◾विशेष लेख :- हे सुदंर जीवन... Marathi Audiobook mp3 Marathi Audiostory


हे सुदंर जीवन
संजय धनगव्हाळ
*******************
नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच माणसाच्या आयुष्यालाही दोन बाजू आहेत,जसे जीवन,मरण या दोन बाजू असल्याशिवाय माणसाचे आयुष्य पुर्ण होत नाही.अगदी तसेच  माणसाच्या जगण्यालाही सुख दुःखाची किनार असल्याशिवाय  आयुष्याला अर्थ येत नाही.कारण काय की माणसाचे जीवन हे ऊन सावली सारखे असल्याने सुखा सोबत दुःखही असणारचं आहे म्हणूनतर जगण्याचा प्रवास विविध अनुभवातून होत असतो.जसे जेवणात लोणचे नसेल तर जेवणाला मजा येत नाही  तसेच,आयुष्यात दुःख नसेल तर जगणं कळत नाही.जगण्याला निट समजून घेण्यासाठीच सुखाच्या पाठीशी दुःख उभे असते आणि दुःख असल्याशिवाय आयुष्यही कळणार कसे तेव्हा जगणं आणि आयुष्य हे दोघही समजले तर दुःख पचवणे अथवा दुःखाचा सामना करणे अवघड जात नाही.जेव्हा जीवन जगताना जगण्यातच आनंद शोधला पाहिजे आनंद असेल तर सहाजिकच सुखालाही मग जवळकी करावीशी वाटतेचं.खरतर माणूस हा पुर्णतः सुखात नसतोच कुठेतरी माणसीकरित्या दुखावलेला असतोच दुःखाच वेटोळे त्याच्या अवतीभोवती घुटमळत
असल्यामुळे माणसाला संघर्षाशिवाय पर्याय नसतो,अशावेळी पावलोपावली अपयशाचाही समना करावा लगतं असतो,सर्वच अपेक्षा पुर्ण होतातच असे नाही पण ज्याप्रमाणे जगणे वाटेला आहे आहे त्याप्रमाणे त्या परिस्थितीशी जुळवून घेतल्याने कुठलीच समश्या उद्भवत नाही.दिवस बदलतात तसा माणूसही बदलतो आणि जसे आहे तसे जगताना या माणसांच्या गर्दीत वेदना यातना  सहण करून काहीतरी मिळवण्यासाठी धडपडत असतो.कष्ट,मेहनत,परिश्रम हे सारकाही करूनच माणूस बरचकाही मिळवण्याच प्रयत्नात असतो.कारण एकदा जिंकायच असेल तर त्यासाठी बऱ्याचद्या पराभव स्विकारल्याशिवाय यश मिळत नसते.आणि यशाच समाधान मिळालं 
म्हणजे माणसाला सहज सुदंर जीवन जगण्याचा आंदन झाल्याशिवाय रहात नाही.माणसाला सुख हव असेल तर प्रयत्नही तितकेच महत्वाचे असतात जो जिंकण्याची जिद्द ठेवून प्रयत्नाशी लढतो तो कधीच हारत नाही.
   जीवन कसे सुंदर करावे हे माणसाच्या कुशलतेवर अवलंबून आहे सुखाची लालसा,यशाची अपेक्षा, आनंदासाठी उतावळेपणा, समाधानसाठी आतुरता, व दुःखापासुन लांब पळणाऱ्यांच आयुष्य कधिच सुंदर होत नाही.रस्त्यावर पडलेल्या दगडाला लाथाळत असतो पण कधीतरी त्याच दगडाला शेंदूरफासुन पुजा केली जाते.माणसाच्या सुरवातीचा काळही असाच असतो.
सुरवातीला खुप कष्ट मेहनत करावी लागते मगं एकदाचा की यशा मार्ग सपडला की आयुष्यात काहीच अडचण येत नाही. सुखाच्या किंवा यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी काही काळ जावूद्यावा लागतो. संकटाशी दोन हात केल्याशिवाय मनासारखे जगता येते. माणसाने जर आहे त्या परिस्थितीवर मात करून विजय मिळवला तर हे जीवन सहज सुंदर होते.आयुष्य सहज सोपे असले तरी सहजशक्य नाही. आयुष्याच्या वाटेवर अनेक चढउतार येतात आपण मात्र आपल्या ध्येयापासून दुरं व्हायचे नाही.कासवाच्या गतीनेका होईना रोज थोडी थोडी प्रगती जरी झाली तर एकदिवस भरभरून सुख पदरात पडतेच.आता सुख आले म्हणून मागचे दिवस विसरायचे नाही.कारण वाईटातुनच चांगले होत असते म्हणून सुखाच्या काळातही दुःखाची अपयशाची जाणिव असली पाहिजे.तसेच आपण मोठे झालो म्हणजे आपल्या जवळच्यांना दुर करायचे नाही किंवा विसरायचे नाही मोठे होवूनही माणूसकीने वागण्याची हिच वेळ असते.जे दुर गेलेत त्यांना जवळ करायच आणि जे जवळ आहेत त्यांच्याशी प्रेमाच नात अधीक घट्ट करायचं.
  सुदंर जीवनाला अधीक चकाकी येण्यासाठी दुसऱ्याच दुःख आपलं समजून घेतान त्याच्या वेदनेला मारलेली माणूसकीची फुकंर ही दोघांच्या नात्याला घट्ट करून ठेवते.आपल्या आयुष्यातील एक क्षण जर दुसऱ्याच्या सुखासाठी उपयोगीयेत असेल तर त्याच्यासारखा आनंद दुसरा नाहीच. आपल्यामुळे त्याच्या दुखाची तिव्रता कमी होवून त्याचे आयुष्य आनंदात फुलते,आपले योगदान आणि दुहऱ्याचे समाधान यातच खरे सुख आहे.आपल्यामुळे जर त्याच्या चेहऱ्यावर  सुखाच्या लकीरा त्याच हाश्य फुलवत असेल तर तो क्षण दोघांसाठी सुखाचा क्षण असतो म्हणजे सतत रडणाऱ्या चेहऱ्यावर एकदाजरी हासु आणले तर तो क्षण स्वतःसाठी खुपच आनंदाचा असतो.
आनंद देणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या हाश्यानंदमुळेच दुसऱ्याचही जीवन सुदंर होते.दुःखाच ओझं असणाऱ्याच्या पाठीवर सहानुभूतीचा हात जरी ठेवला तरी त्याला खुप समाधान मिळते.सुख दुःखाची देवाणघेवाण केल्यावरही हे जीवन सुंदर होते.आयुष्यात जखमा देणारे भरपूर असतात पण जखमेला मलम लावायला कोणी जवळ येतं नाही,मग अशावेळी त्या जखमेवर फुकंर घालणारा आपला कोणीतरी जवळचा असावा.जगण्याला जर समजून घेतले तर आयुष्य सहज सोपे आहे त्या सहजतेतं अवघड असे काहीचं  नाही,दुःखातही खुप सुख असते म्हणून आयुष्यातला प्रेत्येक क्षण आनंदाने जगायचा, आयुष्य थोड असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणार असावं आयुष्यात काहीतरी चांगल काम करण्यात सुख समाधान आणि आनंद आहे ,सुखाचा अंकुर तिथेच उमलतो जेथे आनंदाचे फुले उमलतात,हे सुंदर जीवन असल्याचा सुगंध देतात.
म्हणून सुदंर जीवन जगण्यासाठी माणसाच मनं सुदंर असायला हवे कारण,माणूस सुदंर चेहरा पाहून आपलासा होत नसतो तर गोडं बोलण्यातून, माणूसकीच्या नात्यातून आपलस करून घेताना प्रेमाने नात घट्ट करतो तेव्हाकुठे हे *जीवन सुंदर* होते.

संजय धनगव्हाळ
९४२२८९२६१८

____________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट