◾जीवन मंत्र :- श्रीमंती...
'श्रीमंती'
संजय धनगव्हाळ
******************
श्रीमंत व्हावस कोणाला वाटत नाही,प्रत्येकजण श्रीमंत होण्याचे स्वप्न पहात असतो,पण सर्वांनाच श्रीमंती मिळते असे नाही.काही वडिलोपार्जित श्रीमंतीचा वारसा चालवत असतात तर काही कष्ट,मेहनतीने श्रीमंती मिळवत असतात.तर काही प्रयत्नाशी परमेश्वर अस म्हणून श्रीमंत होण्याचे स्वप्न पहात असतात. आता श्रीमंत अधीक श्रीमंत झाला तर त्याचे काही वाटतं नाही,पण एखादी कष्टाने श्रीमंत झाला असेल तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो.श्रीमंत आणि गरीब या आयुष्याच्या दोन बाजु आहेत. त्याप्रमाणे माणूस जगतं असतो,गरजेपुरता पैसा असला तरी खुप झालं. म्हणजे आहे त्यात समाधान माणून सुखासुखीनी जगणारेही ते त्यांच्या पुरते श्रीमंत असतात आणि श्रीमंतीच्या श्रीमंतीत लोळण घेणारेही श्रीमंतच असतात. दोघांच्याही श्रीमंतीत तफावत असली तरी समाधानाने जगण्यात खरी श्रीमंती असते.दोघांची दिनचर्या वेग वेगळी,दोघांचे जगणेही वेगळे असते.पण श्रीमंताच्या चेहऱ्यावर श्रीमंत असण्याचा लवलेश असतो,तर श्रीमंत नणाऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव असतो.पण पैसा असतो तरच त्याला श्रीमंत म्हणायचं का ? समजा श्रीमंत माणूस जर मनाने गरीब असेल तर त्याची श्रीमंती काय कामाची,जो मनाने श्रीमंत असतो तोच खरा श्रीमंत समजावा.मग त्याच्याकडे संपत्ती असलीकाय नसली काय त्याच्याने काही फरकं पडत नाही.खरतर मनाची श्रमंती खुप महत्त्वाची असते.पैसा नसला तरी चालेल पण माणसानं नेहमीच मनाने श्रीमंत असायला हवे,या जगात बरेच धनीक आहेत जे अडल्या नडलेल्या नेहमीच मदत करत असतात, गरजवंताची अडचण दुर करत असतात.कारण त्यांचे मन श्रीमंत असते म्हणून जे दुखी असतात त्याचे अश्रु पुसायला श्रीमंतताचे हात पुढाकार घेतात.मनाने आणि धनाने श्रीमंत असणारा नेहमीच सर्वदूर चर्चेत असतो त्याची ख्याती असते.पण एखादी जर मनानेच श्रीमंत नसेल तर त्याची शारीरिक मदत खुप आधार देते अडचणीत धावपळ करुन आपली मनाची श्रीमंती दाखवणारे आपल्या अवतीभवती खुप असतात.
विचार,संस्कारांची श्रीमंती माणसाला उच्चस्तरावर पाहचवते चांगले विचार चांगले संस्कार असतील तर, त्याच्या व्यक्तीमत्वाची श्रीमंतीकडे अनेकांच लक्ष जाते कारण तो धनाने नसला तरी विचाराने श्रीमंत असतो त्याच्या विचारांच्या प्रभावाने अनेकांना प्रेरित करुन तो आपलस करून घतो.त्याच्या चांगल्या संस्कारंमुळे माणस आपसूकच त्याच्यजवळ असणाऱ्या श्रीमंतीचा हेवा करतात. अर्थात ते विचाराने श्रीमंत असतात म्हणून ते मनानेही चांगलेच असतात तेव्हा म्हणतातना धन चोरीला जावू शकते पण विचारांची संस्कारांची चोरी कोणी करू शकत नाही.आणि हो मनाने श्रीमंत होण्यासाठी विचार आणि संस्कारही तितकेच महत्त्वाचे आहेच.विचारनी् संस्कार नसतील तर कुठलीच श्रीमंती काहीच कामाची नाही.ज्याला चांगले विचार आत्मसात करून श्रीमंत व्हायच असेल तर त्याची मनाची तयारी असायला हवी,कारण काय मनाची तयारी असल्याशिवाय डोक्यात चांगले विचार रुजत नाहीत. म्हणून मन तयार असलकी विचारांची श्रीमंती आपोआप वाढत जाते.
चांगल्या स्वभावाची श्रीमंतीही खुप महत्त्वची असते,स्वभाव चांगला असेल तर सर्वच जवळ येतात नाहीत दुरुन डोंगर साजरे अशी माणसाची गतं होतो.आणि ज्याच्या जवळ चांगल्या स्वभावाची श्रीमंती नसेल तर अशांना कोणी जवळ करत नाही त्याला टाळत असतात.स्वभाव चांगला असेलतर अशा माणसांना कसली गरज पडत नाही त्याच्याजवळ धन नसल तरी ते श्रीमंत असतात.करण ते सर्वांशी प्रेमाणे बोलून अपलस करून घेतात,ही माणस प्रत्येकाशी चांगल वागतात चांगलत बोलतात. आपल्या वागण्या बोलण्यातून ते आपल्या मनाची, विचारांची,
संस्काराची श्रीमंती वाढवत असतात.अणि अशानेच त्याच्या व्यक्तीमत्वाची पारख होते.सर्वसामान्य,
रोजंदारी करणारे,रोज कमावून खानारे यांच्या जवळ कसली श्रीमंती असते,चांगल्या स्वभावाची मोठ्या मनाची श्रीमंती हिच यांची संपत्ती असते.चांगल्या वागण्या बोलण्यामुळे माणूस माणसाशी जोडला जातो,एकमेकांनमधे आपलेपणा वाढतो,एकमेकांमधे आदराच,प्रेमाच नातं तयार होतं.त्यावेळी ईथे पैशाची श्रीमती उपयोगात येत नाही. पैसा असुनही स्वभाव,विचार ,संस्कार चांगले नसतील तर अशी श्रीमंती शुन्य असते.
काही माणस श्रमाने कष्टाने,मेहनतीने श्रीमंत होतात.पण मन श्रीमंत नसेल तर तो गरीबच समजायचा,ज्याच्या अंगी चागंले कर्म तो खरा श्रीमंत,माणस चांगल्या कर्मानेही श्रीमंत होतात आणि चांगल कर्म करण्याकरता गरिब श्रीमंत असा भेद नसतो,ज्याला चांगल्या कर्मातून मोठ व्हायच असतो तो कसलाच विचार करत नाही चांगले कर्म तर श्रीमंतही करतात व सर्वसामान्य किंवा गरीब दुबळाही करतो पण त्या कर्मात स्वार्थ नसेल तर त्याच्या ईतका श्रीमंत दुसरा कोणीच नाही.म्हणून कुठलीच अपेक्षा न ठेवता चांगल्या कर्माची पुंजी मिळवण्यातच जगण्याचे सार्थक आहे.चांगले कर्म हिच खरी श्रीमंती आहे आणि आयुष्यात चांगल्या कर्माच्या श्रीमंतीनेच माणसाच भाग्य उजळते.म्हणून चांगले कर्मा करत रहावे.माणूस काही एकट्याने श्रीमंत होत नसतो अनेकांचे हातभार लागतात तेव्हाकुठे तो श्रीमंत होतो मग ते धन असो,विचार असो, संस्कार असोत,स्वभाव असो किंवा कर्म असो.या सर्वांची श्रीमंती मिळवण्यासाठी कोणाचीतरी प्रेरणा असते तेव्हाकुठे तो त्या श्रीमंतीचा अधिकारी ठरतो.
जे माणसे आपल्यासाठी राबतात त्याच्या कष्टाची जाणीव ठेवून आपल्या श्रीमंतीचा अर्धाभाग जरी त्यांच्यावर खर्च केले तरी देणाऱ्याची श्रीमंती आणखीन वाढते. ज्याच्यामुळे माणूस श्रीमंत होतो तो जर समाजाच देण लागतो तर त्याने निश्चितच समाजासाठी सामाजिक हितासाठी एखाद्याच्या उपचारासाठी आपली श्रीमंती उपयोगात आणली पाहीजे तरच तो खरा श्रीमंत माणूस म्हटला जाईल.
बि एम डब्ल्यू गाडीतून फिरणारा जर एखाद्या भुकेल्याला एक घास अन्नाचा देत नसेल तर त्याच्या ईतका गरीब कोणी नसावा.पण अशावेळी एखादी सर्वसाधारण माणसाने भुकेल्याला पोटभर जेवू घातले तर.त्याच्या ईतका श्रीमंतीही कोणी नसणार.अशा श्रीमंत माणसांच खरच कौतुक केल पाहीजे आशी सर्वसामान्य माणस सर्वबाजुने श्रीमंत असतात.खरतर मोठ्या बंगल्यात राहणाऱ्यापेक्षा छोट्या घरात राहणारे खुप मोठे असतात ते सर्वांचा विचार करून जगतात कोणी उपाशीपोटी राहणार नाही याची नेहमीच काळजी घेतात सर्वांना आपल्यात ग्रुहीत धरून मनमोकळे जगतात,स्वच्छंदी जगतात,आपल्याच मर्जीने जगतात आहे त्या परिस्थितीत राहून समाधानाचा ठेकर देऊन आनंदात राहतात.
या जगात धनीकश्रीमंत ही राहता गरीब सर्वसाधारण ही साहतात,दोघांच सुख वेगवेगळे आहे.जगण वेगळ आहे,वागण वेगळ आहे.दोघांकडे मन असतं एक गरीब तर दुसरे श्रीमंत,दोघांच्या गरजाही वेगळ्या असतात.पण एसी बंगल्यात राहणारा झोपेच्या गोळ्या घेवुन झोपतो तर साधारण माणसाला कसलीच आणि कुठल्याच औषधाची गरज पडत नाही.श्रीमंत माणसाला कोणाकडेही मन मोकळ करूशकत नाही जे सामान्य माणूस कुठेही मन हलक करून घेतो.खरा श्रीमंत तोच जो दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रु येवू देत नाही. जो कोणाचा विश्वासघात करत नाही तो खरा श्रीमंत जो नेहमीच पाठीशी खंबीरपणे ऊभा राहतो तो खरा श्रीमंत. आणि जो माणूस दुसऱ्या माणसाला आपल समजून त्याच्याशी आपुलकीने व माणूसकीने वागतो तोच खरा श्रीमंत असतो म्हणून श्रीमंती अशी मिळवा की साऱ्या जगाच लक्ष आपल्याकडे गेल पाहीजे. तीच खरी *श्रीमंती*
संजय धनगव्हाळ
धुळे
९४२२८९२६१८
_________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा