ऋण फेडता आले पाहिजे..

ऋण फेडता आले पाहिजे...
०००००००००००००००००००००
 वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली, तेव्हा           श्रीरामाने सर्वत्र बघितले.. पण पाणी कोठेच मिळेना. सर्वत्र जंगलच दिसत होते. तेव्हा *श्रीरामाने पृथ्वी* *मातेला प्रार्थना* केली की, जेथे कोठे पाणी असेल तेथे जाण्याचा मार्ग आम्हांला दाखव. तेव्हा एक *मयुर* 🦚तेथे आला व श्रीरामास म्हणाला, येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे.चला मी आपणास दाखवतो.पण मार्गात मी  उडत उडत जाईन आणि आपण चालत येणार, त्यामुळे चुकामूक होऊ शकते. म्हणून *मी मार्गात एक एक पंख टाकत जाईन. त्यामुळे* आपणास मार्ग सापडेल व आपण जलाशयात जवळ पोहचाल.
आपणास माहिती आहे की, मयूर पंख,हॆ *एक विशेष काळी व एक विशेष ऋतुमध्ये* *पंख तुटून पडतात. पण मोराच्या इच्छेविरूद्ध पंख* *निघत असतील तर त्याचा मृत्यु होतो* . आणि तेच झाले. त्याचे पंख निघत होते, त्यामुळे त्याचा मृत्यूचा काळ जवळ आला होता. तेव्हा मोर म्हणाला की, मी किती भाग्यशाली आहे की, जो जगाची तहान भागवतो, त्या प्रभूची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले. माझे जीवन धन्य झाले.आता मरताना माझी काही इच्छा शेष राहीली नाही.तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने मयुरास म्हटले की, माझ्या साठी जे मयूरपंख इच्छेविरूद्ध  काढून मार्गात टाकलेस, त्यामुळे तुझे *माझ्यावर ऋण झाले आहे व जो ऋणानुबंध झाला आहे, हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्की* *फेडीन.. माझ्या  कृष्ण अवतारात तुला माझ्या माथ्यावर धारण करीन.* त्यानुसार पुढच्या अवतारात, श्रीकृष्ण अवतारात त्यांनी आपल्या माथ्यावर मयूरपंख धारण करुन वचना नुसार मयुराचे ऋण उतरवले.
        तात्पर्य हे आहे की, जर प्रत्यक्ष भगवंतास *मागील जन्मातले* *ऋण पुढील जन्मात फेडावे लागले, मग आपण तर मनुष्य आहोत* न जाणो आपणास कितीतरी ऋण फेडायचे आहे.
आपण तर अनेक ऋणानुबंधनात अडकलेलो आहोत.ते *ऋण फेडण्यासाठी कित्येक जन्म कमी पडतील.* 
         अर्थात, आपणास जे काही भले  करायचे आहे, ते या जन्मात करायचे आहे.कारण पुढचा जन्म कुठला असेल, आपणास माहिती नाही आणि मनुष्य जन्मातच ऋण फेडता येते.....
      *एक महत्त्वाचे - ** *पूर्वीचा ऋणानुबंध असल्याशिवाय माशी सुध्दा अंगावर बसत नाही.** त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी,वैरी, ज्यांना त्रास दिला गेला, हे आपल्या या जन्मी भाऊ,बहीण, नातेवाईक, शेजारी या रुपात आपापले ऋण वसूल करतात व ज्यांना आपण मदत केली, तेही या जन्मी कोणत्या ना कोणत्या रुपात येवून परतफेड करतात.
            त्यामुळे मी सरळमार्गी आहे, मी कोणालाही त्रास दिला नाही, मग माझ्याबाबतीत असे का होते, याची कधीच खंत करु नका - *समर्थ रामदास स्वामी म्हणतात,* 
 **मना त्वाची रे पूर्वसंचित केले,* 
 *तयासारिखे भोगणे प्राप्त झाले** 
        देह प्रारब्धावर सोडून मन सद्गुरुचरणी व वाणी नामस्मरणात गुंतविल्यास जीवनातील गंमत व आनंद अनुभवता येतो💐🙏💐🙏
जय श्रीराम, जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏

* जगता आलं पाहिजे...*
००००००००००००००००
*मरता केव्हाही येतं,
पण *जगता* आलं पाहिजे.
*सुख भोगता केव्हाही येतं,
पण दुःख *पचवता* आलं पाहिजे.

*रंग *सावळा* म्हणून काय झालं, 
कर्तृव *उजाळता* आलं पाहिजे.
 *रंग गोरा* असला म्हणून काय झालं,
मनावरील *काजळी* काढता आली पाहिजे.

*यशानं माणूस *उंच जातो* 
 *पाय जमिनीवर* ठेवता आलं पाहिजे.
मिळालेल्या यशात *समाधान मानून* 
 *आनंदी जीवन* जगता आलं पाहिजे.

 *पाप काय* कसंही करता येतं, 
पण *पुण्य करता* आलं पाहिजे. 
 *ताठ काय* कोणीही राहतं, 
पण जरा *झुकून* वागता आलं पाहिजे.

 *ठेच जीवनात* लागतेच, 
सहन करता आली पाहिजे. 
 *मलमपट्टी* करून तिला, 
पुन्हा चालता आलं पाहिजे.

 *शहाण्याचं* सोंग घेऊन,
 *वेडं होता* आलं पाहिजे.
कशाला *बळी* न पडता,
आनंदी *जगता* आलं पाहिजे.

*जगण्याच्या लढाईत *उणीव कायम* भासेल,
ती उणीव *भरता आली पाहिजे* 
 *हास्य* आणि *अश्रूचा मिलाप* करून.
 *फक्त समाधानी राहता आलं पाहिजे* ...

*  आयुष्य खूप सुंदर आहे,भरभरून जगता आले पाहिजे...*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा - एक मजेशीर गणित

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

निसर्ग किमया कि देवता ... Mother Nature

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...