Featured Post

◾बोधकथा :- तृप्तता... | bodhkatha | yashacha mantra

प्राचीन काळी एका देशात एक राजा राज्‍य करत होता. त्‍याचा असा एक नियम होता की... जोपर्यंत तो संन्‍याशांना दान करीत नाही तोपर्यंत तो भोजन ग्रहण करत नसे. 

एके दिवशी दानासाठी निश्र्चित केलेल्या वेळेच्‍याआधीच एक संन्‍याशीबुवा आपल्‍या हातात एक छोटेसे भिक्षापात्र घेऊन राजवाड्याच्‍या द्वाराशी हजर झाले. राजाला हे पाहून आश्र्चर्य वाटले. 
संन्‍याशाने राजाला पाहिले व तो म्‍हणाला, '' हे राजन, जर तुम्‍हाला शक्‍य असेल तर माझ्या या छोट्याशा भिक्षापात्रात काही ना काही दान टाका.'' 
राजाला त्‍याच्‍या बोलण्‍याचा रागही आला आणि आश्चर्यही वाटले. राग यासाठी की... राजाला तो तुम्‍हाला शक्‍य नाही असे सुचवित होता आणि भिक्षापात्राचा आकार खूपच लहान होता याचे आश्चर्य वाटले.

राजाने आपल्‍या सेवकांना आज्ञा केली की या भिक्षुकाचे लहानसे भिक्षापात्र आताच्‍या आता सोन्याच्‍या मोहोरांनी भरून टाकावे व सन्‍मानाने याचकाची बोळवणी करावी. सेवकांनी पहिल्‍यांदा ताट भरून सोन्‍याच्‍या मोहोरा आणल्‍या आणि भिक्षापात्रात टाकल्‍या पण भिक्षापात्र मात्र मोकळेच. परत परत सेवक ताटे भरून सोन्‍याच्‍या मोहोरा आणत होते पण भिक्षापात्रात मात्र  पूर्णपणे भरत नव्हते.

राजाला व सेवकांना हा प्रकार काही कळेना की हे निश्चित काय होते आहे की... आपण टाकलेल्‍या मोहोरा जातात कुठे आणि हे लहानसे भिक्षापात्र अजूनही मोकळे कसे दिसते. शेवटी सोन्‍याच्‍या मोहोरा संपल्‍या, राजाचा खजिना रिता झाला तरी भिक्षापात्रात थोडी जागा शिल्‍लक होतीच. मग राजाला समजून चुकले की हा काही तरी दैवी प्रकार आहे. त्‍याने संन्‍याशापुढे लोटांगण घातले आणि माफी मागितली व म्‍हणाला,''हे साधूमहाराज, मला क्षमा करावी, मी संपत्ती व सत्तेच्‍या गर्वात तुम्‍हाला व तुमच्‍या भिक्षापात्राला लहान समजलो. मी दान करतो हा माझा गर्व आता पूर्णपणे नष्‍ट झाला आहे. पण या भिक्षापात्राचे रहस्‍य काय आहे हे कृपया मला सांगावे.'' 

संन्‍याशी उत्तरला,'' राजा, हे भिक्षापात्र म्‍हणजे आपल्‍या हृदयाचे प्रतिक आहे. या संसारातील कोणतीच वस्‍तू पूर्णपणे आपले हृदयात जागा बनवू शकत नाही. मनुष्‍याने कितीही नाव कमावले, शक्ति मिळविली, धन प्राप्ती केली, सौंदर्य पाहिले किंवा उपभोगले, सुख प्राप्त केले तरी हृदयातून कुठेतरी असे वाटत राहतेच की अजून मिळाले पाहिजे. पूर्ण तृप्तता कधीच मिळत नाही. फक्त ईश्वरी कृपेचा एक किरण आपल्‍या हृदयाला भरू शकतो पण मनुष्‍य तो मिळविण्‍याचा कधीच प्रयत्‍न करत नाही.

तात्पर्य :~

तृप्तता हि खरी मानवाची गरज आहे पण ती मिळत नाही हे एक दुःख आहे.

________________________________________

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट