कविता :- माझं गाऱ्हाणं
माझं गाऱ्हाणं
मिच मला सांगतो
आरशात पाहून
चेहऱ्यावरचे भाव पहातो
भाव तसे बदललेले
दिसतात
अश्रुंनाच फक्त ते
कळलेले असतात
मग कुठेतरी एकांतात
एकटाच बसतो
आणि माझे दुःख
मलाच ऐकवतो
तेव्हा कितीतरी वेदना
अवतीभवती असतात
काळजावरच्या जखमाही
सोबत दिसतात
खूप गहिवरून येते
मनावरचे ओरखडे पाहून
एक एक घाव आठवतांना
हुंदके येतात राहून राहून
भावनाही अपमाना
खाली
दाबल्या जातात
अंतकरणात गुदमरून
मेलेल्या दिसतात
दोन शब्द प्रेमाचे बोलं
कोणीही बोलतं नाही
आपुलकीचा होकार
कोणी देत नाही
पदोपदीच्या तिरस्काराचा
कंटाळा आला असतो
खचलेल्या देहाला
भावनिक आधारही नसतो
खरचं कुणाच काहीही होवू दे
जे घाव देतात ते
दुसऱ्यांसाठी कमी आणि
स्वतःसाठी जास्त जगतात
हळव्या मनावर हळवी
फुंकरही घालत नसतात
काय सांगावं या जगातं
खरेपणाने वागणाऱ्यांना
कोणी जगु देतं नाही
द्रुष्ट वृत्तीचा वध करण्यासाठी
कोणी राम होवू देत नाही
*संजय धनगव्हाळ*
धुळे
९४२२८९२६१८
________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा