जुन्या गोष्टीत  हिशेब जमे.. .शोधतोय मी  अशी पिढी, काळीज वाहू विश्वाची चिंता एकटे साहू. . 
आत्ता तर काय, जिकडे तिकडे,आनंदाश्रम,टाळू प्रवास 
तो वृद्धाश्रम . !"
 "मित्रांनी, माझं सारंच बोलणं तुम्हाला आवडणार नाही..पण मला हे सारं हवंय..मला संवादी भारतीय हवेत.मित्रांनो उद्या गणतंत्र दिवस, माझं एक ऐकाल..? प्रजासत्ताक दिन. लोकशाही च्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस. यंदाचा प्रजासत्ताक दिन आपणं जरा वेगळ्या पद्धतीने साजरा कराल का...? कशी असावी भारतीय राज्य घटना ,आपले उद्याचे भविष्य कसे उज्वल करता येईल?  कसें असावे शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण,  कसा असावा राज्य कारभार ?राज्य घटना ? रोजगार .. आपले प्रश्न, समस्या या विषयी आपली मते नोंदवून आपण आपापली नागरिकत्वामुळे जबाबदारी पूर्णं करूयात."
" आपले प्रजासत्ताक आपणच तेजोमय करण्या साठी आपले विचार फेसबुक,  वाॅटस अप,  ट्वीटर च्या माध्यमातून व्यक्त करा. भारत माझा मी भारताचा या विषयी आपली मते,  विचार, सुचना नोंदवून प्रजासत्ताक दिनी  सुसंवाद साधा.जागवूया देशभक्ती आणि हक्काने सांगूयात.....*होय, आम्ही भारतीय आहोत*"
तिरंग्याने  साधलेला हा विचार मला जागं करून गेला...!

विजय यशवंत सातपुते पुणे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🇮🇳🎯🇮🇳
यशाचा मंञ ©

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट