◾कविता :- वेळ
*वेळ*
************
जगं वेळेवर चालते
असं म्हणतात
म्हणून धावणारी माणस वेळ चुकवतं नसतातं
वेळ म्हणजे माणूस जगण्याचं यंत्र आहे
ध्येयसाध्य करण्याचा मंत्र आहे
माणसाचा जन्मही वेळेवरच होत असतो
ह्रुदयाची गती मोजतानाही
वेळच बघतं असतो
खरतरं वेळेच्यापुढे कुणाचं काहीचं चालत नाही
आणि वेळेआधी कोणाला काहीच करता येत नाही
काही जरी करायच म्हटलं तरी
साऱ्या घडामोडी
वेळेवरच होत असतात
म्हणूनतर मुहूर्तलाही वेळ देत असतात
माणसानेतर वेळेच्या गतीने धावायच असतं
धावताना जराही थांबायचं नसतं
कारण पुढची वेळ कशी येईल सांगता येत नाही
वेळ टळली की मग काहीच करता येत नाही
म्हणून माणसाने वेळेला महत्व दिले पाहिजे
सारकाही वेळच्यावेळी
झालं पाहिजे
वेळ थांबली की
माणूस थांबला समजायचं
आणि एकदाचा थांबला की मग मागे वळून नाही बघायचं
कारण वेळ ही कुणासाठी थांबत नाही
गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही
तेव्हा माणसाने
वेळेला समजून घेतल पाहीजे
वेळेप्रमाणेच जगलं पाहिजे
*संजय धनगव्हाळ*
धुळे
९४२२८९२६१८
___________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा