◾कविता :- गुढीपाडवा... | कवी - महेन्द्र सोनेवाने | yashach amantra
चैत्राची सुरुवात करीत ,
आनंद उधळत आली ।
प्रत्येकाच्या नव्या जीवनात ,
उत्साहाची पालवी फुलली ।।
कडूनिंबाच्या पानासंगे ,
साखर ही सुख देई ।
पानाफुलांचे तोरण बांधून ,
गुढी आकांक्षांची येई ॥
रेशमाची गुढी उभारु ,
श्रीखंड पुरी खाऊ ।
लिंबाचं पान अन् साखरगाठी ,
सर्वाना आम्ही देऊ ॥
सोनपिवळया किरणांनी ,
आले नविन वर्ष ।
सर्वाच्या मनात दाटे ,
नव वर्षाचा हर्ष ॥
नववर्ष घेऊन आला ,
चैतन्याचा नवा स्पर्श ।
गुढीपाडव्याच्या कोटी शुभेच्छा ,
सर्वाना होई हर्ष ॥
महेन्द्र सोनेवाने , “ यशोमन "
गोंदिया
दिनांक : ११/०४/२०२१
=======================
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा