खरंतर प्रार्थना म्हणजे काय असते
प्रार्थना म्हणजे ती नाही, जी आपण हात जोडून, गुढघ्यावर बसून देवाकडं काहीतरी मागण्यासाठी केलेली असते...
प्रार्थना तीच असते, जी सकारात्मक विचार करून लोकांसाठी काहीतरी चांगली इच्छा करणं, ही खरी प्रार्थना...!!
जेव्हां आपण कुटुंबाच्या पोषणासाठी अत्यंत चांगल्या मनानं स्वयंपाक करता, ती प्रार्थना असते...!!
जेंव्हा आपण लोकांना निरोप देताना, त्यांच्या चांगल्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो, ती प्रार्थना असते...!!
जेंव्हा आपण आपली ऊर्जा आणि वेळ देऊन एखाद्याला मदत करतो, ती प्रार्थना असते...!!
जेव्हा आपण कोणाला तरी मनापासून माफ करतो, ती प्रार्थना असते.
प्रार्थना म्हणजे कंपन असतात. एक भाव असतो, एक भावना असते, एक विचार असतो.
प्रार्थना म्हणजे प्रेमाचा आवाज असतो, मैत्री, निखळ नाती, हे सगळं म्हणजे प्रार्थनाच तर असते...!!
🌹 श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त🌹🙏
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा