◾व्यक्तीविशेष :- डॉ. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर

 मानवी जीवनाला अर्थ देणारी
 भारतरत्न डॉ. बाबासाहेब
   आंबेडकरांच्या जन्मदिनाची

🌹⚜🌹⚜🌸⚜🌹⚜🌹

        भारतातील असे एक व्यक्तीमत्व ज्यांची ओळख विश्वरत्न म्हणून आहे. त्यांच्या जीवन कार्याने करोडोंच्या जीवनात स्वातंत्र्य सूर्य उगवला. सूर्यप्रकाशात जीवन उजळले. हे अव्दितीय कार्य करणाऱ्या महामानवाचे नाव आहे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
        भीमराव ते भारतरत्न हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांना अत्यंत प्रतिकुल परिस्थितीला तोंड देत संघर्ष करावा लागला, तो सुद्धा बुरसट विचांरानी ग्रस्त अशा जगण्यासाठी मानवी हक्कही नाकारणाऱ्या अन्यायी स्वकियांशीच. पण त्यांनी ही लढाई अचाट बुद्धिमत्ता.. कष्ट आणि प्रामाणिकतेच्या बळावर जिंकली. समाजात सौदार्ह राखून लोकांचे मन आणि मत परिवर्तन घडविले.
        नेतृत्व कसे असावे याचा आदर्श म्हणजे डॉ. बाबासाहेब. देशातील प्रत्येकाला स्वतःचे असे अस्तित्व निर्माण झाले. जगातील प्रत्येकाने स्वतःची उन्नती कशी करावी याचा ते आदर्श ठरले. वडिलांच्या संस्काराने बालपणीच वाचनाची आवड लागली. कबीर.. महात्मा फुले आणि भगवान बुद्ध हे बाबासाहेबांचे आदर्श. या ज्ञान तपस्वींनी विकासासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे हे समाजात बिंबविले.
        "वाचाल तरच वाचाल" हा मंत्र देणाऱ्या डॉ. बाबासाहेबांचे विविध विषयाचे वाचन.. ग्रंथालय प्रेम हा पण आदर्शच. वाचनाने विवेक जागतो. जगाकडे बघण्याची दृष्टी लाभते. डॉ. बाबासाहेब यांनी प्राप्त केलेल्या पदव्या आणि त्यांना प्राप्त झालेले जागतिक सन्मान त्यांच्या अगाध ज्ञानाची साक्ष देतात.
        समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाचे जीवन जगण्यासाठी संरक्षणाची कवचकुंडले प्राप्त करुन देणारी घटना डॉ. बाबासाहेबांनी दिली. कायद्याने सर्वांना समसमान अधिकार प्राप्त झाले. या घटनेने प्रत्येकाला न्याय दिलाय हे बाबासाहेबांचे फार मोठे योगदान आहे, म्हणूनच ह्या राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब महामानव ठरले.
        मानवी जीवनाचे एकच उद्दिष्ट असते. ते म्हणजे हा जन्म प्राप्त झाल्यावर समाजातील गोरगरीबांचे अश्रू पुसावे. त्यांचे पोट भरावे याची चिंता वहावी. हाच पुण्य मिळवण्याचा मार्ग आहे. जगाचे कल्याण करणे हीच खरी भक्ती. उपकार करणे हाच मुक्ती मार्ग. दीनदुबळ्यां साठी काठी होत, जनतेतच लपलेला जनार्दन शोधणे हाच भगवंत उपासनेचा मार्ग.
        भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन..

🌸🌿🌸🔆🎊🔆🌸🌿🌸
___________________________________________

____________________________________________

  _रंजल्या जिवाची गांजल्या जिवाची मनी धरी खंत_
  _तोचि खरा साधू,तोची खरा संत_

  _गोरगरीबांना धरुनिया पोटी_
  _पुसुनिया आसू घास देई ओठी_
  _पुण्यवान ऐसा धरी मोक्षपंथ_

  _जगाचे कल्याण, हीच खरी भक्ती_
  _उपकार सेवा, हीच खरी मुक्ती_
  _ठायि ठायिं त्याची रुपे ही अनंत_

  _अंधारात होई आंधळ्याची काठी_
  _पांगळ्याला घेई आपुलिया पाठी_
  _जनी जनार्दनी पाहे भगवंत_

🌷🌿🌸🍃🌺🍃🌸🌿🌷

  गीत : जगदीश खेबूडकर ✍
  संगीत : राम-लक्ष्मण
  स्वर : सुधीर फडके आणि उत्तरा केळकर
  चित्रपट : हीच खरी दौलत (१९८०)

🌻🌿🥀🔆🌺🔆🥀🌿🌻

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट