पोस्ट्स

खरंतर प्रार्थना म्हणजे काय असते

प्रार्थना म्हणजे ती नाही, जी आपण हात जोडून, गुढघ्यावर बसून देवाकडं काहीतरी मागण्यासाठी केलेली असते... प्रार्थना तीच असते, जी सकारात्मक विचार करून लोकांसाठी काहीतरी चांगली इच्छा करणं, ही खरी प्रार्थना...!! जेव्हां आपण कुटुंबाच्या पोषणासाठी अत्यंत चांगल्या मनानं स्वयंपाक करता, ती प्रार्थना असते...!! जेंव्हा आपण लोकांना निरोप देताना, त्यांच्या चांगल्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो, ती प्रार्थना असते...!! जेंव्हा आपण आपली ऊर्जा आणि वेळ देऊन एखाद्याला मदत करतो, ती प्रार्थना असते...!! जेव्हा आपण कोणाला तरी मनापासून माफ करतो, ती प्रार्थना असते.              प्रार्थना म्हणजे कंपन असतात. एक भाव असतो, एक भावना असते, एक विचार असतो.  प्रार्थना म्हणजे प्रेमाचा आवाज असतो, मैत्री, निखळ नाती, हे सगळं म्हणजे प्रार्थनाच तर असते...!! 🌹 श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त🌹🙏 टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

ऋण फेडता आले पाहिजे..

ऋण फेडता आले पाहिजे... ०००००००००००००००००००००  वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली, तेव्हा           श्रीरामाने सर्वत्र बघितले.. पण पाणी कोठेच मिळेना. सर्वत्र जंगलच दिसत होते. तेव्हा *श्रीरामाने पृथ्वी* *मातेला प्रार्थना* केली की, जेथे कोठे पाणी असेल तेथे जाण्याचा मार्ग आम्हांला दाखव. तेव्हा एक *मयुर* 🦚तेथे आला व श्रीरामास म्हणाला, येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे.चला मी आपणास दाखवतो.पण मार्गात मी  उडत उडत जाईन आणि आपण चालत येणार, त्यामुळे चुकामूक होऊ शकते. म्हणून *मी मार्गात एक एक पंख टाकत जाईन. त्यामुळे* आपणास मार्ग सापडेल व आपण जलाशयात जवळ पोहचाल. आपणास माहिती आहे की, मयूर पंख,हॆ *एक विशेष काळी व एक विशेष ऋतुमध्ये* *पंख तुटून पडतात. पण मोराच्या इच्छेविरूद्ध पंख* *निघत असतील तर त्याचा मृत्यु होतो* . आणि तेच झाले. त्याचे पंख निघत होते, त्यामुळे त्याचा मृत्यूचा काळ जवळ आला होता. तेव्हा मोर म्हणाला की, मी किती भाग्यशाली आहे की, जो जगाची तहान भागवतो, त्या प्रभूची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले. माझे जीवन धन्य झाले.आता मरताना माझी काही इच्छा शेष राहीली नाही.तेव्हा मर्यादा

हाँगकाँगचे लोक अजूनही भारतीयांचा तिरस्कार का करतात ?

परदेशात जाणे म्हणजेच  प्रगती....मानणारे भारतीयाची  मनोगत हाँगकाँगचे लोक अजूनही भारतीयांचा तिरस्कार का करतात ?? तेथे राहणार्‍या काही लोकांचे अनुभवः  हाँगकाँगमध्ये जवळपास एक वर्ष घालवल्यानंतर एका भारतीय व्यक्तीने बर्‍याच लोकांशी मैत्री केली, पण तरीही त्याला वाटलं की तेथील लोकांनी त्याच्यापासून काही अंतर ठेवले आहे !! कोणत्याही मित्राने त्यांना कधीही त्यांच्या घरी बोलावले नाही ?? शेवटी त्याने जवळच्या मित्राला विचारले.  सुरुवातीला टाळाटाळ केल्यानंतर थोड्या विलंबानंतर त्याने जे सांगितले त्यावरून त्या भारतीय मान्यवरांना स्वतःची लाज वाटली.  हाँगकाँगच्या मित्राने विचारले की, "150 वर्षे राज्य करण्यासाठी किती ब्रिटिश भारतात राहिले?"   भारतीय महामहिम म्हणाले,  "10,000 असणे आवश्यक आहे" "मग इतकी 150 वर्षे राज्य करताना तुझ्या 32 कोटी लोकांवर अत्याचार कोणी केले?"  ते तुझे स्वतःचेच लोक होते ना? जेव्हा जनरल डायर "फायर" म्हणाला, तेव्हा, 1300 निशस्त्र लोकांना गोळ्या घालून कोणी ठार केले. ब्रिटीश सेना तर तेथे नव्हती ?? एकाही गनरने मागे वळून जनरल डायरवर ती गोळी का झाडल

राग एकटाच येतो

राग एकटाच येतो, पण जाताना आपल्यातली सर्व चांगली लक्षण घेऊन जातो.     संयमसुध्दा एकटाच येतो, पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षण घेऊन येतो.    *फक्त निवड कोणाची करायची हे आपणंच ठरवायचे आहे.                                                                      रस्ता कितीही दगड खड्यांनी      भरलेला असला तरी  एक चांगला बुट घालुन त्यावर   आपण सहज चालु शकतो.   परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा असला तर      चांगल्या  रस्त्यावर काही पावले चालणे कठीण होते. मनुष्य बाहेरच्या आव्हांनानी नाही    तर आतल्या कमजोरीमुळे          अयशस्वी होतो. मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो.... दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही... आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात. किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते.. म्हणुन आनंदी रहा.... ।।आपला दिवस आनंदी जावो।। नव्हे तर, आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो. माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं  असं आपण नेहमी म्हणतो... परंतू सोन्याचा

कविता - मीच फक्त चांगला आहे

*मीच फक्त चांगला आहे*  *बाकी सगळे वाईट*  *तुम्हीच सांगा ही भूमिका*  *Wrong आहे का Right ?* *स्वतःला " हिरो " ठरवतांना* *दुसऱ्याला " व्हिलन " करू नको*  *विनाकारण गाऱ्हाणे करत*  *इकडून तिकडे फिरू नको*  *पुढच्या क्षणी काय घडणार* *कुठे कुणाला माहीत असतं*  *विकेट कशी , कधी पडणार*  *कुणालाही ठाऊक नसतं* *अपॉइंटमेंट घेऊन कधी* *यमराज घरी येतो का ?* *गयावया केली म्हणून* *कुणाला सोडून देतो का ?* *यमा,तुझ्या रेड्यावर मी* *डबलसीट बसणार नाही*  *ठीक आहे बसू नकोस*  *असं कधीच असणार नाही*  *मनात असो किंवा नसो* *यमाच्या मागे बसावंच लागतं* *श्रीराम जयराम म्हणत म्हणत*  *मसनवाट्यात जावंच लागतं*  *चोवीस तासाच्या आत तुला* *रॉकेल टाकून फुकुन देतील* *कवटी फुटो न फुटो* *घरी लवकर पळून जातील* *मूर्ख माणसा,त्याच्यामुळे*  *प्रत्येक क्षण जगून घे* *सखी सोबत पावसा मध्ये*  *चिंब चिंब भिजून घे* *घर घर ,काम काम* *चोवीस तास तेच ते*  *इतकं सोनं , तितके पैसे* *वेड्या माणसा सोडून दे* *घण्याच्या बैला जागा हो*  *थोडी तरी मजा कर*  *हिरव्या हिरव्या झाडा सोबत*  *कधी तरी दोस्ती कर*  *दशम्या , धपाटे , पिठलं ,भाकर

कविता - आपल्या ग्रूपची गोष्टच न्यारी

आपल्या ग्रूपची गोष्टच न्यारी, प्रत्येकाची आवड जगावेगळी, प्रत्येक सभासदाचा रंग वेगळा, प्रत्येक रंगाची छटा निराळी.  कुणी फक्त सुप्रभात म्हणून गायब,  तर कुणी प्रत्येक पोस्ट वर स्मायली, कुणी करे व्हिडिओ चा भडिमार, तर कुणाची सकाळ सुविचाराने झाली. कुणी ज्ञानदानासाठी आसुसलेला,  तर कुणाची वृत्ती सदा धार्मिक कुणी हास्यरसात बुडवून घेई,  तर कुणाची पोस्ट मार्मिक, कधी आजीबाईंचा बटवा उघडे, तर कधी बोधप्रद कथा,  कधी कोडी असोत किंवा तत्त्वज्ञान, तर कधी गृहिणींची व्यथा.  हर तर्हेचे मनोरंजन करण्याचा,  वसा जणु घेतला आपण, कधी कुणाला येवू देणार नाही, कंटाळा किंवा एकटेपण. लोभ आहेच तो व्हावा वृद्धिंगत, आपल्या माणसांची ही लोभस संगत.🙏🏻🙂 टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

कविता - कळलेच नाही

🙏!  *कळलेच नाही*  !🙏 वर्षेचे वर्षे निघून गेली,  धकाधकीच्या जीवनात  वय केंव्हा वाढले  कळलेच नाही !       खांद्यावर खेळविलेली मुल,       खांद्याएवढी कधी झाली       *कळलेच नाही* !       एकेकाळी दिवसा       ढाराढूर झोपायचो,      राञीची झोप       केंव्हा उडाली       *कळलेच नाही* !  ज्या काळ्या केसावर  भाव मारत होतो, ते  पांढरे कधी झाले  *कळलेच नाही* !      वणवण भटकत       होतो नोकरीसाठी,      रिटायर्ड केंव्हा झालो       *कळलेच नाही* ! मुलांसाठी बचत  करीत होतो, कधी मुलं दूर गेली  *कळलेच नाही* !      आता विचार करतो,       स्वतःसाठी काही       करायचं पण शरीराने      केंव्हा साथ सोडली       *कळलेच नाही* ! कळलेच नाही, म्हणून  म्हणतो अजूनही वेळ  आहे, थोडं तरी जगून घ्या  सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या              🙏           *जिंदगी*  *ना मिलेगी दोबारा* टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

पेपरटाक्या

" पेपरटाक्या "         "ओ भैया लोकमत समाचार है क्या ?" चाळीशीतला ऊंच, साधारण बांधा असलेला चार-पाच महीन्याची गरोदर स्त्री एवढे पोट असलेला, अंगावर टी शर्ट व लुंगी घातलेला व्यक्ती दात घासत घासत घराच्या भिंतीवरून डोकावत म्हणाला.      बिना रंगाची गंजलेली सायकलचे ब्रेक दाबुन खर खर आवाज करीत सायकल थांबवून स्टॅन्ड लावत लावत एक युवक म्हणाला, "है ना भैया ये लो" भिंतीवरुनच पेपर त्या माणसाला देत म्हणाला. "ठीक है रुक जरा पैसे लेके आता हु", अस म्हणून लुंगीवाला माणूस घरात गेला. तितक्यात माॅर्नींग वाॅकला गेलेले गोखले सर पेपरवाल्याजवळ येऊन थांबले व नॅपकीनने घाम पुसत म्हणाले, ''अरे राम्या बरं झालं ईथच भेटलास.. दे बरं माझे पेपर." ''व्हय सर '' तो पेपरवाला राम्या आदराने म्हणाला व सायकलीला बांधलेल्या गठ्ठ्यातून एक मराठी व एक ईंग्रजी पेपर काढून देऊ लागला.           तो लुंगीवाला आला व त्याने 10 रु. ची नोट राम्या च्या हातात दिली. गोखले सर लुंगीवाल्याला म्हणाले, "Good morning पाटील साहेब." ''Good morning गोखले सर." "

जादूगार पाऊस ...

जादूगार पाऊस ...  रसिक वाचकहो, गेल्या काही दिवसांपासून मी तुमच्याशी निसर्ग आणि त्या संबंधात बोलतो आहे. मी मागे एका लेखात म्हटलं होतं की निसर्ग हा माझा वीक पॉईंट आहे. पण त्यापेक्षाही पाऊस हा माझा आणखी जिव्हाळ्याचा विषय. मी निसर्गावर बोलतोय. मग पावसावर बोलल्याशिवाय कसा राहीन बरं ? त्यांचं आणि माझं नातं खूप जुनं . जेव्हा कळायला लागलं तेव्हापासूनच. त्याची सगळी रूपं मी अनुभवलेली. त्याचं कधी रौद्र भयानक रूप, छातीत धडकी भरवणारं . सगळ्यांची दैना करणारं . तर त्याचा उदार रूप. सृष्टीला नवसंजीवनी देणारं रूप. ते तर मला अति प्रिय. श्रीकृष्णांनी  गीतेत मला वसंत ऋतू आणि मार्गशिर्ष मास प्रिय असे म्हटले आहे. पण मला वाटतं की तोच सावळा कृष्ण सावळ्या मेघांचं रूप घेऊन पावसाळ्यातही आपल्याला दर्शन देतो. पाऊस देणाऱ्या इंद्रदेवाची पूजा त्यानं बंद करवली. आणि पावसापासून गोकुळाचं रक्षण करण्यासाठी त्यानं गोवर्धन आपल्या करंगळीवर उचलला.  मला वाटतं तोच कान्हा युगानुयुगे या पावसाच्या रूपाने सृष्टीचा गोवर्धन पर्वत उचलून नवसंजीवनी देत असावा. हा त्याने उचललेला गोवर्धन असतो, दुःख, दैन्य, दारिद्र्याचा, दुष्काळाचा. त्यापासून

एक समजदार पत्नी

माझ्या पत्नीला थकल्यासारखे वाटत होते. ती चिडचिडी आणि कुरकुर करणारी होती, पण एक दिवस अचानक ती बदलली.  एक दिवस जेव्हा मी तिला म्हणालो:  "मी मित्रांसोबत थोडी बिअर घेणार आहे."  तिने उत्तर दिले: "ठीक आहे."    माझा मुलगा तिला म्हणाला:  "मला कॉलेजमध्ये सर्व विषयांमध्ये कमी मार्क आहेत."    माझ्या पत्नीने उत्तर दिले:  "ठीक आहे, तू सुधरशील आणि जर तू नाही केलास, तर तू सेमिस्टरची परीक्षा परत देशील, पण ट्युशन फी पण तूच देशील."    माझी मुलगी तिला म्हणाली:  "मी गाडीचा अपघात केला."    माझ्या पत्नीने उत्तर दिले:  "ठीक आहे, गाडी गॅरेजमध्ये घेऊन जा आणि ते ठीक करून घे."    आईकडून येणाऱ्या या प्रतिक्रिया पाहून आम्हा सर्वांना काळजी वाटली.  आम्हाला शंका आली की ती डॉक्टरांकडे गेली होती आणि तिला "मला काही फरक पडत नाही" नावाच्या काही गोळ्या लिहून दिल्या होत्या की काय ?  त्यानंतर मी माझ्या पत्नीला "अस्वस्थताविरोधी औषधांमुळे" असलेल्या कोणत्याही संभाव्य व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी डिस्कशन करण्याचा प्रस्ताव दिला.    पण मग तिने आम्हाला त

नवीन लघुकथा - वय झालयं!!!

नवीन लघुकथा - वय झालयं!!! आज बघत बसलो होतो तिच्या वहीत तिने चिकटवलेल्या माझ्या लहानपणींच्या फोटोकडे... पापण्यांच्या ओलावलेल्या कडांच पण भान राहिलं नव्हतं मला... स्वतःला खूप श्रीमंत समजत असलो तरी आज मात्र गरीबीच्या एका झळेने हारलो होतो मी... धगधगत होतं माझं मन... कसा होतो मी..?? हाच प्रश्न पडत होता आणि मनाला चैन काही पडत नव्हतं... खात होतं मनाला काहीतरी... काहीतरी काय 'ते'च खात होतं मनाला... मला निर्णय का घेता आला नाही... मंत्रालयात काम करणारा सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थेचा अधिकारी होतो मी... मग मला खरचं माझं कार्य समजलं होतं का...??? सगळं सगळं स्पष्ट माझ्या डोळ्यांसमोर दिसतयं... तो भूतकाळ मला त्याच्याबरोबरओढत घेऊन जातोय... सतत... मी केलेल्या कळत-नकळत चुकांच्या टेकडीकडे... ज्याला मीच सुरुंग लावून आघात केला तिच्यावर... ज्या टेकडीवर मी वाढलो, घडलो, जिने मला सगळं काही दिलं तिलाच मी अनाहुतपणे उध्वस्त केलं...  आजही आठवताहेत ते मला सोनेरी दिवस... जेव्हा मनाली आली होती माझ्याशी लग्न करून आमच्या घरात... बाबा तर नव्हतेच तेव्हा... आईनेच वाढवलं होतं मला... पण आई खूप आनंदी दिसत होती... सुन

जीवनाची सत्यता

तो रोज आॕफीसमधून आला की वैतागलेला असायचा.आॕफीसमध्ये साहेबांनी  ऐनवेळी सांगितलेली एक्स्ट्रा कामे, पेट्रोलच्या वाढत्या किमती, बेशीस्त वाहतुकीमुळे होणारी वाहनांची कोंडी, खड्ड्यांमुळे झालेली रस्त्यांची दूरावस्था, हे आणि ते...कितीतरी कारणांमुळे तो चिडायचा आणि आल्याआल्या दहा मिनीटे संताप व्यक्त करायचा. ती चहा आणेपर्यंत तो बोलायचा.     काल मात्र नवल झाले.तो मस्तपैकी बाईकची चावी बोटात फिरवत शिट्टी वाजवत घरात शिरला.ती त्याच्याकडे पहातच राहिली. "काय बघतेस अशी?" "माझा नवरा एवढा आनंदी होऊन येतोय ते पहातेय. काय झाले? प्रमोशन झाले?" "नाही गं." " पेट्रोलचे दर कमी झाले?" " होतील असे वाटते तुला?" "आज ट्रॕफीक जाम नव्हत?" "जास्त होते" "रस्ते एकदम गुळगुळीत झाले रात्रीतून?" "कसे शक्य आहे?" "मग काय झाले. आज रोजच्या समस्यांवर वैतागला नाही." "समस्या रोजच राहणार.तुम्ही त्याकडे कोणत्या नजरेने पाहतात त्यावर ते अवलंबून आहे." "अच्छा ,म्हणजे तू एखाद्या महाराजांच्या प्रवचनाला जाऊन आला असेल."

मोठ्या मनाचा छोटा सेल्समन

मोठ्या मनाचा छोटा सेल्समन भोसरीवरून घरी परतत होतो. दुपारपासून कस्टमरच्या कंपनीत ‘पेमेंट टर्म्स’वरून डोकं उठलं होतं. ऑर्डर हातात पडल्यात जमा होती, तोच एक आनंद होता........ ‘मॉर्डन कॅफे’च्या चौकात सिग्नलला थांबलेलो असताना एक लहानसा पोरगा गाडीजवळ आला. मी स्वतः भीक द्यायच्या विरुद्ध आहे. भिकाऱ्यांना कधीच पैसे नाही देत. पण त्या मुलाच्या हातात विकायला पुस्तकं दिसली. अशा गोष्टी या मुलांकडून घ्यायची संधी मात्र मी कधीच सोडत नाही. त्या मुलाला हात दाखवून गाडी बाजूला घेतली. मुलगा आला, ६० रुपयाला ४ पुस्तकं घ्या म्हणाला. सहज पुस्तकं बघितली तर लहान मुलांची स्केचबुक होती. बरी वाटली. नुकताच जोराचा पाऊस येऊन गेल्यामुळे आणि रात्री नऊची वेळ झाल्यामुळे रस्त्यावर पण अगदीच तुरळक गर्दी होती. पोरगा वयाने असेल ११-१२ वर्षांचा, पण पक्का सेल्समन होता. शेवटची थोडीच शिल्लक आहेत, घेऊन टाका. स्वस्तात देतो म्हणाला. मला नाही आवडत कधीच बार्गेनिंग करायला आणि मुलांच्या बरोबर तर नाहीच. पण एक विचार करून त्याला म्हणालो मी १० सेट घेतो.  कितीला देणार ?  क्षणभर विचार करून शंभरला देतो म्हणाला.  त्याला विचारलं किती दिवस पुस्तकं वि

स्माईल प्लीज

"स्माईल प्लीज" पहिला वाढदिवस... एकट्याने साजरा होणारा पहिला. एकुलता एक मुलगा. त्याच्यासाठी मुली बघणं चालू होतं... एक दिवस कोरोनाने खाऊन टाकला त्याला. दे धक्का. त्या धक्क्यानं बायकोही गेली. बाकी शून्य. रिटायर्डपण आलेलं. जवळचं म्हणावं असं मैत्रही जुळलं नाही कधी. प्रत्येक दिवस अंगावर यायचा. आला दिवस ढकलायचा झालं. कुठनं तरी डबा यायचा. एकवेळचा डबा दोन्ही वेळेला पुरवून ऊरायचा. पल पल आठवणी चघळायच्या फक्त. माझ्याच नशिबी का ? भयानक चिडचीड व्हायची. चिडणार कुणावर ? कुणावरही. कुणीही चालून जायचं. पेपरवाला, दूधवाला, ईस्त्रीवाला,डबेवाला,वाॅचमन. सगळ्यांना सवय झालीय. जगाशी भांडण. कपाळावर सदैव आठ्यांची जळमटं विणलेली. चिरका खडूस वसकल्यासारखा आवाज. आणि म्हणे यांचं आडणाव जवळकर. मला सांगा , कोण जवळ करणार म्हातार्याला ? आज सकाळी बँकेतून फोन आलेला. केवायसी अपडेट करा म्हणे. फोनवर भांडण. तणतणत झेराॅक्सवाला गाठला. आधारकार्ड, पॅनकार्डची झेराॅक्स बँकेत नेऊन दिली. खरं दुःख वेगळंच होतं. फार एकेकटं वाटत होतं. म्हातार्याचा वाढदिवस कुणाच्याही लक्षात नसावा ? संध्याकाळ होत आली. कुणीही विश केलं नव्हतं म्हातार्या

विंचवी म्हणजे मादी विंचू हिच्या आयुष्याची एक भयानक कथा

तुम्हाला हे माहिती आहे का ?..... विंचवी म्हणजे मादी विंचू हिच्या आयुष्याची एक भयानक कथा आहे .... ती मुलांना जन्म दिला की तिचे आयुष्य त्याच क्षणी फक्त आणि फक्त आपल्या पिल्लाना वाचविण्यासाठी पूर्णपणे समर्पित करते ... llविंचुll विंचवा विषयी आपल्याला काय माहित आहे? विंचु डंख मारतो,इतकच ना? तुमच्या माहितीत एक अजुन भर घालणार आहे.विंचवाची मादी विंचवी म्हणुयात तिला. श्रेष्ठ मातृत्व समजायचं असेल तर विंचवीला भेटलच पाहिजे. विंचवी प्रसवते म्हणजे बाळंत होते तेव्हा सरासरी तिला सहा सात पिलं होतात,अगदी अंगठ्याच्या नखावर मावतील एवढी.काही तासांनी पिलांना भुक लागते,निसर्गाचा कोप झालेल्या जीवापैकी एक म्हणजे विंचवी. तिला पिलांच पोषन करण्यासाठी कुठलीच व्यवस्था नाही.कासवा विषयी आपल्याला माहित असेलच;कासवाची आणि पिलांची केवळ नजरानजर झाली की पिलांच पोट भरतं. ईथे त्याहुनही गंभीर समस्या आहे.विंचवीकडे अशी कुठलीच सोय नाही.आता हळुहळु पिलांची भुक अनावर होऊ लागते.विंचवी बिचारी कासाविस होते,पण द्यायला तर काहीच नाही.पिलं तिला चावा घ्यायला सुरुवात करतात ती अंग चोरुन निमुट बसुन रहाते.आता पिलांची भुक अनावर होते,ते विंचव

Aura म्हणजे ?

इमेज
तेजोवलय (Aura)  ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,  मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते. माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.  यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आ

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट