स्माईल प्लीज

"स्माईल प्लीज"

पहिला वाढदिवस...
एकट्याने साजरा होणारा पहिला.
एकुलता एक मुलगा.
त्याच्यासाठी मुली बघणं चालू होतं...
एक दिवस कोरोनाने खाऊन टाकला त्याला.
दे धक्का.
त्या धक्क्यानं बायकोही गेली.
बाकी शून्य.
रिटायर्डपण आलेलं.
जवळचं म्हणावं असं मैत्रही जुळलं नाही कधी.
प्रत्येक दिवस अंगावर यायचा.
आला दिवस ढकलायचा झालं.
कुठनं तरी डबा यायचा.
एकवेळचा डबा दोन्ही वेळेला पुरवून ऊरायचा.
पल पल आठवणी चघळायच्या फक्त.
माझ्याच नशिबी का ?
भयानक चिडचीड व्हायची.
चिडणार कुणावर ?
कुणावरही.
कुणीही चालून जायचं.
पेपरवाला, दूधवाला, ईस्त्रीवाला,डबेवाला,वाॅचमन.
सगळ्यांना सवय झालीय.
जगाशी भांडण.
कपाळावर सदैव आठ्यांची जळमटं विणलेली.
चिरका खडूस वसकल्यासारखा आवाज.
आणि म्हणे यांचं आडणाव जवळकर.
मला सांगा , कोण जवळ करणार म्हातार्याला ?
आज सकाळी बँकेतून फोन आलेला.
केवायसी अपडेट करा म्हणे.
फोनवर भांडण.
तणतणत झेराॅक्सवाला गाठला.
आधारकार्ड, पॅनकार्डची झेराॅक्स बँकेत नेऊन दिली.
खरं दुःख वेगळंच होतं.
फार एकेकटं वाटत होतं.
म्हातार्याचा वाढदिवस कुणाच्याही लक्षात नसावा ?
संध्याकाळ होत आली.
कुणीही विश केलं नव्हतं म्हातार्याला.
यापेक्षा विष खाऊन सरळ मेलेलं बरं.
म्हातारा जाम कावलेला.
रात्रीचे नऊ वाजले.
म्हातारा जेवला सुद्धा नव्हता दिवसभर.
बेल वाजते...
"कोणंय ?"
म्हातारा वसकतो.
"मी गजानन.
चौकातला झेराॅक्सवाला."
म्हातारा जगावर ऊपकार केल्यासारखा दरवाजा ऊघडतो.
दारात गजा ऊभा.
दिलखुलास हसतो.
"हॅप्पी बर्थडे काका.
पॅनकार्डाची झेराॅक्स काढताना सहज जन्मतारीख दिसली.
घर माहिती होतंच.
आत येऊ..."
म्हातारा कसानुसा हसला.
गजा आत आला.
हातातला छोटा केक ऊघडला.
ईवलीशी मेणबत्ती.
म्हातार्याने फुंकरली.
गजाने केकचा तुकडा भरवला.
म्हातार्याच्या डोळ्यांतलं आसवांचं पानशेत फुटलं.
"काका, गणपतीचा स्टाॅल असतो दरवर्षी दुकानात.
नेहमीचं गिर्हाईक असतंच.
माझी धावपळच होते जरा.
तुम्ही येता का दुकानात ऊद्यापासनं ?
जमेल तेवढा वेळ बसा.
माणसं भेटतील.
ओळखी होतील.
तुमचा वेळ जाईल आणि मलाही मदत होईल..."
म्हातार्याची सटकली.
"गजा, मी काय रिकामटेकडा वाटलो की काय तुला ?
पुन्हा असं बोललास तर जीभ हासडून देईन..."
गजा फक्त प्रसन्न हसला.
"भेटू ऊद्या..."
एवढंच म्हणाला आणि कलटी.
म्हातार्याला रात्रभर झोप नाही.
रात्रभर स्वतःशीच भांडला.
सकाळी फ्रेशीर्भूत होऊन,
नऊ वाजायची वाट बघत बसला.
नऊ वाजता म्हातारा गजाच्या दुकानात हजर.
स्माईल प्लीज.
गजाकडे बघून गजापेक्षा दहापट जास्त प्रसन्न हसला.
काऊंटरमागच्या शेल्फमधे शंभर एक बाप्पाज.
प्रसन्न वदन.
"आपली माणसं घरातच शोधायची नसतात फक्त.
बाहेरच्या जगातही सापडतील जवळकर तुम्हाला..."
कोण बोलला ?
शंभर पैकी नेमका कोणता बाप्पा बोलला कसं सांगणार ?
मी नाही ऐकलं, तुम्ही नाही ऐकलं.
जवळकरांना मात्र ऐकू गेलं.
जवळकर स्वतःशीच हसले.
स्माईल प्लीज..
सेल्फी विथ बाप्पा आणि गजा.
शुभम् भवतु !

.........कौस्तुभ केळकर नगरवाला.

टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

आपली सहल खूप छोटी आहे ... Short Tour

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट