पोस्ट्स

संजय धनगव्हाळ च्या शोधाशी जुळणारे पोस्ट दाखवत आहे

"बंड्याची चाळ" | संजय धनगव्हाळ | विनोदी कथा

इमेज
"बंड्याची चाळ" संजय धनगव्हाळ (विनोदी कथा) **************** बंड्या म्हणजे चाळीतला विनोदी पुरुष तो रोजं काहीना काही कारणाने चाळीत हाश्यकल्लोळ करायचा बंड्याचा विनोदी स्वभाव असल्यामुळे चाळीकरी सतत हसतचं रहायचे बंड्याचा सर्वांना एकच सल्ला होता.माणसाने कसं नेहमीच हसतं रहायचे.कितीही चिंता दुःख ताणतणाव असला तरी हसल्यामुळे माणूस नौराशात रहात नाही. चेहरा नेहमीच हसरा राहतो आणि आनंदाने फुलतो म्हणून रोज रात्री सर्व चाळकरी जेवण आटोपल्यावर चाळीतल्या ओट्यावर एकत्र जमून विनदांचा हाश्यगजर करतं असे.तसे चाळीत नमुनेही भरपूर होते.त्यापैकी एक म्हणजे दामू मास्तर,एक नंबरचा बावळट तिरसट माणूस. त्याच्यासारखा तामसी माणूस साऱ्या पंचक्रोशीत नव्हताचं. त्यांची एकुलती एक कंन्या चिंगी,तिच बंड्याशी सुत जुळलं होतं पण दोघांच लग्न काही होईना,मग काय बंड्या काही केल्या शांत बसणारा नव्हता.एकदा तो ज्योतिष्याचा वेश धारण करून दामू मास्तरच्या घरी धडकला.मास्तरलाही भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता म्हणून मास्तरने बंड्याच्या हातात हात दिला आणि काय.... ( पुढिल भाग वाचण्यासाठी कृपया इथे क्लिक करा ) संजय धन

बाप कुठेच नसतो | संजय धनगव्हाळ | कविता

इमेज
'बाप कुठेच नसतो' ( संजय धनगव्हाळ ) ****************** वरवर कठोर दिसणारा बाप आतून खूप हळवा असतो सर्वांची काळजी घेणारा  बाप मात्र कोणालाच कळत नसतो बाप घराचा आधार होवून जगतो सर्वांना सांभाळून एकत्र ठेवतो खरतर बापाशिवाय घर पुर्ण होत नाही  बापाच्या वेदना मात्र  कोणी समजून घेत नाही घरात पाऊल टाकताच  आई आई करायचं दिसली नाही की बापाला विचारायच बाप घरात असतानाही आईचाच गजर सुरू असतो पोटतिडकीने वाट  बघणारा बाप मात्र कोणालाच दिसत नसतो बाप कसाही असला तरी काहीच कमी पडु देत नाही लेकरंबाळांना लाचारीने कुठेही झुकू देत नाही काहीझाल तरी  आईलाच विचारत असतात देण्या घेण्यासाठी मात्र बापाला पुढे करतात घरात बाप नसल्यावर विचारणा कधी होत नाही कुठे गेलेत बाबा अस  कोणी म्हणतही नाही ईथेतिथे आईचाच  पुढाकार असतो कुटुंबासाठी राबणारा  बाप मात्र कुठेच  नसतो आईच्या नावे खूप गाणी कविता असतात बापासाठी मात्र शब्द सुचत नसतात इतिहासाच्या पाणावर आईचे मातृत्व लिहले असते बापाच्या कर्तृत्वाचं पान कोरेच दिसते बाप सर्वांसाठी असतो पण बापासाठी कोणीच नसतो बाप आपल्यातून जातो तेव्हा बाप कळतो बापाशिवाय कपाळाचा कुंकूही शोभून दिसत

◾कविता :- विस्कटलेले आयुष्य | संजय धनगव्हाळ

इमेज
विस्कटलेले आयुष्य ****************** जगायच होतं तिला कोरकरकरीत आयुष्य तिच्या राजकुमारासाठी नी् नवरी होवून तिला नव्या घरचा उबंरठा ओलांडायचा होता पण या माणसांच्या गर्दीत विटाळलेल्या नजरांनी तिच्यावर घाव घातला आणि भातुकलीचा खेळ नको त्या उंबरठ्यावर आणून सोडला ती रडत होते ओरडत होते आक्रोश तिचा कोणीच  एकत नव्हते तिची वेदनाही कोणालाच कळत नव्हती आयुष्याचे लक्तरे होतांना ती रोज नव्याने पहात होती कुठे कसा मांडावा भातुकलीचा खेळ तिलाच कळत नव्हते विस्कटलेले आयुष्य ती रोज जगतं होते जगावं कि मरावं  प्रश्न तिच्यासाठी गंभीर होता त्या गुलाबी मंबईचा उंबरठाही तिला ओलांडता येत नव्हता जेव्हा जेव्हा ती  सुर सनईचे एकायची  तेव्हा झाकून घ्यायची देहावरचे शापित स्पर्श आणि घरावरून जाणारी  लग्नाची वरात ती दारात ऊभी राहून पहायची जणू तिला घ्यायला राजकुमार आलाय म्हणून एकसारख बघायची संजय धनगव्हाळ धुळे ९४२२८९२६१८ ________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-  सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

सारे जहासे अच्छा हिंन्दोस्थ हमारा | संजय धनगव्हाळ | yashacha mantra

इमेज
👆👆👆👆👆👆 'सारे जहासे अच्छा हिंन्दोस्थ हमारा' ( हे माझे विचार आहेत सर्वांनाच पटतील असे नाही.मला  वाटले म्हणून लिहले ,गैरसमज नसावा ) *संजय धनगव्हाळ* ******************* वरील पोस्ट वाचली आणि माझ्या मनात अनेक विचारांची गर्दी झाली.खरतर जातपात धर्म हे जर सोडले तर हा  भारत देश सर्वांचा आहे.जेव्हा जेव्हा या देशावर काही आपत्ती आली किंवा येते तेव्हा सर्वकाही विसरून सर्वधर्मीय मदतीला एकत्र येतात त्यावेळी कोणी कोणाला जात विचरत नाही.संकट आले आहे त्यातून कसे सहिसलामत निघता येईल फक्त हाच विचार त्यावेळी प्रत्येकाच्या डोक्यात असतो मग तो कुठल्याही जातीचा असो त्यावेळी त्याच्यासाठी माणुसकी हाच मोठा धर्म असतो आणि सर्वकाही विसरून प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संकट निवारण करत असतो.आपल्याला कळत नाही पण या देशात आज असे बरीच माणस,कुटुंब आहेत की ते जात विसरून गुण्यागोविंदाने राहतात एकमेकांच्या सुख दुःखात,शुभ कार्यात सण उत्सवात त्यांचा सहभाग असतो.एकमेकांचा घनिष्ठ घरोबा असतो.मग तो मुस्लिम असो,हिंन्दी असो,नाहितर आणखी ईतर कोणत्याही जातीधर्माचा असो.कोणाशी कसे ऱ्हायचे,वागायचे हे अपण ठरवायचं असतं आ

◾विशेष लेख :- हे सुदंर जीवन... Marathi Audiobook mp3 Marathi Audiostory

इमेज
हे सुदंर जीवन संजय धनगव्हाळ ******************* नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच माणसाच्या आयुष्यालाही दोन बाजू आहेत,जसे जीवन,मरण या दोन बाजू असल्याशिवाय माणसाचे आयुष्य पुर्ण होत नाही.अगदी तसेच  माणसाच्या जगण्यालाही सुख दुःखाची किनार असल्याशिवाय  आयुष्याला अर्थ येत नाही.कारण काय की माणसाचे जीवन हे ऊन सावली सारखे असल्याने सुखा सोबत दुःखही असणारचं आहे म्हणूनतर जगण्याचा प्रवास विविध अनुभवातून होत असतो.जसे जेवणात लोणचे नसेल तर जेवणाला मजा येत नाही  तसेच,आयुष्यात दुःख नसेल तर जगणं कळत नाही.जगण्याला निट समजून घेण्यासाठीच सुखाच्या पाठीशी दुःख उभे असते आणि दुःख असल्याशिवाय आयुष्यही कळणार कसे तेव्हा जगणं आणि आयुष्य हे दोघही समजले तर दुःख पचवणे अथवा दुःखाचा सामना करणे अवघड जात नाही.जेव्हा जीवन जगताना जगण्यातच आनंद शोधला पाहिजे आनंद असेल तर सहाजिकच सुखालाही मग जवळकी करावीशी वाटतेचं.खरतर माणूस हा पुर्णतः सुखात नसतोच कुठेतरी माणसीकरित्या दुखावलेला असतोच दुःखाच वेटोळे त्याच्या अवतीभोवती घुटमळत असल्यामुळे माणसाला संघर्षाशिवाय पर्याय नसतो,अशावेळी पावलोपावली अपयशाचाही समना करावा लगतं असतो,सर्

कविता :- पुर्वीच्याकाळी माणूसकीच्या गावात | संजय धनगव्हाळ

इमेज
पुर्वीच्याकाळी माणूसकीच्या गावात एकाच घरात दहा कुटुंब एकत्र रहायचे दिवसभर काम करूनही आनंदातच दिसायचे आपुलकीचं नात  काळजीने जपायचे प्रेम जिव्हाळा देवून एकमेकांना सांभाळायचे थकूनभागून आल्यावर साऱ्यांची विचारपूस व्हायची सारे सगळे जमल्यावर  जेवाणाची पंगत बसायची चांदण्यांच्या छताखाली आजीआजोबांच्या मागेपुढे साऱ्या कुटुंबाचा घोळका असायचा ओसरीवर बैठक मांडून गप्पांचा फड रंगायचा रामराम म्हणतं रात्री सुखाने झोपायचे भल्या पहाटे कोंबड्याने बांग दिल्यावर सारे कुटुंब एकत्र उठायचे बायकाही डोक्यावयचा पदर खाली पडू देत नव्हते कुटूंब प्रमुखांना विचारल्याशिवाय  कोणी काहीच करत नव्हते काहीही झाल तरी  घर परिवार आपलेपणात बांधून ठेवायचे वडिलधाऱ्यांचा आदर करून त्यांच्या धाकात रहायचे त्याकाळी घरसंसार सर्वांचा गुण्यागोविंदाने चालायचा एकत्र कुटुंबात समाधानाचा सुगंध घरभर दरवळायचा आज भारताच्या इंडियात कुटुंब विभक्त झाले आहे फेसबुक इंटरनेटच्या चक्रव्यूहात फसला आहे घरात राहूनही कोणी एकमेकाशी बोलत नाही मोबाईलशिवाय त्यांना कोणीच काही लागत नाही जग बदलले म्हणून माणसांच्या माणूसकीला आपुलकीचा ओलावा  राहीला नाही म्हणून हरवल

◾कविता :- मी देव पाहीला

इमेज
मी देव पाहीला संजय धनगव्हाळ *************** स्वतःला विसरून तो रुग्णांसाठी धावला माणसांची सेवा करून माणुसकीला जागला प्राण हाताशी घेवून तो संकटाशी लढत राहीला त्या डॉक्टरच्या रूपात  मी देव पाहीला शव वाहून तो एकसारखा पळत होता जबाबदारीने प्रेत जाळत होता नात रक्ताच नसतानाही तो मदतीचा हात देत राहीला त्या रुग्णवाहकाच्या रूपात मी देव पाहीला ती सुध्दा कार्यतत्पर होती तिला तिच्या जीवाची मुळीच पर्वा नव्हती दिवसरात्र राबून तिने जातीधर्माचा विचार नाही केला त्या नर्सेसच्या रूपात मी देव पाहीला मोकाट फिरणाऱ्यांना किती आवरावे त्यांनाही कळत नव्हते घराबाहेर पडूनका सांगुनही कोणी ऐकत नव्हते घरदार विसरून त्यांनी आपल्या लेकरंबाळांचा विचार नाही केला त्या पोलीसांच्या रूपात मी देव पाहीला नको कोणाला लागण म्हणून तो साफसफाई करत होता साफसुतर ठेवून तो जबाबदारीने वागत होता मरण सोबत घेवून तो काम करत राहीला त्या सफाईकामगारात मी देव पाहीला या करोना काळात कोणालाही भेटता येत नव्हते अंतर राखुन एकमेकांना पहात होते गंभीर परिस्थितीतही एक माणूस दुसऱ्या माणसाशी माणूसकीने वागत राहीला त्या माणसा माणसात मी देव पाहीला संजय धनगव्हाळ

◾जीवन मंत्र :- श्रीमंती...

इमेज
'श्रीमंती' संजय धनगव्हाळ ******************       श्रीमंत व्हावस कोणाला वाटत नाही,प्रत्येकजण श्रीमंत होण्याचे स्वप्न पहात असतो,पण सर्वांनाच श्रीमंती मिळते असे नाही.काही वडिलोपार्जित श्रीमंतीचा वारसा चालवत असतात तर काही कष्ट,मेहनतीने श्रीमंती मिळवत असतात.तर काही प्रयत्नाशी परमेश्वर अस म्हणून श्रीमंत होण्याचे स्वप्न पहात असतात. आता श्रीमंत अधीक श्रीमंत झाला तर त्याचे काही वाटतं नाही,पण एखादी कष्टाने श्रीमंत झाला असेल तर त्याचा आनंद काही वेगळाच  असतो.श्रीमंत आणि गरीब या आयुष्याच्या दोन बाजु आहेत. त्याप्रमाणे माणूस जगतं असतो,गरजेपुरता पैसा असला तरी खुप झालं. म्हणजे आहे त्यात समाधान माणून सुखासुखीनी जगणारेही ते त्यांच्या पुरते श्रीमंत असतात आणि श्रीमंतीच्या श्रीमंतीत लोळण घेणारेही श्रीमंतच असतात. दोघांच्याही श्रीमंतीत तफावत असली तरी समाधानाने जगण्यात खरी श्रीमंती असते.दोघांची दिनचर्या वेग वेगळी,दोघांचे जगणेही वेगळे असते.पण श्रीमंताच्या चेहऱ्यावर श्रीमंत असण्याचा लवलेश असतो,तर श्रीमंत नणाऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव असतो.पण पैसा असतो तरच त्याला श्रीमंत म्हणायचं का ? समजा श्रीमंत

माणसं का बदलतात...

इमेज
'माणस का बदलतात' (संजय धनगव्हाळ) ********************* असं म्हणतात की पैसा आल्यावर माणस् बदलता,माणसाची माणसीकता बदलते तेव्हा माणूस माणसाशी माणसासारखा वागतं नाही.म्हणजे जेव्हा एखाद्या माणसाची हलाखीची परिस्थिती असते तेव्हा तो कष्टाने मेहनतीने,किंवा आणखी काही ईतरमार्गाने श्रीमंत होतो त्याच्या जवळ पैसा येतो,त्याची परिस्थिती सुधारते सर्व सुखसोयी त्याच्याकडे असतात त्यावेळी आपसूकच त्याचे विचार बदलतात,त्याची माणसीकता,त्याचा दृष्टीकोन बदलतो तो त्याची हालाखीची परिस्थिती विसरून  दुसऱ्यांना कमी लेखतो.वाईटातून चांगल्या परिस्थितीत बदल झल्यावर फारच कमी लोकांना आपल्या हालाकीच्या परिस्थितीची जाणीव असते.आशी  माणस् आपला वाईट काळ कधीच विसरत नाही.कधीच त्याना गर्व येत नाही किंवा कधीही कोणालाही कमी लेखत नाही.उलट ते सर्वांशी नम्रतेने वागतील व अपल्या हालाखीच्या परिस्थितीत न घाबरता प्रामाणिक राहुन आपल्या कष्टावर विश्वास ठेवून सुखाच्या दिवसाची वाट बघायची दिवस बदलतातच अशा प्रकारे मार्गदर्शन करून समोरच्याचा उत्साह वाढवतील.पण हे अस सर्वांना जमत नाही.पैसा आल्यावर काहींच्या अंगात अहंमपणा एवढा ठासुन भरला जातो

◾विशेष लेख :- आयुष्य म्हणजे काय | free marathi audiobook blog

इमेज
'आयुष्य म्हणजे काय' ✍संजय धनगव्हाळ  ****************** आयुष्य म्हणजे काय? हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे,हा प्रश्न  प्रत्येकालाच पडतो,प्रश्न जरा गुंतागुंतीचा असला तरी तो सहज कोणालाही सोडवता येत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर,आयुष्य म्हणजे एक कोडं आसते हे कोडं ज्याला सोडवता आले तोच खऱ्यार्थाने आयुष्य जगला समजा. आयुष्यासारख्या गुंतागुंतीच्या जाळ्यातुन सहज बाहेर पडणे एव्हढे सहज सोपे नाही.खुप अडचणींना सामोरे जावे लागते.आता आयुष्य म्हटल्यावर अडचणी असणारच आहे. अडचणीशिवाय किंवा गुंतागुंती शिवाय माणसाच आयुष्य नसतेचं.आणि आयुष्य जगायच म्हटलं तर खुपं संघर्ष करावा लागतो. आणि संघर्ष नाही केला तर त्याला आयुष्यही म्हणता येणार नाही. कारण संघर्षातुन माणूस घडत असतो, संघर्षातुन माणूस कळतो संघर्ष असेल तरच जगण्याला अर्थ आहे.संघर्ष केल्याशिवाय कोण आपला कोण परका कळत नाही.संघर्षाचे चटके घेतल्याशिवाय कोण किती आपल्या जवळ आहे ते ही कळत नाही म्हणून आयुष्य जगायचं असेल तर संघर्ष हवाच.म्हणूनच आयुष्य म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडतोचं.     आयुष्य म्हणजे जळणाऱ्या दिव्यासारखे असते,म्हणजे दिव्यात

◾कविता :- तू येशील ना

इमेज
तू येशील ना *************** तू येशील ना..... पावसा सोबत खेळायला तू आल्यावर पाऊस  जोरात येतो तुला छेडत असतो तू आडोसा घेत असते तो तुझ्या मगे पळत असतो तू चिंबचिंब भिजताना  तो तुला कवेत घेत असतो तू येशील ना..... कळ्यांना कवेत घ्यायला त्या कळ्यांना तुला बघायच असतं तुझ्या स्पर्शाने फुलायच असतं त्यांचा लडिवाळा पाहून तू गोडं हसतं असते गजरा फुलांचा माळत असते तू येशील ना.... बाग फुलांचा बघायला तुला पाहून फुले फुलत असतात परडीतल्या परडीत  ते भांडत असतात गंध फुलांचा दरवळताना तू वेडावत असते तू सडा फुलांचा वेचत असते तू येशील ना शृंगार तुझा आरशात पहायला  रूप तुझं लाजरं  त्याला डोळ्यात बंद करायचं असतं तुला पाहून मंत्रमुग्ध व्हायच असत तू बट केसांची मागे घेवून  पहात असते गालावरची खळी हसताना खुप सुदंर दिसते तू खरचं येशील ना......! संजय धनगव्हाळ धुळे ९४२२८९२६१८ _________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾कविता :- वेळ

*वेळ* ************ जगं वेळेवर चालते  असं म्हणतात म्हणून धावणारी माणस वेळ चुकवतं नसतातं वेळ म्हणजे माणूस जगण्याचं यंत्र आहे ध्येयसाध्य करण्याचा मंत्र आहे  माणसाचा जन्मही  वेळेवरच होत असतो ह्रुदयाची गती मोजतानाही  वेळच बघतं असतो खरतरं वेळेच्यापुढे कुणाचं काहीचं चालत नाही आणि वेळेआधी  कोणाला काहीच करता येत नाही काही जरी करायच म्हटलं तरी साऱ्या घडामोडी वेळेवरच होत असतात म्हणूनतर मुहूर्तलाही वेळ देत असतात      माणसानेतर वेळेच्या गतीने धावायच असतं धावताना जराही थांबायचं नसतं कारण पुढची वेळ कशी येईल सांगता येत नाही वेळ टळली की मग काहीच करता येत नाही म्हणून माणसाने वेळेला महत्व दिले पाहिजे सारकाही वेळच्यावेळी झालं पाहिजे वेळ थांबली की  माणूस थांबला समजायचं आणि एकदाचा थांबला की मग मागे वळून नाही बघायचं कारण वेळ ही कुणासाठी थांबत नाही गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही तेव्हा माणसाने  वेळेला समजून घेतल पाहीजे वेळेप्रमाणेच जगलं पाहिजे *संजय धनगव्हाळ* धुळे ९४२२८९२६१८ ___________________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

त्या इवल्याशा मनात...

इमेज
त्या इवल्याशा मनात साठवून तरी किती साठवायचं साठवण्याधी त्या मनाला एकदातरी विचारून बघायचं मन काहीत बोलत नाही म्हणून साठवतच राहतो  काहीच कामच नसत साठवलेलं ते तरी मन जपून ठेवतो साठवून साठवून मन जड होतं  रिकाम कधी होत नाही आपलच गाऱ्हाण  मनाला सांगतो   पण त्या मनाच गाऱ्हाण कोणी एकत नाही काय होत असेल त्या मनाची तगमग त्या मनालाच माहीत  त्या मनाला होणाऱ्या वेदना मात्र कोणी समजून घेत नाहीत  रोज कितीतरी घाव असतात मनावर मन मुकाट्याने सहन  करून घेत अश्रुंचा बांध फुटल्यावर मन बिचारं आतल्या अत रडून घेतं किती त्रास द्यायचा  त्या मनाला कधीतरी त्या मनाचही ऐकले पाहिजे मन सांगेल तस वागंल पाहिजे मन तर रोज जखमी होतं पण कठोर होत नाही काहीजरी झाल तरी ते कोणापासूनही वेगळ ऱ्हात नाही संजय धनगव्हाळ धुळे ९४२२८९२६१८ _______________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

कविता :- माझं गाऱ्हाणं

इमेज
माझं गाऱ्हाणं मिच मला सांगतो आरशात पाहून चेहऱ्यावरचे भाव पहातो भाव तसे बदललेले दिसतात अश्रुंनाच फक्त ते कळलेले असतात मग कुठेतरी एकांतात एकटाच बसतो आणि माझे दुःख मलाच ऐकवतो तेव्हा कितीतरी वेदना अवतीभवती असतात काळजावरच्या जखमाही सोबत दिसतात खूप गहिवरून येते मनावरचे ओरखडे पाहून एक एक घाव आठवतांना हुंदके येतात राहून राहून भावनाही अपमाना   खाली  दाबल्या जातात अंतकरणात गुदमरून  मेलेल्या दिसतात दोन शब्द प्रेमाचे बोलं कोणीही बोलतं नाही आपुलकीचा होकार  कोणी देत नाही पदोपदीच्या तिरस्काराचा  कंटाळा आला असतो खचलेल्या देहाला  भावनिक आधारही नसतो खरचं कुणाच काहीही होवू दे जे घाव देतात ते  दुसऱ्यांसाठी कमी आणि स्वतःसाठी जास्त जगतात हळव्या मनावर हळवी फुंकरही घालत नसतात काय सांगावं या जगातं  खरेपणाने वागणाऱ्यांना  कोणी जगु देतं नाही द्रुष्ट वृत्तीचा वध करण्यासाठी कोणी राम होवू देत नाही *संजय धनगव्हाळ* धुळे ९४२२८९२६१८ ________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

कविता : आयुष्याच्या अखेरीस

इमेज
आयुष्याच्या अखेरीस ************** आयुष्यभर कष्ट केलीत पण मनासारखे जगता आले नाही राब राब राबत गेलो पण माणस् कळली नाहीत  ईच्छा साऱ्या दुर ठेवून आयुष्यभर गरज सर्वांची पुर्ण करत राहीलो स्वतःसाठी कमी मात्र दुसऱ्यांसाठी जास्त  जगलो नोकरी असेपर्यंत सारकाही सुखासीन असतं त्यानं संजय धनगव्हाळ धुळे ९४२२८९२६१८ _____________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-  सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

◾कविता :- जीजाऊच्या लेकी...

इमेज
जीजाऊच्या लेकी ***************** मावळे फक्त तेव्हाच होवून गेलेत शिवबाचे आता फक्त कावळे आहेत ईथेतिथे सारे  काळ्या नजरेचे बगळे आहेत इतिहास घडवला तेव्हा शिवबाच्या मावळ्यांनी आणि रयेतेची इभ्रत सांभाळली आताच्या कावळ्यांनी तर माणूसकीच बाटवली अरे दाढी वाढवून कोणीपण शिवबा होत नसतो गजर गर्जना करून कोणी शिवभक्त म्हटला जातनसतो शिवबाच्या राज्यात तर लेकीसुना सुरक्षित होत्या आता जन्मला येणेही असुरक्षित आहे स्त्री सन्मानाचे खोटे पुरावे देत आहे कोणालाही कुठे  एकटे जाता येत नाही रक्षणाची हमी देता येत नाही नाते रक्ताचे नसले म्हणून छेडायचे नसते माणूसकी नजरेतून बघायचे असते परक्याच्या लेकीला हात लावताना  आपल्याही बहिणबेटीचा विचार करायचा  तिच्या पाठीशी उभा राहून रक्षण करणाराच खरा शिवभक्त म्हणायचा कारण हि भुमी छत्रपती शिवाजी महाराजांची भुमी आहे ईथे प्रत्येक बहिण बेटी जपल्या पाहिजे या जिजाऊच्या लेकीसुना पुजल्यागेल्या पाहिजे संजय धनगव्हाळ ९४२२८९२६१८

मी शोधतोय ...

इमेज
मी शोधतोय  माझ्या स्वप्नातील ध्येयाकडे घेवून जाणारी शितीजा पलीकडची वाट मी शोधतोय गौतमी वृक्ष आणि शांतीचा मार्ग दाखवणारा तो बुद्ध  ईथे सुरू आहे माणसाची माणसा विरूद्ध लढाई माजलाय अमानुषतेचा उद्रेक निशब्द आक्रोश ऐकतोय मी आणि विनंती करतोय एका परिवर्तनाच्या प्रलयासाठी या महासागराला अरे सारस्वतांनो कोणीही देह त्याग  करू नये म्हणून तुमच्या विचारामधुन आणि  लेखणि मधील शाईच्या प्रत्येक थेंबाने हाणूनपाडा विध्वंसकाचे कुटील डाव मगच घडु शकतो  नव्या इतिहासाने सुजलाम सुफलाम शांतीचा देश  संजय धनगव्हाळ धुळे ९४२२८९२६१८ _________________________________ टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-   सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...