गंधीत होऊन धरा आपली , वारा ही पुलकीत झाला । नववर्षाच्या आगमनाला , सारा आसमंत उजाळला ।। आज आहे ते जुने होईल , नविन येतील दुसरे । नाते मित्रत्वाचे राहो , नेहमीसाठी सदा हासरे ॥ जे झाले त्याला विसरा , नका दोष ही देत राहू । नविन काही चांगल्यासाठी , येणाऱ्याचे स्वागत करु ॥ व्टेंटी व्टेंटी आला गेला , प्रेम जिव्हाळा तसाच राहिला । यापुढेही तो कायम असूदया , नववर्षाचे क्षण घेऊन आला ॥ सरत्या वर्षाला निरोप देऊ , नविन वर्षाचे स्वागत करुया । मागील वर्षाच्या गोष्टी विसरुन , नवी नाती , नवे कार्य घडवूया ॥ ======================= महेन्द्र सोनेवाने , “ यशोमन " गोंदिया ======================== टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅