◾बोधकथा :- अति कोपता कार्य जाई लयाला
"राग" ही एक भयानक विकृती माणसाच्या अंगी असते.अती राग केल्याने माणसाची विचार करण्याची प्रवृत्ती खुंडते.आयुष्य बरबाद होते.कितीतरी आयुष्य उद्वस्त झाले या रागामुळे. रागामुळे इतरांचे नुकसान करता करता स्वतः चे ही नुकसान करून घेतो जीवन आनंदी व यशस्वी जगायचे असेल तर"राग छू मंतर करावे" लागते.
रागाचे खूप सारे दुष्परिणाम आपल्या आयुष्यात दिसून येते.
आटपाट नगर होतं तिथं राम आणि शाम नावाचे छान मित्र होते . त्यांची मैत्री खूपच घट्ट होती. राम, शाम एकत्र राहायचे , एकत्र शिकायचे , एकत्र खेळायचे . दोघांनाही संगीत शिकण्यात रस होता . एका महान गुरू कडे संगीत शिकायचे. राम अतिशय सुस्वभावी , शांत, मेहनती मुलगा .त्याच्या प्रत्येक गाण्याचे कौतुकच होत असे. आणि हेच कौतुक श्यामला खुपत असे.
जुगलबंदी स्पर्धा चालायची तेंव्हा प्रत्येक वेळेला राम अव्वल नंबर असायचा. मित्रच ते पण पराभवाने शाम रामचा तिरस्कार करू लागला.राग आणि द्वेष श्यामच्या प्रगती मध्ये अडथळा करत असे.
गाण्यातल्या हरकती सराव कमी करू लागला आणि त्याला कसे मागे टाकता येईल याचाच विचार करू लागला.
अति रागाने शाम राम बद्दल कधीच चांगला विचार करू शकत नव्हता.
नेहमी राग राग करायचा. रागामुळे त्यांच्या मैत्रीत अंतर पडू लागले. श्याम नेहमी रामला त्रास देत असे आणि राम नेहमी श्यामला संकटातून वाचवत असे. खरी मैत्री रामने श्यामच्या गुण दोषासह स्वीकारले होते.
एकदा शामने रामाचे खराब व्हावे म्हणून सरबत मध्ये औषध घातले.
मस्त मैफिल संपली सगळे श्रोते रामच कौतुकच करू लागले .त्या गोष्टीचा श्यामला खूपच त्रास होऊ लागला
इतरांचे चांगले गुण पाहून कौतुक करण्यातही फार मोठे मन लागते. राम मात्र श्यामचे भरभरून कौतुक करायचा त्याचा आलाप , सूर रामला आवडायचा तसा त्याचा अहंकार ही खूप वाढायचा . सगळं व्यर्थ जिथे "वाईटाचा उगम होतो तिथे चांगुलपणा काहीच दिसत नाही.हे ही तितकेच खरे
मैफिल संपताच त्याने सरबताचे दोन ग्लास मागवले.एका ग्लास मध्ये सरबत व दुसऱ्या ग्लासात भायानक औषध .सेवकाने ग्लासची आदलाबदल केली मग काय "विनाशकाले विपरीत बुद्धी" सरबताचा ग्लास घेतला रामने आणि औषध घेतले श्यामने
श्याम मनोमन खूप खुश होता की मी रामचा आयुष्य बिघडवत आहे . माझ्यासारखा गायक या पंचक्रोशीत नाही. "अति कोपता कार्य जाती लयाला" खुशीत दोघांनी सरबत पिले
आणि क्षणार्धात शाम ओरडायला लागला.
त्याचा मुखातुन एकही शब्द निघेना त्याला बोलताही येईना जीवघेणा त्रास श्यामला सहन करावा लागला. आणि त्याच्या कर्माची फळं त्याला मिळाली.
रामने लगेच त्याला वैद्याकडे नेले .सगळे उपचार करून थकले एकही मात्रा लागू होईना.शेवटी एक लांब जंगलात एक जुनाट झोपडी होती त्या झोपडी मध्ये एक वयस्कर वैद्य राहात असे त्याचा पत्ता कोणी एकाने रामला सांगितला .त्या वैद्याला शोधत शोधत राम तिथे गेला त्या वैद्याने एक दुर्मिळ वनौषधी सांगितली . उंच डोंगरावर जंगलात खूप परिश्रमाने वनौषधी शोधून आणली.त्याचा काढा बनवला काही पथ्यही सांगितले.
रामने काढा आणला रोज सकाळ संध्याकाळ श्यामला पिण्यासाठी दिला श्यामला त्याच्या कर्माचा खूप पश्चाताप झाला.हळूहळू श्यामची तब्येतीमध्ये सुधार आला. एक दिवस शाम पूर्णपणे बरा झाला. शाम ला स्वतः ची चूक मनोमन पटली. शामने रामची माफी मागितली .दोन मित्रांची अनौखी मैत्री पुन्हा नव्याने निर्माण झाली
शामला मात्र अति राग आणि द्वेष केल्याचा परिणाम लगेच दिसून आला .शाम ने आपल्या आयुष्यातून राग आणि द्वेष छू मंतर काढून टाकले . आणि परमोच्च आनंदाचा साक्षीदार झाला
तर मित्रांनो तुम्हीही तुमचा राग छू मंतर कराल ना?
$$तात्पर्य– $अति कोपता कार्य जाती लयाला
$इतरांचा कधी तिरस्कार करु नये.
$चांगल्या गुणांचे नेहमी कौतुक करा.
✒️Suchita Kulkarni
➖➖➖➖◾➖➖➖➖◾➖➖➖➖
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा