◾कविता :- मी देव पाहीला
मी देव पाहीला
संजय धनगव्हाळ
***************
स्वतःला विसरून
तो रुग्णांसाठी धावला
माणसांची सेवा करून
माणुसकीला जागला
प्राण हाताशी घेवून तो
संकटाशी लढत राहीला
त्या डॉक्टरच्या रूपात
मी देव पाहीला
शव वाहून तो एकसारखा
पळत होता
जबाबदारीने प्रेत जाळत होता
नात रक्ताच नसतानाही
तो मदतीचा हात देत राहीला
त्या रुग्णवाहकाच्या रूपात
मी देव पाहीला
ती सुध्दा कार्यतत्पर होती
तिला तिच्या जीवाची
मुळीच पर्वा नव्हती
दिवसरात्र राबून तिने
जातीधर्माचा विचार नाही केला
त्या नर्सेसच्या रूपात
मी देव पाहीला
मोकाट फिरणाऱ्यांना
किती आवरावे
त्यांनाही कळत नव्हते
घराबाहेर पडूनका सांगुनही कोणी ऐकत नव्हते
घरदार विसरून
त्यांनी आपल्या लेकरंबाळांचा विचार नाही केला
त्या पोलीसांच्या रूपात
मी देव पाहीला
नको कोणाला लागण म्हणून तो
साफसफाई करत होता
साफसुतर ठेवून तो
जबाबदारीने वागत होता
मरण सोबत घेवून तो
काम करत राहीला
त्या सफाईकामगारात
मी देव पाहीला
या करोना काळात
कोणालाही भेटता येत नव्हते
अंतर राखुन एकमेकांना
पहात होते
गंभीर परिस्थितीतही
एक माणूस दुसऱ्या माणसाशी
माणूसकीने वागत राहीला
त्या माणसा माणसात
मी देव पाहीला
संजय धनगव्हाळ
धुळे
९४२२८९२६१८
________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा